सचिनने इंग्लंडमध्ये क्रिकेटचं नाही तर फूड चॅलेन्जचा सुद्धा रेकॉर्ड केला होता…
हॅलो फॅमिली…..! चिकन लेगपीस हा आवाज सोशल मीडियावर कायम घुमत असतो. असेच खादाड लोकांसाठीच चॅलेंज असतात. इतक्या इतक्या मिनिटात संपवा थाळी बक्षीस घेऊन जा, एका मिनिटात चॅलेंज पूर्ण करा आणि गाडी जिंका वैग्रे असे अनेक चॅलेंज आपण सोशल मीडियावर पाहत असतो.हे फूड चॅलेंजच प्रमाण का आजचंच नाही तर गावाकडं सुद्धा लग्नामध्ये इतके गुलाबजाम खा, इतकी बुंदी खा नायतर खिशात भरून देईन वैग्रेचे चित्र आपण बघत असतो.
तर असाच एक फूड चॅलेंजचा किस्सा आहे सचिन तेंडुलकरचा. प्लेयिंग इट माय वे या आपल्या आत्मचरित्रात सचिनने या किस्स्याचा उल्लेख केलेला आहे. क्रिकेटच्या मैदानाव्यतिरिक्त खेळाडू दुसरेही खेळ खेळतात त्यापैकीच हा एक खेळ. इंग्लंड दौऱ्यावर संघ असताना सचिन आणि इतर टीममेट्स वेगवेगळ्या रेस्टोरंटमध्ये जेवायला जायचे आणि नवीन नवीन खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचे. यामुळे मनःशांती तर मिळायचीच पण परदेशातील वातावरण आणि त्या परिस्थितीत राहण्यास मदत व्हायची.
सचिन तेंडुलकरच्या एका मित्राने त्याला हॅरी रॅम्सडनच्या रेस्टोरंटमध्ये आवर्जून जा म्हणून सांगितले. पश्चिम यॉर्कशायरच्या गॅझलीमधील हॅरी रॅम्सडनचं ते रेस्टोरंट मासे आणि चिप्ससाठी प्रसिद्ध होतं. हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये हॅरीज चॅलेंज नावाचा एक कॉलम होता. हॅरीज चॅलेंजमध्ये एक पदार्थ होता. तो पदार्थ म्हणजे कॉड किंवा हॅडॉक सारखा मोठा मासा होता. चिप्स ब्रेड बटर आणि अन्य दोन साईड डिशेससुद्धा त्यात होत्या.
या चॅलेंजमध्ये तो भामोठा मासा एकट्या माणसाने लवकरात लवकर संपण्याचं चॅलेंज होतं. तो मासा इतका मोठा होता कि एकट्याला संपणं अवघड दिसत होतं. पण जो कुणी तो मासा संपवेल, चॅलेंज पूर्ण करेल त्याला हॉटेलच्या ग्रेट शेफची स्पेशल सही केलेलं प्रमाणपत्र मिळणार होतं. हि तिथे खूप मोठी संधी सचिन तेंडुलकरने मानली कि मैदानातच नाही तर मैदानाबाहेर सुद्धा आपण पराक्रम गाजवू शकतो.
सचिन मुळातच खवय्या होता म्हणून त्याने ते चॅलेंज एक्सेप्ट करण्याचा निर्णय घेतला. मासा, सॅलेड आणि त्याच्यासोबतच्या दोन स्पेशल डिशेस सचिनने आरामात संपवल्या आणि चॅलेंज पूर्ण केलं. सगळं हॉटेल सचिनला बघत होतं पण सचिनने ते फूड चॅलेंज आरामात पार केलं आणि हॅरी रॅम्सडनच्या चॅलेजला पूर्ण केलं. सचिनने चॅलेंज पूर्ण केल्यावर त्याला हॅरी रॅम्सडनच्या विशेष स्वाक्षरीसह रेस्टोरंटचं स्पेशल प्रमाणपत्र मिळालं.
क्रिकेट खेळताना बॉलवर असलेली सचिनची नजर इथं फक्त माश्यावर खिळलेली होती आणि बघता बघता तो मासा सचिनने फस्त केला आणि अवघड वाट्णारा फूड चॅलेंज पूर्ण केला. खवय्येगिरी करणाऱ्या लोकांसाठी असे स्पॉट बनवले जातात. रेस्टोरंटची विशेषता अशा चॅलेन्जमुळे वाढते. सचिनचा हा स्पेशल इन्सिडन्स तेव्हा बऱ्याच लोकांमध्ये गाजला होता.
हे हि वाच भिडू :
- थ्रो केला जॉन्टी ऱ्होडसने आणि एक आगळा वेगळा विक्रम नोंदवला गेला सचिनच्या नावावर.
- आचरेकर सरांच्या तालमीत सचिन, कांबळीपेक्षाही एक जबरदस्त बॅट्समन होता…
- वाईट संगतीला लागला आणि मुंबईत बॉम्बस्फोट केले, नाही तर तो देखील क्रिकेटचा सचिन असता…
- सचिनच्या या चुका पाहून वाटतं “तो देव नाही, तुमच्या आमच्या सारखा चुकणारा माणुसच”.