या कारणांमुळे भारतासाठी G-20 परिषद महत्वाची ठरणार आहे…

लॉकडाऊन जसा संपला तस जागतिक घडामोडी आणि भेटीगाठी वाढल्या आहेत. संघाई कॉर्परेशन ऑर्गनायझेशनची बैठक झाली, आता G 20 ची बैठक बाली येथे सुरु आहे. 

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थान मिळवण्यासाठी आणि येणाऱ्या काळात जग आर्थिक दृष्टीने अनिश्चिततेच्या दिशेने जात असताना स्वतःच नाणं खणखणीत वाजवण्यासाठी भारतासाठी ही बैठक महत्वाची आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, स्पेन, फ्रान्स, सिंगापूर, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंग्डमच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. या देशांसोबत पंतप्रधान मोदींची द्विपक्षीय बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत द्विपक्षीय करारावर सहमती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यासोबतच रशिया युक्रेन, हवामान बदल, हेही मुद्दे महत्वाचे आहेत. १ डिसेंबर २०२२ पासून भारत अधिकृतपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. 

G-20 नेमकं आहे काय?

G-20 ला ग्रुप ऑफ ट्वेंटी असेही म्हणतात. हा युरोपियन युनियन आणि १९ देशांचा अनौपचारिक गट आहे. त्याचे नेते दरवर्षी G-20 शिखर परिषदेत एकत्र येतात आणि जागतिक अर्थव्यवस्थेला पुढे कसे आणायचे यावर चर्चा करतात. त्याची स्थापना 1999 साली झाली.

असंच G-8 पण आहे. जगातील आठ श्रीमंत राष्ट्रांचा गट आहे. G-8 ची स्थापना १९७५ मध्ये झाली. प्रारंभी फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका ही सहा राष्ट्रे होती. १९७६ मध्ये कॅनडा, तर १९९८ पासून रशियाचा समावेश.

जगातील दोनतृतीयांश उत्पन्न G8 राष्ट्रांच्या ताब्यात आहे.

G 20 जेव्हा ती स्थापन झाली तेव्हा ती अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची संघटना होती. त्याच्या पहिल्या परिषदेबद्दल सांगायचे झाल्यास, ही परिषद  डिसेंबर १९९९ मध्ये जर्मनीची राजधानी बर्लिन येथे आयोजित करण्यात आली होते. 

विशेष म्हणजे २००८ साली जगाला भयानक मंदीचा सामना करावा लागला. यानंतर या संघटनेतही बदल झाले आणि तिचे रूपांतर आघाडीच्या नेत्यांच्या संघटनेत झाले. यानंतर G-20 राष्ट्रांच्या नेत्यांची वर्षातून एकदा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. २००८ साली अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे आयोजित करण्यात आली होती.

G20 चा सर्वात मोठा उद्देश आर्थिक सहकार्य आहे. यात सामील असलेल्या देशांचा एकूण GDP जगभरातील देशांच्या 80 टक्के आहे. आर्थिक एकत्र काम करतात. तसेच आर्थिक स्थैर्य, हवामानातील बदल आणि आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाते. परिषदेचा मूळ उद्देश आर्थिक परिस्थिती कशी स्थिर ठेवायची आणि कशी टिकवायची हे आहे आणि यामुळेच हि बैठक फार महत्वाची आहे.

भारताचा अजेन्डा काय आहे? 

पंतप्रधान मोदी जागतिक नेत्यांशी भेटून G-20 बद्दल भारताच्या बदललेल्या लक्षाविषयी बोलणार आहेत तसेच पंतप्रधान मोदी ऊर्जा आणि अन्नसुरक्षा, digital transformation, आरोग्य याविषयीच्या सेशन्स मध्ये सहभागी सुद्धा होणार आहेत.

यासोबतच सध्याचे जे जागतिक महत्वाचे प्रश्न आहेत त्यावर सुद्धा चर्चा होणे अपेक्षित आहेत जसं  कि, जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा संकट, पर्यावरण, शेती, आरोग्य आणि digital transformation.

२०२३ मध्ये भारताला या परिषदेचं अध्यक्षपद मिळणार असल्याच्या निमित्ताने यासंदर्भातील नवीन लोगो लाँच करण्यात आलेला आहे ज्यावरून मोठ्या प्रमाणात राजकीय टीका होतं आपल्याला दिसतेय.

आता या परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे येत असताना खूप सारे आव्हाने समोर आहेत. सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास, महिला सबलीकरण, digital public infrastructure आणि तंत्रज्ञान पूरक विकास, climate funding, जागतिक अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा. या सर्व गोष्टींवर मार्ग काढणे हेच मोठे आव्हान असणार आहे. 

गेल्या काही वर्षांपासून G20 चं  महत्व कमी झाल्याचं समोर येतंय. रशिया युक्रेन वादात पश्चिमी देश आणि रशिया या सर्वानी G20 पूरक भूमिका न घेता या संघटनेस आव्हान कसे निर्माण होईल हाच प्रयत्न केलेला आहे.

प्रयत्नपूर्वक जागतिक सहकार्यासाठी उभी करण्यात आलेली G-20 संघटना तीच महत्व टिकवण्यासाठी धडपडताना दिसतेय. भारताकडे आता या G -20 संघटनेचं अध्यक्षपद येणार आहे यानिमित्ताने भारताला परत एकदा या संघटनेस नवसंजीवनी देण्याची संधी मिळू शकते. 

भारताची या कठीण आर्थिक परिस्थितीसुद्धा होणारी घौडदौड नक्कीच यास पूरक अशील असेल.  

पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची यानिमित्तांने झालेली भेट कदाचित सहकार्याचे नवीन द्वार उघडू शकेल का याची चाचपणी होऊ शकते. तसेच भारतीय पंतप्रधान आणि ब्रिटनचे पंतप्रधान यांची झालेली भेट खूप दिवसापासून प्रलंबित करार पुढे नेण्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकते हे निश्चित.

यासोबतच सर्व देशांना भारतीय बाजारपेठ खुणावतेय. अमेरिकेला कच्या तेलाचा आणि शास्त्रास्त्राचा पुरवठादार म्हणून भारतासाठी रशियाची जागा घ्याची आहे आणि चीनला सुद्धा या मंदावलेल्या जागतिक परिस्थितीत भारताला होणारी निर्यात वाढवायची आहे.

या सर्व गोष्टीचा विचार करता येणाऱ्या काळात माहितीच्या नवीन संधी या G20 च्या निमित्ताने निर्माण होणार आहेत म्हणून हि परिषद भारतासाठी अजूनच महत्वाची ठरते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.