एक करोडच्या प्रश्नासाठी त्याने लाईफलाईन म्हणून वडिलाना फोन केला आणि..

सध्या टीव्हीवर नागराज मंजूळेंच्या कोण होणार करोडपतीने बराच धुमाकूळ घातला आहे. यापूर्वी हिंदी मध्ये स्वतः अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीमध्ये भारतीयांना करोडोंच्या स्वप्नात नेत होते. पण ही कन्सेप्ट कुठून आली ठाऊक आहे का?

Who wants to be millionaire नावाचा अतिशय लोकप्रिय अमेरिकन टीवी शो आहे. याच धर्तीवर भारतात कौन बनेगा करोडपती हा शो सुरु झाला होता, जो कि अत्यंत लोकप्रिय आहे. तर Who wants to be millionaire च बक्षीस दहा लाख अमेरिकी डॉलर होतं. तर हा किस्सा त्या शो मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या एका हटके भिडूचा आहे. त्याचं नाव जॉन कारपेंटर.

तर किस्सा असा आहे की जॉन कारपेंटर हा अमेरीकेतील महसूल विभागात IRS Internal Revenue Service IRS चा अधिकारी होता.(थोडक्यात तिथली mpsc , upsc पास होऊनभाऊ मामलेदार झाला होता.)

तेव्हा Who wants to be millionaire हा शो नुकताच टीवी वर आला होता. कमी काळात त्याची बरीच चर्चा झाली होती. या शो च्या बक्षिसाची रक्कमच इतकी होती की सामान्य अमेरिकी जनतेचे कुतूहल या शो ने वाढवले होते.

रात्री सगळी अमेरिका टीव्ही वर हा शो बघत असायची पण जॉनला त्यात काही मात्र रस नव्हता. तो त्याच्या कामात गुंग असे. एकेदिवशी जॉनच्या घरी पार्टी होती. त्याचाकडे काही मित्र आले होते जेवण करत असताना एका मित्राने टीव्ही लावला आणि Who wants to be millionaire बघू लागला. जॉनला नाईलाजाने त्यादिवशी शो बघावा लागला.

शो बघत असताना सूत्रसंचालकाने प्रश्न विचारला की जॉनच्या डोक्यात त्याचे उत्तर चटकन येत असे. जॉनच्या  लक्षात आले की आपल्यासाठी हा शो जिंकणे काही अवघड नाही. जॉनने या खेळत भाग घ्यायच ठरवलं आणि त्याने हॉटलाईन वरती विचारल्या जाणार्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली.

आणि दोनच दिवसांनंतर तो हॉट सीट वर बसला देखील.

कार्यक्रमाचा सूत्रधार होता रीजस फिलबीन. रीजस हा नावाजेलेला अभिनता आणि खेळांच्या कॉमेंटरीसाठी अमेरिकेत प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे.  रीजसने जॉनचे स्वागत केले . जॉन त्याच्या पत्नीबरोबर आला होता. रीजसने पटकन सर्व नियम जॉनला समजावले आणि खेळ सुरु झाला. पहिले तीन प्रश्न अत्यंत लिंबू टिंबू होते. जॉनने चटकन त्यांची उत्तर दिली. एकूण पंधरा प्रश्नांची उत्तरे त्याला दयायची होती दहा लाख डॉलर जिंकण्यासाठी.

रीजसने जॉन मधेच विचारले काल रात्री तू काय केलेस जॉन म्हणाला,

“मला दहा लाख डॉलर्स चा विचार करून काल झोपच लागली नाही”

सर्वजण हसले. रीजसने परत शो पुढे नेला आणि पुढचे प्रश्न विचारू लागला. जॉन एका नंतर एका प्रश्नाची बिनचूक उत्तरं देऊ लागला. रीजस फिलबीन सतत त्याला तुझ्याकडे सर्व लाईफ लाईन्स अजून शिलक आहेत लागल्यास तू त्या वापर अशी सूचना वेळोवेळी देत होता. जॉन मात्र गालात हसून नाही म्हणत असे.

