रोनाल्डो असो वा मेस्सी सगळेच पितात शाहूची लस्सी….
फुटबॉल जगणारं कोल्हापूर!
भावा आज दुपारी हाईस न्हवं स्टेडियम वर, मॅच हाय.
हा डायलॉग हमखास ऐकायला मिळाला कि समजायचं आपण कोल्हापुरात आहे. फुटबॉल आणि कोल्हापूर हे अतूट समीकरण आहे, कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन ह्या संस्थेच्या निरीक्षण आणि नियोजना खाली इथे गेले कित्येकी वर्षे फुटबॉल संस्कृती इथं जपली जातीये.
मुळात कोल्हापुरात राजश्री शाहू महाराजांपासूनच कला, खेळासाठी राजाश्रय मिळत आला आहे. आणि त्या राजाश्रयासोबतच लोकाश्रय सुद्धा हमखास. शहराच्या मध्यवर्ती भागात दोन मैदाने अगदी सर्व सुयोसुविधांसह एक शिवाजी स्टेडियम आणि दुसरं शाहू स्टेडियम. विशेष म्हणजे आणि यातलं शाहू स्टेडियम म्हणजे फुटबॉल शुकीनांसाठी पंढरीच, टर्फ .दिवाळी झाली कि हंगामाला सुरवात होते, १६ टीम सिलेक्ट होतात. त्यापैकी ८ सिनियर आणि ८ सुपर सिनियर.
शिवाजी तरुण मंडळ, पाटाकडील तालीम, दिलबहार, खंडोबा तालीम मंडळ,संध्यामठ,कोल्हापूर पोलीस ह्या टीम म्हणजे प्रमुख दावेदार. प्रत्येक टीम चा एक विशिष्ट असा फॉलोअर. आपल्या टीम ची मॅच म्हणजे मग दुपारनंतर ची सगळी काम कॅन्सल. सुरवात होते के.एस.ए. लीग ने. आणि मग एका मागून एक अश्या टुर्नामेंट्स होताच असतात, जून चा पाऊस सुरु होईपर्यंत.
कोल्हापूरच्या फुटबॉलच वैशिष्ट्य म्हणजे कालानुरूप बदलत गेला हा खेळ.
खेळाडूंचा लिलाव करून खेळवलेली लीग असो व लोकमत सारख्या दैनिकांनी घेतलेली रात्रीची फ्लड लाईट च्या प्रकाशझोतातली लीग, कायमच नवनवीन संकल्पना आणि त्याला शहरवासियांकडून मिळणारा प्रतिसाद उदण्डच राहिला आहे. शिवाजी पेठेतल्या साई कॅबेल नेटवर्क नि काही वर्षेपुर्वी महासंग्राम लीग नि तर स्पर्धेचा चेहरा मोहरच बदलून टाकला. मॅन ऑफ दि सिरीज ला अक्षरशः टाटा नॅनो मिळाली होती. पेठेतली शाळा महाराष्ट्र हायस्कुल, महाराजांची शाहू हायस्कुल म्हणजे फुटबॉल च हावर्डस. वाणिरे सर, रिची फर्नांडिस, या लोकांनी तर एक अखंड पिढी घडवली.
प्रत्येक टीम च्या एखाद्या खेळाडूची खेळायची स्टाईल एकदम फेमस.
दिलबहारच्या सच्या पाटलाची फ्री किक ला पब्लिक उठून उभारायचं.
मंडळ च कप्या साठे, प्रॅक्टिस च अजय गुजर, पाटाकडील च रुपया सुर्वे, रणव्या मेथे, खंडोबाचं ओम घाटगे, यापैकी एखाद्याच्या पायात बॉल आला कि जाळं फाडलंच म्हणून समजायचं. स्टेडियम मधला पब्लिक चा दंगा तर मॅच पेक्ष्या जास्त लक्ष्यात रहातोय. हलगीच ठेका, प्रत्यके टीम च्या समर्थकांची ठरलेली जागा, तिथून येणाऱ्या क्रीटीव्ह घोषणा (नाद खुळा पिवळा निळा, एकदाच घुसणार भगवा पांढरा हिरवा दिसणार), सगळंच कसं अगदी जिवंत. रोनाल्डो असो व मेस्सी सगळेच पितात शाहू ची लस्सी हि शाहू दूध संघाची ऍड तर खूपच फेमस झालेली.
मंडळ आणि पाटाकडील मॅच ला तर अक्षरशः कोल्हापूर बंद चा फील असतोय अजून पण, या दोन टीम म्हणजे कट्टर प्रतिस्पर्धी.
केनिया किंवा तत्सम आफ्रिकन देशातील बरेच विद्यार्थी कोल्हापुरात शिक्षणासाठी आहेत, आणि बहुतांश संघात हे परदेशी खेळाडू खेळतात.
म्हणजे कोल्हापूर चा हा फुटबॉल फक्त कोल्हापूर पुरता मर्यादित नाही हि गोष्ट निंद्य घेण्यासारखीच म्हणावी लागेल.
सगळ्यात मोठा आणि अभिमानास्पद काय असलं या कोल्हापुरी फुटबॉलबद्दल तर खेळ आणि स्पर्धा याच्या पुढं जाऊन जपलं जाणारी खिलाडूवृत्ती. मध्यंतरी शिवाजी तरुण मंडळाच्या रमेश पाटील च आजारपण असेल, किशोर घाटगेंच्या घरच्यांना मदत असेल नाहीतर आंतराष्ट्रीय स्पर्धा खेळायला निघालेल्या उमद्या खेळाडूला लागणारी मदत असेल. या सगळ्या प्रसंगात कोल्हापूरकर नेहमीच हेवेदावे बाजूला ठेऊन एकत्र येतात आणि आलेलं संकट निभावून नेतात. आणि हाच फुटबॉल माणुसकीचा धागा बनतो,
कैलास पाटील, युक्ती ठोंबरे, ओम घाटगे या प्लेयर नि तर आपल्या खेळाच्या जीवावर आणि कौशल्यावर आज शासकीय, निम:शासकीय नोकरी मिळवत करिअर घडवलीत.
आज कोप्पा अमेरिकाचा निकाल लागला, मेस्सीने पहिल्यांदाच नाव कोरलंय. अश्यावेळी कोल्हापूरचा फुटबॉल नाही आठवला तर नवलच.
- शंतनू पवार