इंग्लंडच्या गृहमंत्री प्रिती पटेल फुटबॉल आणि वर्णद्वेषाच्या वादात अडकल्या आहेत..

इंग्लंडच्या फुटबॉल चाहत्यांनी पुन्हा त्यांच्या फुटबॉलप्रेमापायी निर्लज्जपणाची सीमा गाठली आहे. २०२० च्या युरोच्या अंतिम सामन्यात वेम्बली येथे इटलीने इंग्लंडला पेनल्टीने पराभूत केले आणि इंग्लंडमध्ये असंतोषाची लाट पसरली.

आपल्याकडेही हेच चालतं आपण एखाद सामना हारला कि लगेच क्रिकेटप्रेमी कसलाही मागचा पुढचा विचार न करता जाळपोळ करायला सुरुवात करतात. इंग्लंड मधेही तेच झाले पण भारतीयांच्या पेक्षाही कित्येक पटीने खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी खेळांडूना ट्रोल केलं तेही त्यांच्या रंगावरून, वर्णावरून !

या टीममध्ये असणाऱ्या कृष्णवर्णीय खेळाडूंमुळे आपण हा सामना हरलो आहोत अशा प्रकारची टीका केली जातेय.

१९ वर्षीय बुकायो साकाला त्याच्या त्वचेच्या रंगामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले आहे आणि त्याच्या इतर साथीदारांप्रमाणेच जे दिसायला काळे किंवा तपकिरी आहेत त्यांच्याच मुळे संघाला पेनल्टी लागली आहे असं या ट्रोलर्स चा आरोप आहे.

 भारतीय वंशाच्या ब्रिटन च्या गृहमंत्री प्रीती पटेल देखील या वादात अडकल्या आहेत. 

क्रीडा क्षेत्रात होणारा वर्णद्वेषाच्या बाबतीत प्रीती पटेल ह्या सुरुवातीपासूनच दुट्टपी भूमिका घेत असल्याचे आरोप त्यांच्यावर होत आले आहेत.

नेमकं काय प्रकरण आहे ?

इंग्लंड संघाने सामना हरला पण तो सामना कृष्णवर्णीय खेळाडूंमुळे हरला असल्याचा आरोप काही फुटबॉलप्रेमीकडून सोशल मिडियामध्ये होतोय. संघातील निम्म्याहून अधिक खेळाडूंचे पालक किंवा त्यांचे पूर्वज जन्माने युनायटेड किंगडमच्या बाहेरचे  आहेत. संघाचा कर्णधार हॅरी केन हा गोऱ्या श्रमिक वर्गातून येतो. तो लंडनचा असून पार्ट-आयरीश वंशाचा आहे. तो पाच वर्षाचा असतांना आपल्य आईसमवेत जमैकाहून इंग्लंडला आला.

इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ फुटबॉलमध्ये अद्यापही अप्रत्यक्षपणे वर्णद्वेष असतो. कृष्णवर्णीय खेळांडूना ट्रोल करण्यात येते व त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडविण्यात येते.

पण याचा निषेध म्हणून किंव्हा वंशविद्वेषाचे उच्चाटन करण्याच्या हेतूने संपूर्ण संघ प्रत्येक सामना सुरु व्हायच्या आधी मैदानावर गेल्याबरोबर गुडघे टेकतो याला took the knee असं म्हणलं जातं. या वेळेसही तेच झाले होते. पण संघाच्या या कृतीवर ब्रिटनमधल्या सर्वात शक्तिशाली राजकारणी समजल्या जाणाऱ्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी टीका केली आहे कि,

“ह्या अशा कृती करून काही त्यातून काही निष्पन्न होत नाही.हे सगळ्या चळवळी दिखाऊ स्वरूपाच्या आहेत”. 

पण सामना हरल्यानंतर जेंव्हा याच कृष्णवर्णीय खेळाडूंला ट्रोल केलं जात होतं तेंव्हा मात्र प्रीती पटेल यांनी वर्णद्वेषाचा लढ्यात मीही सहभागी आहे या वादात उडी घेतली. इंग्लंडमधील काही फुटबॉलर्सने मात्र त्यांना सरकारच्या उच्च स्तरावरून मिळालेल्या पाठिंब्यामुळे फार प्रभावित झाले नाहीत.

तेंव्हा संघाने मात्र पटेल यांच्यावर  टीका केली कि जेंव्हा आम्ही अशा प्रकारच्या द्वेषाच्या लढ्याला निषध म्हणून काही चळवळी चालवल्या होत्या तेंव्हा तुम्ही आम्हाला ‘नाटकी’ म्हणलं होतं. ब्लॅक फुटबॉलपटूने त्यांच्यावर कडक टीका केली कि पटेल यांची दुटप्पी भूमिका आहे.  त्या फक्त राजकारण करत असल्याची टीका केली आहे.

२ वर्षांपूर्वी जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर अमेरिकेतलं वातावरण ढवळून निघालं होतं

आणि त्याचदरम्यान  अमेरिकेमध्ये ‘ब्लॅक लाईव्ह्स मॅटर’ ही मोहीमही चालवली होती. क्रिकेटमध्येही वर्णद्वेष होतोअसं सांगत, मला त्याचा अनेक वेळा सामना करावा लागल्याचा धक्कादायक अनुभव वेस्ट इंडिजचच्या ख्रिस गेलनेही केला होता.

याच पार्श्वभूमीवर या मुद्द्याला हात घातला होता, तो वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने देखील. त्याने असे आरोप केले होते कि, त्या वेळी पार पडलेल्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना मला ‘काळू’ म्हणलं जायचं, टीममधले काही जण मला या वर्णद्वेषी नावाने हाक मारायचे, असं सॅमीने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये म्हणलं होतं.

भारतातील खेळाडूंच्या या वर्तनामुळे तेंव्हा देशाला शरमेने मान खाली घालावी लागली होती.

काही वर्षांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू टेंबा बऊमाला देखील वर्णद्वेषाबाबतचा अनुभव आल्याचे सांगितले होते. त्याने अशीही खंत व्यक्त केली होती कि, आपल्या त्वचेच्या रंगाचा आपल्या कारकिर्दीवर प्रभाव पडतो.

१९६६ मध्ये जेव्हा इंग्लंडने फिफा विश्वचषक जिंकला होता तेव्हा संघात पूर्णपणे गौरवर्णीय खेळाडू होते. त्यानंतरच्या बारा वर्षांनंतर इंग्लंडच्या टीममध्ये पहिला ब्लॅक फुटबॉल खेळाडू म्हणून आला तो व्हिव्ह अँडरसन होय. 

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.