असे चालूच राहिले रीजस प्रश्न विचारी सर्व पर्याय सांगे काही सेकेंदातच जॉन त्याचे ठामपणे कोणतीही लाईफ लाईन न वापरता बरोबर उत्तर देत असे. एवढाच नाही तर तो प्रत्येक उत्तर बरोबर सुंदर स्पष्टीकरण ही देत असे. भाव हवा करत होता . रीजस त्याचं कौतुक करतसे आणि पुढचा प्रश्न विचातर असे परत तेच चटकन जॉन बरोबर उत्तर देत असे. असं करत करत जॉन चौदाव्या प्रश्नावर यशस्वी रित्या आला ते ही कोणतीच  लाईफ लाईन्स न वापरता.

आत्ता मात्र शेवटचा प्रश्न रीजस जॉनला विचारणार होता. रीजसने जॉन चे अभिनंदन केले आणि एक महत्वाची सूचना दिली इथून  जर तू चुकेचे उत्तर दिलेस तर तुला फक्त  ३२००० डॉलर गेऊन परत जावे लागेल .त्यामुळे जपून खेळ तुझ्या सर्व लाईफ लाईन शिलक आहेत.जॉन शांत होता प्रेक्षकांमध्ये ही विलक्षण शांतता होती. आजवर कोणीच या शो मध्ये कोणीच पंधराव्या प्रश्न पर्यंत पोहचू शकलं नव्हतं.

ती सूचना जॉन ने ऐकली आणि शेवटचा पंधरावा प्रश्न जो जॉनला दहा लाख डॉलर देऊन त्याचे  आयुष्य बदलणार होता ,तो प्रश्न रीजसने विचारला. प्रश्न विचारल्यानंतर जॉन रीजसला म्हणाला मला  ‘फोन अ फ्रेंड’ ही लाईफ लाईन वापरायची आहे. माझ्या वडिलांना फोन लावा रीजसने जॉन चे वडील टोम यांना फोन लावला. सर्वाना वाटले  जॉनला उत्तर मोहित नाहीये आणि आत्ता जर त्याने चुकीचे उत्तर दिले तर अवघड होईल.

जॉन मात्र सगळ्यांची फिरकी घेत होता जॉन चे वडील फोन वर आले आणि रीजसने  मुलाचे सर्व प्रगतीपुस्तक वडिलांना अर्ध्या मिनटात सांगितले. वडील खुश झाले  आत्ता मात्र जॉन ला तीस सेकंदात वडिलांना प्रश्नाचे उत्तर विचारायचे होते जॉन चे तीस सेकंद सुरु झाले.सर्वांनी श्वास रोखले होते  वातावरणात सुन्न शांतता होती आणि त्यानंतर जे घडलं त्याने सर्वांनाच कोड्यात टाकल. 

जॉन बोलला,

” हाय डॅडी मी तुम्हाला कोणताच प्रश्न विचारण्यासाठी फोन केलेला नाही मी फक्त तुम्हाला हे सांगण्यासाठी  फोन केलाय की  मी दहा लाख डॉलर जिंकतो आहे,आणि मला सर्वात आधी तुम्हाला हि बातमी सांगायची होती.”

एका क्षणात वातावरण हलके झाले आणि प्रेक्षक जॉन साठी टाळ्या वाजवू लागले ,किंचाळू लागले . आणि मग जॉन ने शेवटच्या प्रश्नाचे ठामपणे उत्तर दिले आणि ते बरोबर होते. जॉन दहा लाख डॉलर जिंकला होता. प्रेक्षकांनी एकाच जल्लोष केला.

जॉन च्या पत्नीने खाली येऊन जॉनला मिठी मारली. जॉन भाऊ जिंकला पण अत्यंत संयमाने. नंतर जॉन भाऊ ची जगभर हवा झाली त्याचा व्हिडीयो जगभर वायरल झाला असंख्य लोकांनी तो पहिला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.