तो सोनेरी रथ म्यानमार, थाईलंडवरून वाहत येणं कोणत्या लॉजिकमध्ये बसतय

भारताच्या मेनलॅंडला जवळपास ६,१०० किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे. पश्चिम किनारपट्टीला  मुंबईसारखं मोठं बंदर, गोव्यासारखं पर्यटनस्थळ, खाली केरळला बॅकवॉटर्स अशी सगळी भौगोलिक फीचर्स आहेत. मात्र पूर्व किनाऱ्याची भौगालिक स्तिथी बऱ्यापैकी वेगळी आहे. तिथं पश्चिमेसारखी जास्त बंदरं नाहीयेत. त्यातच पूर्व किनारे अजून एका कारणासाठी चर्चेत असतात ते म्हणजे तिथं सारखी धडकणारी चक्रीवादळं.

बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांमुळे पुर्व किनारपट्टी हाय अलर्टवर असते.

विशेषतः आंध्र प्रदेश आणि ओरिसाच्या किनाऱ्याला याचा तडाखा बसत असतो. असंच असानी चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीला येऊन धडकलंय. मोठ मोठ्या लाटा किनारपट्टीला येऊन धडकत आहेत. मात्र यावेळी या लाटांबरोबर एक इंटरेस्टिंग गोष्ट आंध्रच्या किनारपट्टीवर वाहून आली आहे. ती म्हणजे एक सोनेरी रथ. 

आंध्रच्या श्रीकाकुलाम किनारपट्टीवर आलेला हा सोनेरी रथ मग नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर आणला.

 याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 

मच्छीमारांनी हा रथ किनाऱ्यावर आणल्यानंतर  पोलिसांनी तो त्यांच्या ताब्यात घेतला आहे. मात्र असा सोन्याचा दिसणारा रथ आल्याने लोकांच्या कल्पनाशक्तीला मात्र एकंच धुमारे फुटलेत. कोणी याला दैवी चमत्कार म्हणतंय तर कोणी साजिश आणि यातूनच हा रथ नक्की कुठून आला असेल याच्या थेअरी पुढं येऊ लागल्यात. 

ज्यांनी हा रथ ताब्यात घेतला आहे त्या नोवपाडा पोलिसांचे म्हणणे आहे की रथावरील अक्षरे आणि त्याच्या संरचनेवरून असे सूचित होते की तो म्यानमारचा असावा. 

हा रथ टिनच्या पत्र्यापासून बनवलेला असून त्यावर सोन्याच्या  रंगाचा लेप देण्यात आला आहे. चाकांवर असलेल्या एका पूजा मंदिरासारखा तो रथ दिसत आहे.

तसेच या सोन्याच्या रथाची बांधणी पाहिल्यास तो म्यानमार किंवा थायलँड या देशातून येऊ शकते हे लॉजिक थोडं जवळचं वाटतं.

या देशात जे पॅगोडाज असतात ते डिक्टो असेच दिसतात. विशेषतः म्यानमारमध्ये फांग डाऊ ओ पगोडा फेस्टिवल ज्यामध्ये असे पगोडा बोटींवर बसवले जातात तिथलाच एकदा देखावा वाहून आला असेल असंही लॉजिक मांडण्यात येतंय.

WhatsApp Image 2022 05 12 at 12.52.32 PM 1
Phaung Daw Oo Pagoda Festival

मात्र मग असा मानलं तरी इतक्या लांबून हा रथ भारताच्या किनारपट्टीवर येऊ शकतो का? असा प्रश्न पडतो.

कारण आंध्रच्या विशाखापट्टणम बंदरापासून म्यानमारच्या किनारपट्टीमधलं अंतर आहे सुमारे १८०० किलोमीटर. तर थायलँडपर्यंतचे अंतर बघितलं तर ते आहे ५२२२ किलोमीटर. त्यामुळं इतक्या दूरवरून हा रथ इथं पोहचला असं म्हणायचं तर ते शक्य आहे का?

तर हो. याच्या मागचं पाहिलं कारण देता येइल असनी चक्रीवादळाचं. 

बंगालच्या उपसागरात तयार झालेलं असीन चक्रीवादळ वेगाने भारताच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ही चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळं समुद्रकिनाऱ्यावर ज्या लाटा धडकत आहेत त्याच्या बरोबरच हा रथ वाहून येण्याची शक्यता आहे. असनी चक्रीवादळामुळे ताशी 117 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहू शकतात. समुद्रात लाटाही त्याच इंटेन्सिटीने येत आहेत .

ताशी 117 किलोमीटर वेगाने जरी कॅल्कुलेट करायचं म्हटलं तर थाईलँडच्या किनारपट्टीपासून अगदी एका -दीड दिवसात हा रथ भारताच्या समुद्रकिनाऱ्याला येऊ शकतो. 

आता गणिती आणि भौगोलिक कारणं घेऊन तुमच्यापुढं ही शक्यता मांडली. पण याआधी अशा काही घटना घडल्या आहेत का ते बघू. याचं लेटेस्ट उदाहरण देता येइल ते म्हणजे  MH370 या विमानाचं. बिजिंग वरून मलेशियाच्या क्वाललंपुरच्या दिशेने निघालेलं हे विमान अपघात होऊन समुद्रात गायब झालं होतं. हि घटना घडली मलेशिया आणि चीनच्या दरम्यान असलेल्या हिंदी महासागरत.

मात्र याचे अवशेष सापडले होते हजारो किलोमीटर दूर असलेल्या मादागास्कर बेटांवर आणि मोझाम्बिकच्या समुद्रकिनाऱ्यावर. 

त्यामुळं असं हजारो किलोमीटरवरून एकादी गोष्ट दुसऱ्या किनारीवर वाहून जाण्याची घटना तशी नवीन नाहीये.

अजून एक उदाहरण घेता येइल ते म्हणजे प्लास्टिकच्या कचऱ्याचं. 

अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका यांच्या अगदी मधोमध, दक्षिण अटलांटिक महासागराच्या मध्यभागी ट्रिस्टन दा कुन्हा हे बेट आहे. पृथ्वीवरील सगळ्यात दुर्गम ठिकाणांपैकी हे एक बेट आहे. आणि या बेटांवर प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग लागला आहे. याच्यात सगळ्यात जास्त प्रमाण प्लॅटिकच्या बाटल्यांचं आहे. विशेष म्हणजे पार चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या बाटल्या तिथं समुद्रावाटे पोहचत आहे. 

यामागे समुद्रातील लाटा, वाऱ्याची दिशा, ओशन करंटस हे सगळे फॅक्टर कारणेभूत असतात.

आणि घटना लक्षात घेता आंध्रप्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावरही म्यानमार, थायलँड या ठिकाणांहून तो सोन्याचा रथ वाहून आल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.