ब्रिगेडियर सरस्वती यांनी आजवर जवळजवळ ३००० हून अधिक जणांचा प्राण वाचवलाय…
सैन्य म्हंटल्यावर आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा काय येत तर तो म्हणजे सैनिक. देशाच्या सीमेवर लढणारा एक जवान. यायला पण पाहिजे, कारण सैनिक आपल्या देशाचा अभिमान तर आहेतच पण त्यांच्याच जीवावर आज आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत.
पण एखादा देश आपल्यावर आक्रमण करतो किंवा मग देशाच्या सरहद्दीवर नेहमीच्या ज्या चकमकी घडतात ते सगळं आपल्या विचारांच्या पलीकडे असतात. कारण या चकमकी गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या रूपातच असतात. जेव्हा अशा एखाद्या चकमकीत आपले सैनिक जखमी होतात तेव्हा त्यांच्यवर जे उपचार करतात ते ही सैनिकच असतात.
डॉक्टर नर्सेसच्या रुपातले सैनिक.
अशाच एका महिला नर्स आणि सैन्यातल्या ब्रिगेडियर एस. व्ही सरस्वती आहेत. लष्करी नर्सिंग सेवेच्या उपमहासंचालक. आजवर त्यांनी जवळजवळ ३००० हून अधिक इमरजंसी आणि लाइफ सेविंग सर्जरी करण्याचा विक्रम केलाय. आणि म्हणूनच १५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरस्वती यांना राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित केलय.
कोण आहेत या ब्रिगेडियर एस. व्ही सरस्वती ?
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात जन्मलेल्या सरस्वती यांना लहानपणापासूनच भारतीय सैन्याचं आकर्षण होत. जसं त्यांना समजायला लागलं तेव्हा जो प्रण त्यांनी केला तो पूर्ण करूनच दाखवला. त्यांनी भारताच्या नर्सिंग सर्व्हिसेस (MNS) मध्ये २८ डिसेंबर १९८३ रोजी सेवा बजावायला सुरुवात केली. आज अखेर त्यांनी आपल्या आयुष्यातले जवळपास ३५ वर्षांहून अधिक काळ सैन्यात सेवा केलीय.
पण सैन्यात सेवा बजावणं म्हणजे काय तर,
ऑपरेशन थिएटर नर्स म्हणून त्यांनी आजवर ३००० हून अधिक इमरजंसी आणि लाइफ सेविंग सर्जरीमध्ये सहभाग घेतलाय. त्यांनी त्यांच्या या सेवा काळात हजारो रेसिडेंट्स आणि नर्सेसना प्रशिक्षण दिलय. ब्रिगेडियर सरस्वती यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर MNS चं प्रतिनिधित्व केलं आहे.
त्यांनी ‘बेसिक लाइफ सपोर्ट’ मध्ये एक हजाराहून अधिक सैनिक आणि कुटुंबांना प्रशिक्षण दिलय. ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांनी हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी जे साहित्य लागत ते इंप्रोवाइज़्ड ड्रेप किट आणि जखमा शिवण्यासाठी धागे तयार केले आहेत. त्यांनी भारतातल्या बहुतेक लष्करी रुग्णालयांमध्ये काम केलंय. त्यांनी दिलेली सेवा बघूनच त्यांना MSN च्या उपमहासंचालक पदी बढती देण्यात आली.
त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे सरस्वतींना त्यांच्या कामामुळे फ्लोरेंस नाइटिंगल अवॉर्ड मिळालाय.
नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्या प्रोफेशनल्सना हा अवॉर्ड दिला जातो. आता तुम्ही म्हणाल नाव तर इंग्लिश वाटतंय ? हो नाव इंग्लिशचा आहे पण या नर्स नाइटिंगल यांचे भारतावर खूप उपकार होते.
युद्धामध्ये जखमी झालेल्या सैनिकी रुग्णांसाठी ही फ्लोरेंस नावाची एक नर्सच नव्हे तर एक देवदूत होती ! फ्लॉरेन्समुळे ब्रिटनमधील इस्पितळांच आणि नर्सिंग प्रोफेशनच रंगरुपच बदलल होत. फ्लॉरेन्सचा जन्म इटलीच्या फ्लोरेन्स शहरात झाला, त्यामुळे तिच नावही फ्लोरेन्स ठेवण्यात आलं.
ती ब्रिटनमधील एका उच्चवर्गीय कुटुंबातील होती. एकोणिसाव्या शतकातल्या युरोपियन परंपरेनुसार, १८३७ मध्ये नाईटिंगेल कुटुंबीयांनी आपल्या मुलींना युरोपच्या प्रवासाला नेले होते. फ्लॉरेन्सने या प्रवासाचा अनुभव तिच्या डायरीत खूप मनोरंजक पद्धतीने नोंदविला.
प्रवासाच्या शेवटी, फ्लॉरेन्सने आपल्या कुटुंबियांना सांगितले की,
देवाने मला एक आवाज दिला की तू माझी सेवा करावी. पण त्या दैवी आवाजाने हे नाही सांगितले कि,नेमकी सेवा काय करायची आहे.
फ्लॉरेन्सच ठरलं होतं कि, तिला सॅलिसबरी येथे जावून नर्सिंगचे प्रशिक्षण घ्यायचे आहे. पण आईवडील परवानगी देत नव्हते. पण ती मागे हटली नाही तिने आपलं नर्सिंगचं शिक्षण आणि त्यानंतर काम सुरूच ठेवलं. तिने तुर्कीच्या बराक इस्पितळात केलेल्या कामाचा परिणाम तीच नाव संपूर्ण जगभरात गाजलं. आणि ब्रिटनने ‘नेशनल हेल्थ सर्विस’ ची दिशा बदलली.
सर्व डॉक्टरांप्रमाणेच फ्लॉरेन्सने जंतूपासून रोगाचा प्रसार होण्यावर विश्वास ठेवण्यास सुरवात केली.
पुढं फ्लॉरेन्सचे लक्ष हे भारतातील शुद्ध पाण्याचा पुरवठा वाढविण्यावर होते. त्यावेळी ती डेटाही गोळा करत होती. आणि त्यावेळी फ्लॉरेन्सने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी मोहीम सुरू केली. जास्तीत जास्त लोकांना वाचविणे आणि त्यांना स्वच्छ वातावरण आणि पाणी पुरवणे हे फ्लॉरेन्सचे लक्ष्य होते. १९०६ पर्यंत भारत देशाबद्दलचे अहवाल फ्लॉरेन्सला पाठविले जात होते. पण तीच नंतर वृद्धापकाळाने निधन झाले.
भारत देश फ्लोरेंसने भारताला दिलेल्या योगदानामुळे नेहमीच तिचा कर्जदार राहणार आहे. तिचाच आदर्श घेत भारतातल्या ब्रिगेडियर सरस्वती आणि अनेक नर्सेस रुग्णांप्रतीचा सेवाभाव जपत आहेत.
हे हि वाच भिडू
- सगळं जग जिच्या नावाने नर्स डे साजरा करतं त्या फ्लोरेंसचे भारतावर देखील अनंत उपकार आहेत..
- पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान या नर्स मुळे इंग्लंड आणि जर्मनीमध्ये राडा झाला होता.
- जगावर राज्य करणारी व्हिक्टोरिया राणी एका भारतीय माणसाच्या प्रेमात पडली होती..