आपला वैमानिक मुलगा शहीद झाल्यानंतर पुण्याच्या गाडगीळांनी जे केलं ते वाचण्यासारखं आहे.

ते साल होतं २००१ चं. या काळात मिग 21 विमान दुर्घटनाग्रस्त होत होते. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे या विमानांचा उल्लेख फ्लॉइंग कॉफिन असा केला जात असे. देशभरातून मिग 21 च्या दुर्घटनांच्या बातम्या चर्चेत येत होत्या मात्र सरकार या विमानांमध्ये दोष आहे हे मान्य करायला तयार नव्हतं. 

याच काळात राजस्थानमधल्या सुतागड भागात भारतीय वायुसेनेच्या एका मिग 21 विमानाचा उपघात झाला, उड्डाणानंतर अवघ्या ३३ सेकंदानंतर हा अपघात झाला होता. त्यामध्ये शहिद होणाऱ्या वैमानिकाच नाव होतं फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ. 

अभिजीत गाडगीळ पुण्याचे. त्यांचे वडिल देखील भारतीय वायुसेनेत कॅप्टन होते. अनिल गाडगिळ अस त्यांच नाव. अभिजीत गाडगीळ यांच्यासोबत दुर्घटना घडली तेव्हा त्यांच वय होतं अवघ २७ वर्ष.

आपला 27 वर्षाचा मुलगा गेल्याच दुख: अनिल आणि कविता गाडगीळ यांना होतच पण त्याहून अधिक दुख: हे होतं की आपला मुलगा युद्धात नाही तर विमानात असणाऱ्या दोषामुळे गेला होता. त्यातही या दुर्घटनेत फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ यांची चुक असल्याचं दाखवण्यात आलं. कधीकाळी वायुसेनेत कर्तव्य बजावलेल्या अनिल गाडगीळ यांना हि गोष्ट मान्य होण्यासारखी नव्हतीच. 

2002 साली अनिल गाडगीळ आणि कविता गाडगीळ यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांची भेट घेतली. त्यांनी मिग 21 मध्ये असणाऱ्या दोषामुळे आपला मुलगा गेला आहे, न की त्याच्या चुकीमुळे, त्यामुळे आपल्या मुलावरची हा आरोप काढावा अशी मागणी केली. देशासाठी शहिद झालेल्या अभिजीतला मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा म्हणून अनिल आणि कविता गाडगीळ यांनी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची भेट घेतली. 

Screenshot 2019 02 28 at 5.13.26 PM

आणि शेवटी त्यांना वायुसेनेमार्फत एक पत्र आलं, त्यामध्ये त्यांच्या मुलावर, फ्लाईट लेफ्टनंट अभिजीतवर असणारा आरोप मागे घेण्यात आला. मिग 21 मधील दोषामुळेच अभिजीत गेल्याच वायुसेनेमार्फत स्पष्ट करण्यात आलं. 

आपल्या मुलांवर असणारा आरोप या लढवेय्या वडिलांनी खोडून काढला, पण आत्ता त्यांच्या डोळ्यापुढे वेगळीच गोष्ट आली. कित्येक मुलांना वायुसेनेत जायचं असत. वैमानिक व्हायचं असत. आपल्या मुलाचं ते स्वप्न पुर्ण झालं पण अनेकांची स्वप्न पुर्ण होतं. म्हणून त्यांनी आपल्या मुलांच्या आठवणींसाठी काहीतरी वेगळ करण्याचा निर्णय घेतला. 

साल २००६, 

कॅप्टन अनिल गाडगीळ शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर आणि पत्रकार खा. कुमार केतकर यांच्या सहकार्याने पुण्याच्या खडकवासला येथे जीत एयरोस्पेस इंस्टीट्यूट अर्थात JAI ची स्थापना केली. या संस्थेमार्फत ज्या मुलांना वैमानिक व्हायचं आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण देण्याच  काम करण्यात येतं. विद्यार्थांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी ट्विन जेट सिम्युलेटर डिझाईन केलं आहे. त्याद्वारे जेट कॉकपिटची रचना करुन विमान हाताळण्याच्या बेसिक गोष्टींपासून पुढे प्रशिक्षण देण्यात येतं. JFI च्या उभारणीसाठी त्यांना जवळपास २ कोटी रुपये खर्च आला पण आपला मुलगा फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांनी JIF ची यशस्वी स्थापना केली.

 

हे ही वाचा. 

1 Comment
  1. Prashant Desai says

    खरंच खूप मस्त आहेत सगळ्या गोष्टी

Leave A Reply

Your email address will not be published.