गडकरी म्हणाले, मी चड्डीवाला आहे द्यायच असेल तर मतं द्या, नाहीतर राहिलं !

नितीन गडकरी म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व. नागपुरी अघळपघळ आदरातिथ्य, पाहुणचार त्यांच्याकडेही पाहायला मिळतं. अगदी टोकाचे विरोधक समजल्या जाणाऱ्या राजकारण्यांशी ही त्यांची मैत्री असते हे चित्र सध्याच्या राजकारणातही अचंबित करणारी गोष्ट समजली जाते. मनात येईल ते बिनधास्त बोलणारे गडकरी टीकेला घाबरत नाहीत.

असाच एक गडकरींच्या निर्भीड बोलण्याचा किस्सा…

तर एका भाषणात नितीन गडकरी सांगत होते, माझ्याकडे येणारा कोणताही व्यक्ती जातीचं नाव काढत नाही आणि काढलं तर शिव्या खाल्ल्याशिवाय जात नाही. मत द्यायचं तर दे नाही दिलंस तर काही फरक पडत नाही. पण इथं येऊन जातीयवादी काही बोलायचं नाही.

माझा स्वभाव मोकळा असल्याने माझे मुस्लिम समाजातले पण मित्र आहेत. त्यातल्याच काही मुल्ला मौलवींनी माझा एक कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमात नाही म्हंटल तरी दहा हजारांच्या वर मुस्लिम लोक गोळा झाले होते. गडकरी पुढं म्हणतात, त्या कार्यक्रमात जमलेल्या त्या जमावाला मी म्हंटल,

तुम्हाला माहीत आहे का, मी RSS वाला पिवळी चड्डीवाला आहे. द्यायचं असेल तर वोट द्या पण पुन्हा पचतावू नका म्हणजे झालं.

त्या कार्यक्रमात गडकरींना खूप हार तुरे आले होते. त्या कार्यक्रमाचे आयोजक प्यारेखान हे गडकरींचे मित्रच होते. गडकरी त्यांना म्हंटले, काय रे, आत्ता एवढी गर्दी जमली, एवढे हारतुरे आले. मतदानादिवशी एक ही तिकडे फिरकला नाही. कुठे गेले होते सगळे ? मतदान कमी पडलं..

त्यावर प्यारे खान म्हंटले, साब इस बार गलती हो गयी, अगली बार बस आपको ही वोट देंगे। यावर गडकरी एकदम मोकळेपणाने हसले त्या व्यक्तीच्या खांद्यावर हात टाकत म्हणाले, अरे तू मत दिलास काय आणि नाही दिलास काय, मी तुमचं काम करणारच.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.