संपूर्ण भारतात बांगड्या पुरवणाऱ्या फिरोजाबादला सुहागनगरी म्हणून ओळखलं जातं…

‘ ये चाय गरम चाय गरम चाय…ये बांगड्या गरम बांगड्या गरम बांगड्या गरम… ‘ हा डायलॉग प्रत्येकाला चांगलाच माहिती असेल. एलिजाबेथ एकादशी या मराठी चित्रपटातला हा फेमस डायलॉग आहे. दोन लहान भावंड आपल्या आईनं घेतलेलं कर्ज फेडता यावं, म्हणून होलसेल दुकानातून बांगड्या विकत घेऊन चोरून बांगड्यांचा व्यवसाय करतात आणि पैसे कमवतात.

असो, पण तुम्हाला माहितेय का, की लाखों लोकांच पोट भरण्याचं साधन असणाऱ्या या बांगड्या नेमक्या तयार कुठं होतात.

हा आता जागोजागी बांगड्यांचे कारखाने आहेत. पण फिरोजाबाद हे जगभरात बांगड्यांचं शहर म्हणून फेमस आहे. 

उत्तर प्रदेशातलं फिरोजाबाद इथं देशातलं सगळ्यात मोठं बांगड्यांचं मार्केट आहे. प्लेन पासून डिझायनर, सिंगल कलरपासून कलरफूल बांगड्यांसाठी फिरोजाबादला ओळखलं जातं.

बांगड्यांसोबतचं काचेच्या उद्योगासाठी देखील फिरोजाबाद फेमस आहे.

तसं पाहिलं तर फिरोजाबादचा इतिहास फार जुना आहे. या शहराला आधी चंद्रवारनगर नावाने ओळखल जायचं.

गेल्या दोनशे वर्षांपूर्वी पासून इथं बांगड्यांचा व्यवसाय सुरू आहे. प्राचीन काळात बाहेरच्या राज्यकर्त्यांनी काचेच्या अनेक वस्तू भारतात आणल्या. मात्र तेव्हा या काचेच्या वस्तू नाकारल्या गेल्या. त्यामुळे या सगळ्या वस्तू स्थानिक पातळीवर बनवलेल्या भट्ट्यांमध्ये वितळल्या गेल्या. या भट्ट्यांना स्थानिक भाषेत भैंसा भट्टी म्हणतात.

अशा जुन्या आणि पारंपारिक भट्ट्या आजही अलिगढजवळील ससाणी आणि पूर्दाल नगरमध्ये आहेत. त्याचाचं वापर बांगड्या बनवण्यासाठी केला जातोय. दरम्यान,आता काचेच्या उत्पादनात कोळशाऐवजी नॅचरल गॅसचा वापर केला जात आहे.

सोबतचं असंही मानलं जातं की,

फिरोजाबादमध्ये हा बांगड्यांच्या उद्योग हाजी रुस्तमने सुरू केला. ज्याची सुरुवात रुस्तम उस्तादने १९२० मध्ये केली होती. फिरोजाबादमध्ये काच उद्योगाचे जनक म्हणून हाजी रुस्तम यांना दरवर्षी श्रद्धांजली वाहण्यात येते आणि भल्यामोठ्या जत्रेचं आयोजनही केलं जातं. तर १९२० पासून फिरोजाबादमधले बांगड्यांच्या कारखान्यांचा विस्तार झाला. त्यानंतर १९८९ पासून इथं काचेच्या इतर वस्तूंचाही व्यवसाय होऊ लागला.

सुहाग नगरी म्हणून ओळख

इथे घरोघरी बांगड्यांचा व्यवसाय केला जातो. एवढेच आहे तर इथे बांगड्यांचे बरेच कारखाने पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत. इथल्या बहुतेक लोकांचं पोट -पाणी या बांगड्या विकूणचं चालतं. तुम्ही जर फिरोजाबादच्या गल्ली बोळात फेरफटका मारला तर दोन्ही बाजूला रंगीबेरंगी बांगड्यांचं दिसतील. 

हे शहर जगातील काचेच्या बांगड्यांचं सर्वात मोठे उत्पादक आहे. फिरोजाबादमध्ये जवळपास ४०० बांगड्यांचे कारखाने आहेत, ज्यांचा व्यवसाय दररोजच्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीनुसार केला जातो. इथं बांगड्यांचा रेटही वेगवेगळा आहे. १०, २० रुपयांपासून पाच हजार रुपयां पर्यंतच्या बांगड्या बाजारात उपलब्ध आहेत.

महत्त्वाचं म्हणजे फिरोजाबादच्या बांगड्या फक्त तिथल्या परिसर किंवा काही राज्यापुरत्या मर्यादित नाहीत तर परदेशातही या फिरोजाबाद च्या बांगड्यांची मोठी मागणी आहे. ज्यामध्ये अमेरिका आणि स्वीडन सारख्या देशांचा समावेश आहे.

कोरोनामुळे काचेच्या व्यवसायाला फटका

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमळे लोकांचे जीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. याचा फटका फिरोजाबादच्या बांगड्या व्यवसायाला देखील बसला. इथे बरेचशे कारखाने बंद पडले. फिरोजाबाद जिल्ह्यातील सुमारे १२५ बांगड्यांचा व्यवसायही ठप्प झाला होता. ज्यामुळे बेरोजगारीचं प्रमाणं वाढलं. मात्र आता परिस्थिती हळूहळू सुधारतेय. बांगड्यांचा व्यवसायही पुन्हा सुरू झालाय. फिरोजाबादत हे काचेच्या उत्पादनाचं प्रमुख हब बनलयं.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.