या दादांनी ५६ वर्षांपूर्वी पहिला मानवी कोरोना व्हायरस शोधून काढला…

१९६५ मध्ये, संशोधकांना २२९E नावाच्या वेक्सिंग श्वसन संसर्गाचा शोध लागला. आज आपण सामान्य सर्दी म्हणून ओळखतो.

२०१६ साली ग्रीसमधील अथेन्समधील ४५ वर्षांची शिक्षिका हेजिया हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वोर्ड मध्ये आली. ना तिला धूम्रपान करायची सवय, ना तिचे आरोग्याचे कोणतेही मोठे प्रश्न नाहीत तरी तिला काही गंभीर लक्षणे दिसली होती. १०३ डिग्री पेक्षा जास्त ताप, कोरडा खोकला आणि तीव्र डोकेदुखी.

जेव्हा डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेव्हा असे लक्षात आले की श्वास घेताना तिच्या डाव्या फुफ्फुसातील खालच्या भागात काहीतरी गडबड होती आणि छातीचा एक्स-रे अबनोर्माल दिसत होता.

डॉक्टरांनी विचार केला कि, पेशंटला बॅक्टेरिअल निमोनिया असेल म्हणून त्यांनी तिच्यावर अँटीबायोटिक्सचा डोस सुरु केला. पण पुढच्या दोन दिवसांत त्या पेशंटची प्रकृती अजून खालावली, त्यात तिची न्यूमोनिया लॅब टेस्ट निगेटिव्ह आली होती. जसजस तिला श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होऊ लागला तसतस तिला ऑक्सिजन आणि नवीन औषधांचा पुरवठा करायला लागत होता.

काहीच पत्ता लागेना कि तिला नेमकं झालं काय म्हणून सगळ्या टेस्ट करून घेतल्या.

फ्लूचे विविध प्रकार, लेगिननेअर्स रोग, डांग्या खोकला आणि श्वासोच्छवासाचे गंभीर आजारांमुळे होणाऱ्या जीवाणूंचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या टेस्ट करण्यात आल्या. सार्स SARS and MERS. एमआयआरएसच्या टेस्टप्रमाणेच सर्व पुन्हा निगेटिव्ह रीजल्ट आले.

फक्त एक टेस्ट पॉझिटिव्ह आली, पण डॉक्टरांना विश्वास बसेना म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा तीच टेस्ट करून पहिली पुन्हा पॉझिटिव्ह आली. त्यात कळलं कि पेशंटला  229E  म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका व्हायरसने ग्रासलं होतं.

आजपर्यंत सापडलेला पहिला मानवी कोरोनाव्हायरस त्या पेशंट मध्ये आढळला..हाच व्हायरस कोरोनाचा व्हायरस आहे कसं कळलं ?

 या महिला पेशंटला साधी सर्दी काय झाली आणि तिच्या सर्दीमुळे २२९E चा शोध लागला. 

२० व्या शतकाच्या मध्यापर्यंत, शास्त्रज्ञांनी हा विषाणू मानवापासून दूर ठेवण्यासाठी अनेक तंत्रे बनविली होती, परंतु सर्दी झालेल्या सुमारे ३५% लोकांना अनेक व्हायरस संक्रमित होतात जे वैज्ञानिक अजूनही ओळखू शकले नाहीत.

१९६५ मध्ये शिकागो विद्यापीठातील डोरोथी हॅमरे या संशोधकाने हे वैद्यकीय संशोधन एक आव्हान म्हणून स्वीकारले. सर्दी असलेल्या रुग्णांच्या रक्त, लघवी, शेंबूड या काही नमुन्यांची तपासणी केल्यावर एक नव्या प्रकारचा व्हायरस सापडला, जो २२९E म्हणून ओळखला जाऊ लागला.

त्याच वेळी, इंग्लंडमधील संशोधकांचा एक गट, डॉ डेव्हिड टायरल यांच्या नेतृत्वात एक गट सर्दीबद्दल संशोधन करीत होता. त्यांना देखील, सर्दीच्या रुग्णांच्या टिशू कल्चरमध्ये एक नवीन प्रकारचे व्हायरस असल्याचे दिसून आले होते.

