ती अशोक चक्र मिळवणारी CRPF ची एकमेव महिला पोलीस कॉन्स्टेबल ठरली.

13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद नावाच्या दहशतवादी संघटनांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली. या हल्ल्यात पाच दहशतवादी ठार झाले. त्याचवेळी दिल्ली पोलिसांचे सहा अधिकारी, संसदेत तैनात केलेल्या दोन सुरक्षा अधिकाऱ्यांसह आणि संसदच्या बागेत काम करणारे कर्मचारी देखील शहीद झाले.

या शहीदांपैकीच एक होती महिला कॉन्स्टेबल कमलेश कुमारी. 

जेव्हा दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला, तेव्हा सीआरपीएफच्या महिलांच्या 88 बटालियनच्या कॉन्स्टेबल कमलेश कुमारी यांचे पोस्टिंग संसदेच्या इमारत गेट नंबर 11 च्या बाजूला असलेल्या लोखंडी गेट नं. 1 वर होते. गेट नंबर 11 सर्व राजकारणी आणि अधिकाऱ्यांसाठी संसदेत प्रवेश करण्यासाठी वापरले जात होते. यावेळी येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यासाठी सुरक्षा रक्षक गेटवर तैनात करण्यात आले होते त्यात कुमारी देखील होत्या.

13 तारखेला सकाळी 11:40 वाजता कमलेश यांनी गोळ्या आणि बॉम्बस्फोटाचा आवाज ऐकला. त्या वेळी त्यांच्याकडे फक्त त्यांचे वायरलेस होते. दुर्दैवाने त्यावेळी संसदेतील कोणत्याही महिला कॉन्स्टेबलला कोणतीही शस्त्र देण्यात आली नव्हती. सीआरपीएफचे एक वरिष्ठ अधिकारी याबाबत म्हणाले होते,

“जेव्हा गोळ्याच्या आवाजात सर्व लोकांना त्रास होत होता तेव्हा कमलेश यांनी अशा परिस्थितीत पूर्णतः काम केले. प्रथम त्यांनीच गेट नंबर 11. च्या दिशेने जाणाऱ्या  मानवी बॉम्बरला पहिले होते”

तिने ताबडतोब आपल्या ड्यूटी ऑफिसर आणि गार्ड कमांडर यांना त्यांच्या वायरलेसवर ‘मानवी बॉम्ब’ बद्दल माहिती दिली. पण ते येईपर्यंत हा मानवी बॉम्बर गेट क्रमांक 11 पर्यंत पोहोचला होता, जिथून संसदेत जाणे सोपे होते. त्यावेळी तिने काही सीआरपीएफ जवान दहशतवाद्यांशी लढताना पहिले आणि आपल्या जीवाची पर्वा न करता त्या सुरक्षास्थानातून बाहेर आल्या. दुसरे सहकारी कॉन्स्टेबल असणाऱ्या सुखविंदर सिंगला यांना आवाज देत मानवी बॉम्बर आत जात असल्याच्या सूचना दिल्या.

त्यांनी दिलेला आवाज आणि सिंग यांना दिलेला इशारा अतिरेक्यांच्या लक्षात आला, कुठलीच शस्त्रे नसल्याने कमलेश यांना देखील प्रतिकार करणे अशक्य होते हे लक्षात घेऊन अतिरेक्यांनी गोळ्या झाडायला सुरवात केली.

या गोळीबारामध्येच कमलेश कुमारी यानी आपल्या जीवाची पर्वा न करता सुरक्षा अलार्म वाजवला त्यामुळे संसदेतील सगळेच सावध झाले, पण हा अलार्म वाजवतानाच कमलेश शहीद झाल्या. पण तिच्या धाडसामुळे आत घुसणाऱ्या मानवी बॉम्बरला सुखविंदर सिंग अडवू शकले, त्यानंतर त्यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली होती.

सिंग म्हणाले,

“कमलेश कुमारी या धाडसी स्त्रीमुळेच, एक मोठा अपघात टळला नाहीतर खूप मोठा अनर्थ घडला असता.”

सीआरपीएफच्या कॉन्स्टेबल कमलेश कुमारी ह्या भारतीय सुरक्षा दलांच्या इतिहासातील एकमेव महिला पोलीस कॉन्स्टेबल आहेत, ज्यांना अशोक चक्र मरणोत्तर देण्यात आले आहे .

कमलेश कुमारी उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील सिकंदरपुर या गावातल्या होत्या. ११९४ मध्ये त्या पोलीस दलात आल्या. त्यांच्या पश्चात त्यांचे पती आणि दोन मुली आहेत.

त्यांचे पती आदेश सिंह म्हणाले होते की,

“ कमलेश दोन मुलींची आई होती माझ्या मुलीना शहीद या शब्दाचा अर्थ देखील माहित नाही आहे, पण तिने मात्र आईच्या प्रेमाच्या आधी देशप्रेमाला महत्व दिले आणि आपले कर्तव्य पार पडले. पण देशासाठी शहीद झालेली माझी पत्नी कमलेश कुमारी हिचा मला अभिमान आहे”

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.