जगातल्या या श्रीमंत फॅमिलीनं चक्क एक महायुद्ध घडवून आणलं होतं

जगात एकापेक्षा एक श्रीमंत व्यक्ती आहेत. काहींची तर इतकी संपत्ती आहे, त्यांच्या पुढच्या काही पिढ्या काहीच न करता बसून निवांत खाऊ शकतात. दरवर्षी मार्च महिन्यात फोर्ब्स या श्रीमंतांची लिस्ट जाहीर करत. यातल्या काहींची श्रीमंती ही वाड-वडिलांपासून चालत आलीये, तर कोणी स्वतःच्या हिमतीवर कमवलीये.

इतिहासात पण अशीच काही लोक होऊन गेली, ज्यांच्याजवळच्या पैशांसमोर एलन मस्क, जेफ बेझोससारखी माणसं काहीच नाही. त्यातलंच एक नाव म्हणजे रोथ्सचाइल्ड. जे अनेक शतकांपासून युरोपमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे.

पण या रोथ्सचाइल्ड कुटुंबाबद्दल विशेष असं सांगायचं म्हणजे यांच्याकडं अफाट संपत्ती तर होतीच, पण सोबतच इतिहास बदलण्याची क्षमता देखील होती.  काहींच्या म्हणण्यानुसार हे कुटुंब गॉसिपचा भंडार आहे. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहितेय.

असं असलं तरी रोथ्सचाइल्ड परिवाराचे सध्याचे वंशज युरोपमधील सर्वात श्रीमंत लोक आहेत. या कुटुंबाची संपत्ती एवढी आहे कि, जिचा एकून आकडा अजूनही कोणाला ठाऊक नाही. त्यामागचं कारण म्हणजे या कुटुंबाचे व्यवसाय आणि त्यांची वंशज विस्तारलेले आहेत. त्यामुळे यांच्या एकूण संपत्तीचा अंदाज लावणं कठीण आहे.

तरी कोणी म्हणत कि, हे कुटुंब ४०० बिलियन डॉलर्सचे मालक आहेत. तर कोणी म्हणत २ ट्रिलियनचं. तर काहींच्या म्हणण्यानुसार या कुटुंबाकडे ५०० ट्रिलियन डॉलर आहेत, पण हे सगळे नुसतेच अंदाज आहेत. कारण एका सर्वेनुसार अख्ख्या जगात फक्त २५० ट्रिलियन डॉलर आहेत.

तर या कुटुंबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण जाणून घेऊया :

या कुटुंबाने आर्थिक व्यवहार आणि बँकिंग क्षेत्रात केलेले काम आजच्या आर्थिक रचनेचा पाया मानले जाते. गुंतवणुकीच्या संकल्पनेचा पहिला प्रयत्न त्यांनीच केल्याचा समजले जाते. हे पहिले लोक होते ज्यांनी बँकांमधून पैसे काढले आणि कॉलनीच्या सरकारी प्रकल्पांमध्ये गुंतवले. याचाच त्यांना जास्त फायदा झाला. आज जगभरातील बँका त्याच मॉडेलचा वापर करतात. मुळात ही बँकिंग सिस्टीम आहे.

इंटरनॅशनल बँकिंग

२-३ शतकांपूर्वी औद्योगिक क्रांती होत असताना बँकिंग हा पूर्णपणे नवीन प्रकार होता. पैसे ठेवणे, गुंतवणूक करणे, कर्ज देणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे हे सगळं अवघड होतं.या सगळ्यात इंटरनॅशनल बँकिंग तर विसरा.

यावेळी रोथस्चिल्ड युरोपच्या वसाहतींमध्ये स्वतःच्या बँका स्थापन करणारे पहिले बँकर होते.  त्यांनी आफ्रिका आणि पूर्व आशियातील बहुतेक बँका स्थापन केल्या. त्याच्याजवळ एक अतिशय मजबूत आणि प्रगत इंट्रा-बँक कम्युनिकेशन सिस्टीम होती. ही खऱ्या अर्थाने पहिली इंटरनॅशनल बँक होती.

१८०० च्या शतकात त्यांनी आफ्रिकेच्या वसाहतीकरणासाठी पैसे पुरवले. एकेकाळी ते युरोपमध्ये बसल्या- बसल्या अमेरिकेतल्या सगळ्यात मोठ्या बँकेवर नियंत्रण ठेवायचे. 

पैसे कमवण्यासाठी पहिले महायुद्ध सुरू केलंत

पहिल्या महायुद्धात त्यांनी दारूगोळा, शस्त्रे आणि मेडिकल सामान विकून बक्कळ पैसे कमावला होता. अनेक थ्येअरीनुसार त्यांनी अशी परिस्थती निर्माण केली ज्यामुळे पहिल्या महायुद्धाला सामोरे जावे लागले, यातूनही त्यांनी भरपूर कामे केली.

 ‘शेरलॉक होम्स: अ गेम ऑफ शेडोज’ या चित्रपटातील प्रोफेसर मोरियार्टी हे रोथस्चिल्ड कुटुंबावर आधारित असल्याचे सांगितले जाते.

नुसतं पाहिलं महायुद्ध नाही तर या कुटुंबानं दुसऱ्या महायुद्धातही अलाइज आणि सेंट्रल पॉवर दोघांना फंडिंग केली आणि यावेळी डबल पैसा कमावला. हा दुसरं महायुद्ध त्यांच्यामुळे झाले नसले तरी, असा तर्क दिला जाऊ शकतो की, त्यांच्यामुळं पहिलं महायुद्ध घडलं, ज्यामुळे जर्मनीची अर्थव्यवस्था कोलमडली आणि नंतर दुसरे महायुद्ध झाले.  

सोबतच असेही म्हंटले जाते कि, त्यांनी पर्ल हार्बरवर हल्ला करण्यासाठी जपानला मदत केली, त्यानंतर अमेरिकेने युद्धात उडी घेतली.

या कुटुंबानं युद्धाच्या वेळी लंडनच्या राणीला देखील पैसे पुरवले होते.  या कुटुंबानं जगभरातल्या प्रत्येक युद्धात फंडिंग करूनच भरपूर पैसे कमवल्याचं बोललं जात. ज्यामुळे फंडिंग करून हा परिवार त्या देशाला एकप्रकारे बंदी तर बनवायचाचं, सोबतच युद्ध संपल्यावर त्या देशात गुंतवणूक सुद्धा करायचा.

रोथस्चिल्ड कुटुंब आज मोठ्या प्रमाणात अंडरग्राउंड आहे, सार्वजनिक जीवनापासून दूर आहे. या कुटुंबातील वंशज आजही युरोपमधील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये मोडतात. त्यांना युरोपमधील सर्वात मोठ्या गुंतवणूक दलाली कंपन्यांचे मालक म्हणूनही ओळखले जाते.

या कुटुंबासंदर्भांत असाही दावा केला जातो कि, आज संपूर्ण कुटुंब शॅडो ऑर्गनायझेशन म्हणून काम करते आणि जवळजवळ प्रत्येक आंतरराष्ट्रीय बँकेत त्यांची हिस्सेदारी आहे. असं म्हंटल जात की, सर्व प्रमुख बँकांमध्ये त्यांची ३०% हिस्सेदारी आहे. तसेच या कुटुंबाबद्दल असंही म्हंटल जात कि, यांच्याकडं जगातली ८० टक्के संपत्ती आहे.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.