गुजरातमधलं धरण आटलं आणि कितीतरी वर्षांनंतर गायकवाड किल्ला वर आला
दक्षिण गुजरातमधील तापी जिल्ह्यात असलेल्या उकई धरणात कमी पाणी आल्याने उकईचा पाण्याखाली बुडालेला गायकवाडी किल्ला १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा दिसू लागला आहे. यंदा वाढत्या उन्हामुळे आणि पाणीटंचाईमुळे उकाई धरणातील पाणीसाठा सातत्याने कमी होत होता, त्यामुळे १९९७ नंतर पहिल्यांदाच गायकवाडी किल्ला दिसून आला पण धरण बांधल्यानंतर हे दुसऱ्यांदा दिसून आले आहे. उकई धरणाची जलपातळी ६४ फूट कमी झाल्यामुळे पाण्यात एक किल्ल्यासारखे दिसणारे अवशेष दिसायला लागले आहेत.
उच्चल जवळील उकाई धरणाचा पाणीसाठा २८५ फुटांपेक्षा जास्त कमी झाला आहे. अन यामुळेच या किल्ल्यासदृश्य अवशेषांचे दर्शन कधी नव्हे ते होत आहे. असे मानले जाते की धरण बांधले तेव्हा गायकवाडी किल्ला, तोफ, भिंत आणि अनेक पुरातन वस्तू पाण्यात बुडाल्या होत्या. आता पाणी ओसरल्याने गायकवाडी किल्ल्याची भिंत, तोफ अशा अनेक गोष्टी दिसत आहेत, त्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
गायकवाड किल्ल्याचा इतिहास
1729 मध्ये सोनगड जवळ आलेला गायकवाडी किल्ला हा गायकवाडांचा मुख्य राजवाडा मानला जात असे. येथे पिलाजीराव गायकवाड यांनी 1719 मध्ये सोनगडच्या भिल्लांच्या जवळील डोंगर जिंकून येथे एक आलिशान गायकवाडी किल्ला बांधला. सोनगडमध्ये असे गायकवाड राज सुरू झाले. किल्ल्याजवळील शिलालेखानुसार हा किल्ला पिलाजीराव गायकवाड यांनी १७२८-२९ मध्ये बांधला होता. गुजरातचे तत्कालीन राजे गायकवाड यांना जलसंधारण अन दारुगोळा व शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी एका किल्ल्याची गरज होती. अन बहुदा यासाठीच या किल्ल्याची बांधणी करण्यात आली.
पहिल्यांदाच दिसला का धरणातला किल्ला ?
नाही, यापूर्वीही एकदा हा किल्ला दिसला होता. जवळपास २०-२२ वर्षांपूर्वी १९९७ मध्येसुद्धा दुष्काळामुळे उकाई जलाशयाचे पाणी १० टक्क्यांपेक्षा खाली गेले होते त्यावेळी हा किल्ला पायावयास मिळाला होता. आजसुद्धा दुष्काळामुळे उकाई जलाशयात ५७२ TMC इतकेच पाणी शिल्लक आहे जे जलाशयाच्या क्षमतेच्या अवघे ८% आहे.
कुठे आहे हा किल्ला?
सुरात जिल्यात उत्चलजवळ जामील नावाच एक गाव आहे. या गावापासून जवळपास ३KM अंतरावर हा ढांचा आहे. लोकांच्या सांगण्यानुसार गायकवाड घराण्याच्या काळात या किल्ल्याचा उपयोग ब्रिटीश अन गायकवाड याचे पोलीस करत असत.
कसा आहे किल्ला ?
या किल्ल्यावर स्वतःचा असा एक तोपखाना आहे अन ३ उभ्या तोफा आहेत. या किल्ल्याचा आवर हा 200 मीटर इतका आहे तर उंचीला हा तब्बल ७० फुटांहूनही मोठा आहे. गेल्या आठवड्यापासून हा किल्ला पाहायला मिळतोय. हा किल्ला सोनगढच्या एका टेकडीवर बांधला गेला होता अन जलसंधारानासाठी या किल्ल्यामध्ये अनेक वाव किंवा विहिरीसुद्धा आहेत. आज पाणी कमी झाल्यामुळे दोन तोफा अन tomb पाहायला मिळतो. या किल्ल्याचा आकार कुणालाच माहिती नाहीये पण १९७२ मध्ये या आसपास शेती होती. स्थानिक सांगतात सोनगडचा किल्ला गायकवाडांनी बांधला होता त्याची उंची 112 मीटर इतकी होती. गाईकवाडांनी दोस्वडा अन उत्चल इथेही किल्ले बांधलेले आहेत.
हे ही वाच भिडू :
- चिमाजी म्हणाले “किल्ला ताब्यात येत नसेल तर मला तोफेच्या तोंडी देऊन किल्ल्यावर पाठवा.”
- पाकिस्तानने ढापलेल्या काश्मीरमध्ये एक लाल किल्ला आहे. त्याचा सुद्धा इतिहास मोठ्ठाय
- एकमागून एक इंटरनॅशनल स्पर्धा भरत गेल्या आणि नजफगड खेळांचा बालेकिल्ला बनला
- राजस्थानातला रहस्यमयी किल्ला, जिथे आजही देशातला सगळ्यात मोठा खजिना दडलाय..
मला सगळ्यात भासत हे आवडलं
भीडू अस कॉपी पेस्ट करायचं नाय… डायरेक्ट लिंक शेअर करायची…😍😍😍
#खतरनाक …