कँसर पेशंटचं रुग्णालय ते आझादी मोर्चा व्हाया पंतप्रधानपद, इम्रान खानचं गंडलं कुठं ?

भारतीय राजकारण्यांना जर विचारलं तुमची सुरुवात कुठनं झाली तर हमखास उत्तर मिळेल ते म्हणजे समाजकारणापासून. देशातील अनेक मोठ्या नेत्यांची सुरुवात सुद्धा समाजकारणापासून झाली आहे. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर ही संघटना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करेल असं सांगितलं होत.

असाच काहीसा प्रयत्न इम्रान खानने पाकिस्तानच्या राजकारणात केला होता.  

इम्रान खानची ओळख क्रिकेटर, पाकिस्तानचा माजी पंतप्रधान एवढीच सगळ्यांना माहित आहे. मात्र इम्रान खान याने क्रिकेट नंतर समाजकारणात झोकून घेतलं होत. त्यानंतर त्याला राजकाणार एवढ्या मोठ्या पदावर पोहचता आलं. 

खान कुटुंबीय हे मूळचे लाहोरचे होते. इम्रान खानचा जन्म पश्तुन कुटुंबात ५ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. इम्रान खान यांना ४ बहीण भाऊ होते. ते या सगळ्या भावंडात मोठे. यांचे शिक्षण पाकिस्तान आणि ब्रिटन मध्ये झाले. 

इम्रान खान यांना लहानपणापासून क्रिकेटची आवड होते त्याच कारण म्हणजे त्यांचे दोन चुलत भाऊ पाकिस्तानच्या राष्ट्रीय टीम मध्ये होते. मजीद खान आणि जावेद बुर्कि हे दोघेही  पाकिस्तानच्या क्रिकेट टिमचे काही काळ कॅप्टन होते. 

इम्रान खान पाकिस्तानकडून पहिली इंटरनॅशलन मॅच १९७१ ला खेळले. मात्र त्यानंतर त्यांना बराच काळ टिमच्या बाहेर बसावे लागले होते. त्याच कारण म्हणजे १९७१ पर्यंत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले नव्हते. १९७६ ला ग्रेजुएशन पूर्ण झाल्यानंतर ते टिम मध्ये परत आहे. १९८० पासून इम्रान खान पाकिस्तानच्या टिम मध्ये ऑलराउंडर्स म्हणून खेळू लागले होते. तर १९८२ ला त्यांना पाकिस्तानच्या टिमचे कॅप्टन करण्यात आले होते.

इम्रान खान खरा ओळखला गेला तो १९९२ मध्ये त्याने पाकिस्तनला मिळवून दिलेल्या वर्ल्ड कपमुळे

१९९२ नंतर इम्रान खानने लोकांच्या नजरेत परोपकारी अशी इमेज सेट करायला सुरुवात केली होती. पूर्वीची प्लेबॉय हि इमेज बदलून धार्मिक गोष्टींकडे वळला. त्याने सुफी पंथ स्वीकारला होता. हे सगळं सुरु असतांना त्याने पाकिस्तानातील सगळ्यात मोठे कॅन्सर हॉस्पिटल सुरु करण्याचा विचार करत होता. 

क्रिकेट मध्ये शिखरावर असतांना इम्रान खानच्या आईला कॅन्सर झाला होता. मात्र पाकिस्तान मध्ये कॅन्सरचे चांगले हॉस्पिटल नसल्याने त्यांना बराच त्रास शान करावा लागला होता. त्यांना अनेकवेळा लंडनला घेऊन जावं लागत होत. आणि तिथले महागडे औषधे पाहून त्यांना देशातील गरीब रुग्णाची आठवण येते असे. 

१९८५ मध्ये इम्रान खान याच्या आईचा कॅन्सरमुळे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या नावावर पाकिस्तानातील सगळ्यात मोठे कॅन्सर हॉस्पिटल सुरु करण्याचा विचार इम्रान खान यांच्या डोक्यात येतो. मात्र या काळात इम्रान सतत क्रिकेट खेळत असल्याने त्याचे या हॉस्पिटलकडे दुर्लक्ष झाले. दोन वर्षानंतर म्हणजेच १९८७ मध्ये खानने परत हॉस्पिटल सुरु करण्याच्या उद्देशाने हालचाली सुरु केल्या. 

