एक महिला ‘आर्मी डे परेडचं’ नेतृत्व करणार, ७१ वर्षाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होतय. 

“पिछलें साठ सालों मैं क्या किया.”  

या वाक्याशी संलग्न प्रश्न उत्तरे या लेखापुरते तरी विचारू नका, कारण हि बातमी कोणत्याही राजकिय पक्षाची नाही तर देशाची आहे. भारताला अभिमानास्पद वाटेल अशा बातमीची आहे.  

तर इतिहास असा आहे की ७१ वर्षांच्या आर्मी डे च्या इतिहासत पहिल्यांदा एक महिला आर्मी डे परेडचं नेतृत्व करणार आहे. दरवर्षी १५ जानेवारी रोजी भारतीय सेना दिवस साजरा करण्यात येतो.

भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनामुळे मोठ्या प्रमाणात दंगे चालू झाले होते.परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं हे सर्वात महत्वाचं काम असल्याने त्या वेळी तात्काळ भारतीय लष्करात कोणतेच बदल करण्यात आले नाहीत. मात्र वातावरण शांत होताच दिनांक १५ जानेवारी १९४९ ला तत्कालीन लष्करप्रमुख कमांडर जनरल रॉय फ्रांन्सिस रॉय बुचर यांनी आपला पदभार लेफ्टनंट जनरल (जे पुढे फिल्ड मार्शल झाले) के.एम. करियप्पा यांच्याकडे सोपवला. 

या दिवशी लष्करप्रमुख फिल्ड मार्शल के.एम. करियप्पा यांना लष्कराकडून मानवंदना देण्यात आली. त्यासाठी विशेष परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. हि प्रथा पुढे कायम राखण्यात आली. त्या दिवशी भारतीय सैन्य लष्कर दिवस / सेना दिन साजरा करत. या दिवशी दिल्लीस्थित अमर ज्योतीला वंदन करुन परेड आयोजित करण्यात येते. 

आर्मी सर्विस कोर २३ वर्षांनंतर या परेडमध्ये सहभागी होणार आहे आणि त्याचं नेतृत्व एक महिला अधिकारी करणार आहे. 

त्यांच नाव लेफ्टनंट भावना कस्तूरी.

गेल्या ७१ वर्षांच्या परेडच्या इतिहासात हि पहिली वेळ असणार आहे जेव्हा १४४ सैनिकांना एक महिला अधिकारी कमांड देणार आहे. बर या गोष्टी इथेच थांबणार नाहीत तर अजून दोन महिला अधिकारी देखील या परेडमध्ये सहभागी होणार आहेत आणि लेफ्टनंट भावना कस्तूरी यांच्याप्रमाणेच या दोन महिला अधिकाऱ्यांचा सहभाग देखील ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. 

दूसऱ्या महिला अधिकाऱ्यांच नाव आहे शिखा सुरभी.

Screen Shot 2019 01 09 at 4.06.12 PM

शिखा सुरभी या कॅप्टन आहेत आणि त्या भारतीय लष्कराच्या डेअरडेव्हिल्स टिमच्या देखील हिस्सा आहेत. आत्ता हि डेअरडेव्हिल्स टिम म्हणजे बाईक्स स्टंट करणारे भारतीय लष्कराचे जवान. अभिमानाची गोष्ट अशी की या एकट्या डेअरडेव्हिल्स टिमच्या नावावर २४ वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 

शिखा सुरभा देखील याच टिमच्या हिस्सा आहेत. लष्कर दिवसानिमित्त डेअरडेव्हिल्स टिमचा हिस्सा होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

तिसऱ्या महिला अधिकारी म्हणजे, कॅप्टन भावना सयाल. 

कॅप्टन भावना सयाल या भारतीय सैन्यातील सिन्गल कोअर टिमच्या सदस्या आहेत. ट्रान्सपोर्टेबल सेटेलाईट टर्मिनल घेवून त्या या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. तिन्ही दलांचा जोडण्याच महत्वाच काम त्यांच्या टिममार्फत केलं जात. 

आत्ता या गोष्टी गेल्या ७१ वर्षात झाल्या नाहीत त्या आज पहिल्यांदा होत आहेत हे सत्यच. 

हे ही वाचा. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.