युद्धात हात गमावलेल्या सैनिकाने पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते.

एक जवान आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करतो. युद्धात शहीद होऊन देशाला बलिदान देतात तर काही युद्धात जखमी होऊन, आयुष्यभर अपंगत्व येऊनही देशासाठी सेवा बजावत राहतात. असाच एक जवान ज्याच्या शरीराचा एक अवयव देशासाठी बलिदान दिला तरीदेखील देशासाठी अभिमान वाटावा असे कार्य त्यांच्या हातून झाले आहे, आपण बोलतोय मुरलीकांत पेटकरची,

ज्यांनी भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक आणले आणि आणखी एक देशसेवेच्या कार्यात आपले योगदान दिले.

ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय नीरज चोप्राचे देश कौतुक करत असताना, पॅरालिम्पिक गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीयासाठी एक विचार सोडतो.

मुरलीकांत पेटकर हे भारताचे पहिले पॅरालंपिक सुवर्णपदक विजेते आहेत.जर्मनीतील हेडलबर्ग येथे ऑगस्ट १९७२ च्या पॅराऑलिम्पिकमधील त्यांनी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. त्यांनी ५० मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत ३७.३३ सेकंदात विश्वविक्रम प्रस्थापित केला

हेडलबर्ग, पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे ते पहिले भारतीय खेळाडू होते.

याआधी पॅरालिम्पिकमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले नव्हते !

महाराष्ट्राच्या जलसिपाही म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरलीकांत यांनी युद्धात आपले हात गमावले. पेटकर सैन्यात सक्रीय होते पण १९६५ च्या भारत-पाक युद्धात हात गमावल्यानंतर त्यांनी पोहण्याची सवय लावून घेतली. पेटकर यांनी पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत ३७.३३  सेकंद वेळ घेऊन विश्वविक्रम केला. हात सुरक्षित असताना पेटकर हा चॅम्पियन बॉक्सर होता आणि हात नसताना त्याने पोहण्यात झेंडा दाखवला.

पोहण्याबरोबरच इतर खेळांमध्ये भाग घेतला

केवळ पोहणेच नाही, पेटकर यांनी पॅरालिम्पिकमध्ये भाला, अचूक भाला आणि स्लॅलम सारख्या खेळांमध्ये भाग घेतला. ते या खेळांच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आणि अंतिम स्पर्धकही बनले. अपंग झाल्यानंतर त्याने टेबल टेनिस आणि ॲथलेटिक्समध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले.

त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पेठ इस्लामपूर येथे झाला. ते भारतीय सैन्याच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्स (EME) मध्ये क्राफ्ट्समॅन रँक सैनिक होते.

१९६५ च्या युद्धात शरीराला खूप त्रास सहन करावा लागला

१९६५ च्या युद्धात त्यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तानविरुद्ध आपल्या शरीरात ९ गोळ्या अंगावर घेतल्या होत्या. त्यांच्या पाठीच्या मणक्यात अजूनही एक गोळी असल्याचे सांगितले जाते. यानंतर त्याचे शरीर अक्षम झाले. पेटकर यांचे स्वप्न होते ते म्हणजे ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकायचे, मात्र  आलेल्या अपंगत्वामुळे त्यांना पॅरालिम्पियन म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. संधी मिळाली खरी पण त्या मार्गात त्यांना अनेक अडचणी आल्या होत्या.

या अडचणींच्या काळात त्यांना मदत करण्यासाठी एक क्रिकेटर समोर आला, त्यांचं नाव होतं, विजय मर्चंट !

त्या वेळी पेटकरांसाठी हा मार्ग अतिशय कठीण होता. फंडिंगसाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला होता. त्यांना शक्य तितक्या खेळांमध्ये भाग घेऊन पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळवायचे होते. भारताचे माजी क्रिकेट कर्णधार विजय मर्चंट यांनी त्यांना फंडिंगसाठी खूप मदत केली. ते अपंगांसाठी एक स्वयंसेवी संस्था चालवत असत, ज्यातून पेटकरच्या तिकिटांसाठी पैसे दिले जायचे. अशा मोठ्या मनाच्या माणसामुळे पेटकर यांनी भारताला सुवर्ण मिळवून देण्यात यश आलं आहे असं म्हणावं लागेल.

पेटकर यांना पद्मश्री देखील मिळाला

१९७५ साली त्यांना महाराष्ट्राच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१८ मध्ये त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. सध्या ७२ वर्षीय पेटकर पुण्यात शांत जीवन जगत आहेत.

भारतासाठी पॅराऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्ण पदक पटकवणारे मुरलीकांत पेटकर यांनाही पद्म पुरस्कार घोषित झाला आहे. खरंतर १९६५ साली पाकिस्तान सोबतच्या युद्धात त्यांना अपंगत्व आलं. त्यानंतर डॉक्टरांनी पेटकरांना पोहण्याचा सल्ला दिला आणि अपंगत्वावर मात करत त्यांनी भारतासाठी पॅराऑलिम्पिक मध्ये पहिलं सुवर्णपदक पटकावलं.  याच संघर्षगाथेची दखल घेत शासनाने त्यांना पद्म पुरस्कार घोषित केला आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.