कॅन्सर हॉस्पिटल उभे करण्यासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी अनेक कार्यक्रम घेतले. 

पहिलाच कार्यक्रम दुबई येथे घेण्यात आला होता. त्यात इम्रान खानला २० हजार डॉलर्स मिळाले होते. यानंतर त्यांना अनेक जण भेटत गेले आणि कमी पुढे चालत गेले. त्यातही त्यांना निधी संकलन करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 

इम्रान खान यांना कॅन्सर हॉस्पिटलसाठी लाहोर जवळील २० एकर जागा देण्यात आली. या हॉस्पिटलसाठी ७० कोटी खर्च अपेक्षित होता. मात्र इम्रान खान यांच्याकडे फक्त १ कोटी होते. त्यामुळे प्रकल्प वेळेत होईल का यावर शंका उपस्थित करण्यात येऊ लागली  होती. तसेच या हॉस्पिटल मध्ये रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार होते. 

दरम्यान १९९२ चा वर्ल्ड कप पाकिस्तानची क्रिकेट टिमने जिंकला. त्यावेळी इम्रान खान हे त्यावेळी पाकिस्तान टिमचा कॅप्टन होता. त्यामुळे साहजिकच लोक मदतीला पुढे आले. पुढे २ वर्ष इम्रान खान ने निधी संकलन केले आणि ३० डिसेंबर १९९४ ला शौकत खानुम मेमोरियल हॉस्पिटल उभे राहिले. 

या माध्यमातून इम्रान खान ने आपली इमेज बिल्डिंग केली 

१९९६ मध्ये इम्रान खानने पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफही नावाचा पक्ष स्थापन केला. स्थापन झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत १ टक्के मते सुद्धा त्यांच्या पक्षाला मिळाली नव्हती. पहिला उमेदवार निवडून यायला २००२ साल उघडावं लागलं. २००७ मध्ये पाकिस्तान मधील प्रमुख नेत्यांनी खासदारकीचे  राजीनामे दिले होते त्यापैकी इम्रान खान हे एक होते.

परवेज मुशर्रफ यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर २००८ च्या निवडणुकीत इम्रान खानच्या पक्षाने निवडणुकीतून माघार घेतली. २०१३ मध्ये ते नॅशनल असेंब्लीवर निवडून आले. यावेळी त्यांचा पक्ष तेहरीक-ए-इन्साफही पाकिस्तानातील दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष बनला होता.

२०१८ मध्ये पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान बनले

दिनांक २५ जुलै २०१७. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा. इम्रान खान यांच्या पक्षाने  ११६ जागा जिंकल्या आणि पाकिस्तानातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. ६ ऑगस्ट २०१८ रोजी, इम्रान खान यांची पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून नामांकन करण्यात आले आणि १८ ऑगस्ट २०१८ रोजी ते पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. 

 इम्रान खान सरकार महागाईला आळा घालण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वासदर्शक ठराव सादर केला.  पंतप्रधानांविरुद्धचा अविश्वासदर्शक ठराव विचारात घेण्यासाठी अध्यक्षांनी नॅशनल असेम्ब्लीचे सत्र २० मार्च २०२२ ला बोलावले होते. सत्ताधारी आघाडीच्या मित्रपक्षांचे सरकारच्या विरोधात मतदान करण्याचे संकेत, मात्र आपण राजीनामा देणार नाही यावर खान ठाम होते.

अविश्वासदर्शक ठराव न मांडता नॅशनल असेम्ब्लीचे सत्र लांबणीवर प्रमुख मित्रपक्ष विरोधकांना जाऊन मिळाल्याने खान यांनी बहुमत गमावले होते. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता इम्रान खान यांनी पाकिस्तान सरकारने मध्यावधी निवडणुका घेण्यात याव्यात म्हणून पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाच भिडू  

  

  

 

                                                                                                                    

Leave A Reply

Your email address will not be published.