टायरेलच्या गटाने इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली याची तपासणी केली असता त्यांना आढळले की हा विषाणूसारखा आहे जो १९३० च्या दशकात ब्राँकायटिस असलेल्या कोंबड्यांमध्ये आढळला जातो. त्यावर अधिक अभ्यास करण्यात आला.

प्राण्यांपासून मानवांना संक्रमित करणारा हा कोरोनाव्हायरस असल्याचं पहिल्यांदा सिद्ध झालं होतं.

हार्वर्ड मेडिकल स्कूलचे संशोधक डॉ. केन मॅकइंटोश यांनी स्पष्ट केलं “हा व्हायरस प्राण्यांमध्ये सापडला जातो. कोंबडींमध्ये एव्हीयन ब्रॉन्कायटीस नावाचा विषाणू आढळतो जो मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो”.

हॅमरे आणि टायरेल यांच्या संशोधनाच्या वेळीच, डॉ. मॅकइंटोश हे राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या पथकाचे एक सदस्य होते जे सामान्य सर्दीची कारणे शोधत होते.  डॉ. मॅकइंटोशच्या टीमने ओसी ४३ म्हणून ओळखला जाणारा आणखी एक व्हायरस शोधून काढला होता, त्यांनी त्याला मानवी कोरोनाव्हायरस म्हणलं होतं ज्या व्हायरसचा श्वसनावाटे संक्रमण होऊ शकतं.

‘कोरोनाव्हायरस’ हा व्हायरस एक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली पाहिला गेला, आणि त्यावरून कळलं कि, त्या व्हायरसचा पृष्ठभाग सूर्याच्या बाह्य थरासारखी दिसतो, ज्याला कोरोना व्हायरस म्हणलं जातं.

त्यानंतर २००३ मध्ये सार्सचा उद्रेक झाला, ज्याची सुरुवात चीनमध्ये कोरोनाव्हायरसपासून झाली आणि शेवटी हा व्हायरस २९ देशांमध्ये पसरला. या रोगाचा फक्त ८,०९६ लोकांवर संसर्ग झाल्याची पुष्टी झाली असली तरी, त्यात ७४० जण मृत्युमुखी पडले होते. ह्या आकडेवारीवरून अत्यंत धक्कादायक मृत्यूचा दर स्पष्ट होतो आहे हे कळल्यावर संशोधकांनी पुन्हा या विषाणूकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली.

तेव्हापासून, सर्दी होण्यासाठी कारणीभूत असणार्‍या आणखी दोन कोरोनाव्हायरस शोधण्यात आले.

NL ६३, HKU1 आणि हे 2012 पर्यंत कुणालाच माहिती नव्हते,संशोधनाच्या जवळजवळ 50 वर्षांनंतर व्हायरस सर्वांना माहिती व्हायला लागले होते. ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मारून रूग्णांमध्ये श्वसनाच्या बाबतीतली तीव्र लक्षणे उद्भवू शकतात, जर रुग्ण धडधाकट असेल, निरोगी असेल अशा  लोकांसाठी त्याचा प्रभाव बहुधा सर्दीपुरताच मर्यादित असतो.

ग्रीसमधील ती शिक्षिका अखेरीस तिच्या आजारातून बरी झाली आणि कृतज्ञतापूर्वक तिला श्वास घेण्यासाठी कधीही वेंटिलेटर वापरावे लागले नाही. 

सद्याची परिस्थिती पाहता, कोरोना व्हायरस मोठा जटिल विषय आहे आणि दुसरं म्हणजे हा व्हायरस अनुवांशिक स्तरावर सहज बदलू शकतो. अनुवांशिक परिवर्तनांमुळे कदाचित सार्स व्हायरसचे परिवर्तन होऊन कोरोना विषाणू म्हणून समोर आला असंही संशोधक म्हणतात. आणि आज याच व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे.

हे हि वाच भिडू :
Leave A Reply

Your email address will not be published.