हवा एकट्या कामसुत्र पुस्तकाची झाली, दम तर या पाच पुस्तकात देखील होता !

बोलभिडू आत्ता लागलां का तुम्ही पण सेक्स एज्युकेशन द्यायला. च्या गावात आमचा मुद्दा काय आहे. की सेक्स हा शब्द आला की आम्ही खऱ्या आयुष्यात पण थबकतो आणि आर्टिकल लिहताना पण. त्याचं कारण काय तर कितीही प्रामाणिक आणि माहिती द्यायचं म्हणलं तर आपल्याकडे आम्ही नाय जा पासून सुरवात होते ती तुम्ही पाकिस्तानात जा वर येवून थांबते. 

पण यंदा म्हणलं, सांगू या राव. विषय पण महत्वाचा आहे त्यात इंटरेस्टिंग पण आहे. तर विषय असाय की कामसुत्र, कामसुत्र असच आपण पहिल्यापासून ऐकत आलोय. जस काही कामसुत्र हे एकमेव पुस्तक लिहण्यात आलय. वात्सायना हा एकमेव लेखक भारतात होवून गेलाय. 

पण हा विषय वेगळाय हित पाच अशा पुस्तकांची लिस्ट आहे ती कामसुत्र लिहण्याच्या पुढे मागे लिहण्यात आली होती. ती देखील आपल्याच संस्कृतीचा भाग आहे.

फक्त वात्सायनाकडे PR टिम होती त्यात त्याने EVM मशीन पण हॅक केल असणार. त्याशिवाय एवढी हवा होते का ? 

असो तर वाचा हवा न झालेल्या या पाच पुस्तकांबद्दल ! 

१) पंचशायक – 

ज्योतिरीश्वर. या माणसाचा असा दावा होती की मी देवाबरोबर बोल्लो. त्यानं जे सांगितलं ते लिहून टाकलं. खरखोटं देवाला माहिती. या पुस्तकात ६०० पद आहेत आणि ते पाच भागात विभागले गेलेत. त्यात लवगुरू बद्दल लिहण्यात आलयय गोनिकपुत्र, मुलगेद आणि नंदिकेश्वर सारख्या नावांचे लवगुरू या पुस्तकात येतात म्हणे. 

२) रतिरहस्य.

वेणुदत्त नावाच्या राजाला खुष करायला कोकोक्का (कुकु नव्हे ) नावाच्या कवीनं हा ग्रॅथ लिहला. साधी गोष्ट होती राजा खुष झाला पाहीजे.राजा आंबटशौकिन होता म्हणे मग त्यानं उचित मार्ग स्वीकारला. रतिशास्त्रालाचा अनुवाद हिंदीत झाला. हिंदीत ट्रान्सलेट करताना लोकांनी कोकोक्काचं कोका केलं. आणि पुस्तकाचं नाव कोकाशास्त्र. 

३) स्मरप्रदीपिका.

स्मरप्रदीपिका म्हणजे प्रेमाची ज्योति. प्रेम आणि सेक्स आणि बरचं काही…(कॉफी आणि बरचं काही त्या सुरात हे वाचावं)  अस या पुस्तकात बरच काही सांगण्यात आलय. यात ४०० पद आहेत म्हणे. 

४) रतिमंदरी.

कवि जयदेव यांने ५०० वर्षांपुर्वी हे लिहून हातावेगळं केलं.  १२५ पद आहेत यात. छोटं, सरळ साधं अस वर्णन हे पुस्तक वाचणारे करतात. असो. 

५) रसमंजरी. 

गणेश्वर नावाचे एक ब्राम्हण व्यक्ती. त्यांचा मुलगा भानुदत्त. याने हे पुस्तक लिहले. संस्कृतमधल्या या पुस्तक तीन भागात आहे. विशेष म्हणजे सेक्स पोझिशनच्या पलिकडे जातं या पुस्तकात स्त्री आणि पुरूष आणि त्याचं बिहेवियर यावर गप्पा मारण्यात आल्या आहेत 

टिप –  यातील कोणतेही पुस्तक आमच्याकडे नाही. कृपया इनबॉक्सात संपर्क साधू नये. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.