फ्रांसने मागचे दोन्ही फुटबॉल वर्ल्डकप स्थलांतरितांमुळेच जिंकले

पुढच्या काही तासांमध्ये २०२२ चा फुटबॉल वर्ल्डकप कोण जिंकणार हे जगाला कळेल. शेवटचा वर्ल्डकप खेळणारा मेस्सी अर्जंटिनाला कप मिळवून देणार का याकडे सुद्धा सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र फायनल पोहोचणाऱ्या फ्रांसची सुद्धा तेवढीच चर्चा होत आहे.

फ्रांस सलग दुसऱ्या वर्षी फिफा वर्ल्डकपच्या फायनल मध्ये पोचला आहे. किलियन एम्बाप्पे, ओलिवर गिरोड, एंटोनी ग्रीजमैन सारख्या स्टार खेळाडूंच्या दमवर फ्रांसने फायनल पर्यतचा पल्ला गाठला आहे. या संघातील अनेक खेळाडू हे आफ्रिकन वंशाचे आहेत. फ्रांसने आता पर्यंत दोन वेळा फुटबॉल वर्ल्डकप जिंकला आहे त्या दोन्ही वेळा स्थलांतरित खेळाडूंची भूमिका महत्वाची होती.

१९९८ मध्ये फ्रांसने तेव्हाच्या तगड्या ब्राझीला हरवून पहिल्यांदा फुटबॉल वर्ल्डकप जिंकला होता. ब्राझीलच्या टीम मध्ये तेव्हा रोनाल्डो, रिव्हाल्डो, रॉबर्टो कार्लोस सारखे स्टार प्लेयरचा भरणा होता. तरीही फ्रांसहा वर्ल्ड कप जिंकला होता.

फ्रांसने ही कामगिरी जिनेदिन जिदान, मिडफिल्डर मर्क्युरिअल यांच्यामुळे केली होती. जिनेदिन जिदान हा मुळाचा फ्रांसचा नव्हता. अल्जेरिया मधून त्याचे कुटुंबीय फ्रांस मध्ये स्थलांतरित झाले होते. अल्जेरिया हा देश आफ्रिका खंडात येतो. अल्जेरिया हा देश अनेकवर्ष फ्रांसच्या अधिपत्याखाली होता.

१९९८ चा फ्रान्सला फुटबॉल वर्ल्डकप जिंकून देण्यात जिनेदिन जिदानचा मोठा रोल होता.

त्यावेळच्या फ्रान्सच्या फुटबॉल टिम मध्ये घाना, आर्मेनिया सारख्या देशांमधून आले होते. फ्रान्सच्या संघावर काळे, पांढरे आणि अरब अशी टिका मीडिया मधून होत असायची. बहूसांस्कृतिक एकता म्हणून याकडे पाहिलं जात होत.

तर दुसरीकडे फ्रांसच्या फुटबॉल टिमला आंतरराष्ट्रीय मॅच मध्ये यश मिळवून देण्यात जिदान बरोबरच रेमंड कोप, मिशेल प्लॅटिनी, करीम बेंझेमा यांचे नाव घेण्यात येत.

तसेच २०१८ चा वर्ल्ड कप फ्रांसच्या जिंकणाऱ्या टीम मध्ये स्थलांतरितांची संख्या जास्त होते. २०१४ चा विचार केला तर फ्रांसच्या एकूण लोकसंख्येपैकी ९.१ टक्के लोक स्थलांतरित होते. दुसऱ्या महायुद्धानंतर कामगारांची भरणा करण्यासाठी फ्रांस मध्ये मोठे स्थलांतर घडवून आणले असल्याचे सांगितले जात.

काही काळानंतर यांतील कामगार हे फ्रांस मध्ये स्थायिक झाले. त्यांची मुले इथेच वाढली, शिक्षण घेतले आणि सेटल झाली. अशाच मुलांनी फ्रान्सला दोन फुटबॉल वर्ल्डकप जिंकून दिले. २०१८ च्या फ्रांसच्या टिम मध्ये मूळचे फ्रान्सचे असणारे फक्त ३ प्लेयर होते. बाकी सगळे प्लेयर एक तर स्थलांतरित होते किंवा त्यांच्या पूर्वज फ्रांस मध्ये आले होते.

महत्वाचं म्हणजे सध्याचा फ्रांसच्या टिम मधील स्टार खेळाडू किलियन एम्बाप्पे सुद्धा २०१८ च्या वर्ल्ड कप टिम मध्ये होता. त्याचा जन्म जरी फ्रांस मध्ये झाला असला तरीही त्याची आई अल्जेरिया वंशाची आहे तर वडील कॅमरुन येथील आहे.

दुसरं उदाहरण म्हणजे पॉल पोग्बाचा देता येईल त्याचा जन्म जरी फ्रान्समध्ये झाला असला तरीही त्याचे आई वडील गिनी मधून फ्रांस मध्ये आले होते. महत्वाचं म्हणजे त्याचे दोन सख्खे भाऊ गिनीच्या फुटबॉल टिम मध्ये सहभागी होते. गोलकिपर स्टीव्ह मंदांडा सुद्धा स्थलांतरित होता. त्याचा जन्म कांगो या देशात झाला होता.

अँटोइन ग्रीझमनचाही जन्म फ्रान्समध्ये झाला होता, परंतु त्यांचे वडील जर्मन आणि आई पोर्तुगीज आहे. प्रकारे स्थलांतरित प्लेयरनी फ्रान्सला दुसऱ्यांदा फुटबॉल वर्ल्डकप मिळवून दिला होता.

२०१८ मध्ये अभिनेता अमिताभ बच्चन ने सुद्धा फ्रांसच्या टिमने फुटबॉल वर्ल्डकप जिंकल्यानंतर ट्विट केले होते. त्यात वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल आफ्रिकेचा अभिनंदन केले होते.

सध्याच्या फ्रांसच्या टिम मधील डेओट उपमेकानो, ऑरेलियन चौआमेनी सारखे प्लेयर हे फ्रांस मध्ये स्थलांतरित आहे.

हे ही वाच भिडू 

यामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान मुलं मैदानात येतात..

कोल्हापूरात फुटबॉलचा विकास कोणामुळे झाला असेल तर तो शाहू महाराजांच्या प्रयत्नांमुळेच!

 

Leave A Reply

Your email address will not be published.