फ्रेंच राष्ट्रपतींच्या दौऱ्यात राफेल नंतरचं सर्वात मोठं डिल होऊ पाहतंय

न्यूक्लीयर सबमरीन नुसतं नावचं ऐकून अंगावर काटा उभा राहतो. समुद्राच्या पोटात गडप होऊन शुत्रूच्या गोटात घुसण्यासाठी आज सबमरीनला पर्याय नाही. पण हे महाकाय मशीन बनवणं पण सोपं नाहीए. 

जगात फक्त चारच देश सध्या न्यूक्लीयर सबमरीन बनवतात. फ्रान्स, अमेरिका,रशिया आणि चीन.

आता हे देश फक्त स्वतःच्या रक्षणासाठीच या सबमरीन बनवत नाहीत. दुसऱ्या देशांना विकून फायदा कमावणं हा ही त्यांचा प्रमुख हेतू असतो. पण यांची किंमत असते अब्जोंच्या घरात. त्यामुळं सगळ्याच देशांना हे परवडण्यासारखं नाही. पण काही देश असे असतात की त्यांना पडेल तेवढी किंमत चुकवून सबमरीनसारखी  शस्त्रास्त्रे घ्यावीच लागतात.

आता अशीच गरज निर्माण झालीय हिंदी महासागराभोवतालच्या देशांना. त्याला कारण कोण असणार तर उत्तर आहे चीन. चीननं आपल्या आजूबाजूच्या जवळपास सगळ्या देशांशी वैर निर्माण केलय. चीनची आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स यांची क्षमता एवढी वाढलेय कि आता दुसऱ्या देशांपुढे दोनच पर्याय आहेत एक तर चीनशी स्पर्धा करा नाहीतर चीनला शरण जा. ऑस्ट्रेलिया,भारत यांसारख्या देशांनी चीनशी फाईट करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळंच या देशांना काही करून शस्त्रास्त्रे घेणं भागच असतंय.

शस्त्रास्त्रे निर्यात करणाऱ्या देशांसाठी हे देश मोठे ग्राहक झालेत. फ्रान्सनं पण आपल्या बाराकुडा क्लासच्या पाणबुड्या निर्माण केल्या तेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया सारख्या शस्त्रास्त्रे आयात करणाऱ्या देशांवर डोळा ठेवला होताच. ऑस्ट्रेलियानं तर या सबमरीनसाठी करार ही केला होता. मात्र अमेरिकेच्या दबावाखाली ऑस्ट्रेलियानं हा करार तोडला. त्यांनतर मग या दोन देशांमध्ये चांगलीच जुंपली. ऑस्ट्रेलियानं आमच्या पाठीत खंजीर खुपसला असं फ्रांसनं म्हटलं तर फ्रांसनं खोटारडापना केल्याचं ऑस्ट्रेलियानं म्हटलं होतं. 

ऑस्ट्रेलियानं असा गुलीगत धोका दिल्यानंतर फ्रांसकडे फक्त भारताचाच पर्याय राहिल्याचं सांगितलं जातंय.

भारताकडे सध्या अरिहंत ही न्यूक्लीयर सबमरीन आहे. तसंच रशिया अजूनही काही सबमरीन देणार आहे. मात्र रशिया देणाऱ्या सबमरीन एकतर भाड्याने देते किंवा बनवून देते.

मात्र फ्रांस सबमरीन बरोबर ते बनवण्याचं तंत्रज्ञान ही देईल असं सांगण्यात येतंय. जर फ्रांसनं असं केलं तर असं तंत्रज्ञान देणारा फ्रांस भारतासाठी पहिलाच देश असणार आहे. 

आता न्यूक्लीयर सबमरीनबद्दल थोडं जाणून घेऊ.

न्यूक्लीयर सबमरीन न्यूक्लीयर आर्म्ड सबमरीनपेक्षा वेगळी असते. न्यूक्लीयर सबमरीनमध्ये अणुऊर्जेचा उपयोग सबमरीन चालवण्यासाठी इंधन म्हणून केला जातो. त्यासाठी सबमरीनमध्ये छोटा न्यूक्लीयर रियाक्टर बसवलेला असतो. 

डिझेल इंजिनमध्ये ऑक्सिजन घेण्यासाठी  सबमरीनला समुद्राच्या पातळीच्या वर यावे लागते त्यामुळं ती शत्रूंच्या विमानाच्या नजरेत येऊ शकते. न्यूक्लीयर सबमरीनमध्ये हा धोका टळतो. 

त्यामुळं न्यूक्लीयर सबमरीन असणं हे सामर्थ्यवान नेव्हीचं प्रतीक मानलं जातं. जर भारताच्या ताफ़्यात ही सबमरीन दाखल झाली तर भारतीय नौदलाचा हिंदी महासागरातला दबदबा कायम राहणार आहे. त्याचबरोबर या महासागरात चीनला भारत जोरदार फाईट देऊ शकणार आहे.

आता फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर येतील तेव्हा या सबमरीनच्या डीलवर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. फ्रांस कढून याआधीच भारताने रॅफेल विमानं घेतली आहेत. जर ही डील झाली तर भारत-फ्रांस संबंध अजून दृढ होण्यास मदत होणार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.