क्रिकेटमध्ये फक्त बॅटवरून पण खूप भांडण झाली आहेत.

आपण लहानपणी क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली तेव्हा आपल्याला पहिल्यांदा प्लास्टिकची बॅट आणि बॉल इतकच काय ते हातात आलेलं. थोडं मोठ झाल्यावर मग लाकडाची फळी, शाळेतली पॅड आली. मग कधी तर एखादा दोस्त बॅट घेऊन यायचा आणि रबरच्या बॉलने खेळणे व्हायचे.

ज्याची बॅट असायची तो भांडून पहिली बॅटींंग मिळवायचा. 

त्यावेळी लेदरच्या बॉल बद्दलही एक वेगळीच उस्तुकता असायची. तो बॉल फार भारी असतो, चांगला जोरात बसतो वगैरे. तेव्हा लेदर बॉलने खेळण्याची इच्छा तर दूर साधा बॉल हाताळून बघण्याचा चान्स मिळाला नाही. बॅटच्याबाबतीत बोलायचे झाले तर तेव्हा डीएससीच्या बॅटचा बोलबाला होता. त्यातही बॅटचे वेगवेगळे प्रकार होते. बॅटची लांबी, रुंदी, जाडी यावर ते बॅटचे प्रकार असायचे.

यावरून एक गोष्ट आठवली ती म्हणजे, लहानपणी सगळे म्हणायचे की “ सचिन तेंडुलकरची बॅट क्रिकेट मधील सर्वात जाड आणि वजनदार बॅट आहे.” आणखी एक “ बॅट खालच्या बाजूने जास्त निमुळती असेल शॉट्स भारी मारता येतात.”

परत नवीन बॅट घेतल्यावर तिचे हँँडल निघून जाऊ नये म्हणून फेविकॉल मध्ये दोरा भिजवून त्याने बॅटची बाईंडिंग केली जायची. तर ह्या झाल्या गल्ली क्रिकेटच्या गोष्टी, जागतिक क्रिकेट मध्ये बॅटचा एक इतिहास आहे. ज्यात वेगवेगळ्या आकार प्रकारच्या बॅट खेळाडूंनी वापरल्या आहेत. त्यातला काही बॅट्स चर्चेचा आणि वादाचा विषय बनल्या होत्या.

१. रुंद बॅट

The cricket wide bat

१७७१ मधील एका घटनेने रुंदी वरून क्रिकेट बॅटच्या नियमात बदल घडवून आणला. चेर्सेई आणि हॅमबल्डन यांच्यात मॅच चालली होती. त्यावेळी थोमास व्हाईट हा एकदम रुंद बॅट घेऊन खेळण्यास उतरला. त्याने स्टंपस पूर्णपणे झाकल्या जात होते त्यामुळे तो ऑउट होण्याचा प्रश्नच निर्माण नव्हता. त्यावर हॅमबल्डन संघाने रुंद फळीच्या वापरचा निषेध करत याचिका दाखल केली. नंतर बॅटची कमाल रुंदी चार चतुर्थांश इतकी ठरवण्यात आली.

 

२. अॅल्युमिनियमची बॅट

lillee border

१५ डिसेंबर १९७९ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज डेनिस लिली याने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात एल्युमिनियमची बॅट वापरली होती. हे तेव्हा लक्षात आल तो धावा घेत असताना बॉल जेव्हा त्याच्या बटवर आदळून आवाज झाला. त्यानंतर त्यावर बरेच वाद होऊन आयसीसी ने त्या एल्युमिनियमच्या बॅटवर अखेर बंदी आणली.

३. पृष्ठभागावर कार्बन असलेली बॅट

1572946 3x2 340x227

हि बॅट २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पोंटिंग याने खेळात आणलेली. या बॅटच्या पृष्ठभागावर कार्बनचा एक पातळ थर असायचा. याच बॅटने खेळत रिकी पोंटिंग याने २००४-०५ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात द्विशतक केले होते. त्यांनतर आयसीसी या बॅटवर आपेक्ष घेत आंतरराष्ट्रीय सामन्यात या बटने खेळण्यावर बंदी घातली. सोबत ती बॅट तयार करणाऱ्या कंपनीने त्याच प्रोडक्शन बंद केले.

४. मुंगुस बॅट

screen captures25 1432667182 800

हि बॅट सुद्धा ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथेव हेडन याने खेळात आणलेली. आयपीएल मध्ये चेन्नई संघाकडून खेळताना हि बॅट वापरली होती. ह्या बॅटचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीच्या बॅटपेक्षा हिच्या हँँडलची लांबी अधिक व ब्लेडची लांबी कमी होती. आयपीएल मध्ये हेडनने केलेल्या फटकेबाजीने ही बॅट चांगलीच गाजली होती. पण तिची रचना पाहता ती जास्त काळ टिकली नाही आणि लगेचच क्रिकेट मधून नाहीशी झाली.

५. रंगीत बॅट

Andre Russell Gold bat

२०१५ मध्ये वेस्ट इंडीजचा क्रिस गेल याने बिगबॅश लीग मध्ये सोनेरी रंगाची बॅट वापरली होती, जी भारतात बनवण्यात आली होती. तेव्हा अनेकांनी त्या बॅटमध्ये धातू वापरला असल्याची शक्यता व्यक्त करत टीका केली होती. पण तसे काही नसून बॅटला केवळ रंगवण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते. परत एक वर्षानंतर आंद्रे रसेल याने बिगबाश लीगमध्ये अशीच काळ्या रंगाची बॅट वापरली होती. तेव्हा बॉलवर काळे डाग पडत असल्याची तक्रार प्रतिस्पर्धी संघाने केल्यावर अशा रंगीत बॅट वापरण्यावर निर्बंध घालण्यात आला.

हा झाला बॅटेचा इतिहास. बाकी आपल्या लहानपणी जयसूर्याच्या बॅटमध्ये स्प्रिंगा होत्या म्हणून पण आपण भांडणं केली होती. पण हा काही इतिहास नाही आणि कोणाला सांगायची सोय पण नाही. बरोबर ना?

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.