गॅलिलिओने चाप्टरपणा केला आणि दुर्बिणीच्या शोधावर स्वतःचं नाव लावलं.

लहानपणापासून आपण जनरल नॉलेजच्या पुस्तकात वाचतो, अनेक थोरामोठ्यांच्या भाषणात ऐकतो, इंटरनेटवर पाहतो की दुर्बिणीचा शोध गॅलिलिओ गॅलेली या महान माणसाने लावला. पण आपण म्हणतो तेवढं सोपं नाही, यात बरीच भानगड आहे.

सोळाव्या शतकाचा काळ. युरोपमध्ये प्रबोधनाला सुरवात झाली होती.

समाजमान्य रूढ  प्रथा परंपरा याच्या विरुद्ध जाऊन नवीन शोधण्याचा प्रयत्न सुरु झाला होता. अनेक नवीन शोध याच काळात लागले. जगाचा इतिहास बदलवणाऱ्या घटना याच शतकात घडून गेल्या. यातच प्रमुख समावेश केला जातो दुर्बिणीचा.

गॅलिलिओ मूळचा इटलीमधील पिसा या शहरातला. याच गावात तेराव्या शतकात मॉनेस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या भिक्षुक लोकांनी भिंग बनवण्याची कला आत्मसात केली होती. बारीक वाचण्यासाठी या भिंगाचा वापर ते करत असत. लवकरचं हे भिंग प्रचंड फेमस झाले.

पुढच्या शंभर वर्षात इटलीच्या व्हेनिस आणि फ्लॉरेन्स या शहरात भिंग विकण्याची दुकाने उभी राहिली. जगभरातून लोक येथे येऊन वाचनासाठी भिंग खरेदी करू लागले.

यातूनच चष्म्याचा शोध लागला.

एकदा दोन लहान मुले आपल्या घरच्यांसोबत चष्म्याच्या दुकानात आले होते. त्यांचे वडील आपल्याला कोणतं भिंग लागेल हे चेक करत होते. तेव्हा ती मुले दुकानातील दोन भिंग घेऊन खेळत होते. तेव्हा खेळताना त्यांना कळलं की दोन भिंगे पुढे -मागे ठेवून दूरवरच्या चर्चच्या भिंतीवर बसलेले पक्षी अगदी जवळ दिसत होते.

H4120324 Hans Lippershey Dutch inventor of the telescope
Hans Lippershey. Historical engraving of Hans Lippershey (1570-1619),

हि गंमत त्या दुकानात काम करत असलेल्या हान्स लिपरशे याने पाहिली. त्याच्या डोक्यात दुर्बीण बनवण्याची कल्पना चमकून गेली.

हान्स लिपरशे मूळचा जर्मनीचा. त्याने नेदरलंड येथे चष्म्याचं दुकान सुरु केलं होतं. तो आपल्या देशात गेला आणि दुर्बीण बनवण्यासाठी साठी प्रयत्न सुरु केले. अगदी हिच कल्पना डोक्यात घेऊन टेलिस्कोप बनवण्याच्या मागे अनेकजण लागले होते. पण सर्वप्रथम यशस्वी ठरला लिपरशे.

२ ऑक्टोबर १६०८ रोजी लिपरशेने नेदरलँडमध्ये आपल्या नवीन उपकरणाच्या पेटंटसाठी अर्ज केला. या पेटंट मध्ये दूरची वस्तू जवळ असल्यासारखी वाटते असा स्पष्ट उल्लेख होता. या उपकरणाला त्याने kijker हे नाव दिले होते.

पण दुर्दैवाने नेदरलँडच्या राज्यकर्त्यांना या शोधाचे  महत्व जाणवले नाही.

त्यांनी अशा अनेक वस्तू जगात उपलब्ध आहेत असं कारण येत पेटंट देण्यास नकार दिला पण या बदल्यात त्याला मोठी रक्कम बक्षीस म्हणून दिली हि गोष्ट अलाहिदा.

हि घटना घडली तोवर गॅलिलिओ वयाची ४५ वर्षे पार केलेला होता. त्याचा एक थोर शास्त्रज्ञ म्हणून सर्वत्र ओळख मिळाली होती मात्र अजूनही आपण अजरामर होऊ असा मोठा शोध लावला नाही याची खंत त्याच्या मनाशी कायम होती.

गॅलिलिओला या लिपरशेच्या दुर्बिणीचा शोध उशिरा कळाला.   

गॅलिलिओ चा पावलो सार्पी नावाचा एक मित्र होता. तो देखील शास्त्रज्ञ होता मात्र त्याचा राजकीय क्षेत्रात मोठा वट होता. या सार्पीला लिपरशेने लावलेल्या दुर्बिणीबद्दल खूप आधीच कळालं होतं . गॅलिलीओ त्याच्यावर मला का सांगितलं नाही म्हणून भडकला. कसबसं सार्पीने त्याची समजूत काढली.

लिपरशे तेव्हा व्हेनिसमध्ये आपली दुर्बीण दाखवण्यासाठी येणार होता गॅलिलिओने सार्पीकडे जबाबदारी दिली की

काहीही करून लिपरशेला व्हेनिसमध्ये येऊ द्यायचे नाही. त्याला गावाच्या वेशीवर चा अडवायचं.

गॅलिलिओने स्वतः एक दुर्बीण बनवली.

आजवर अनेकांनी दुर्बीण बनवण्याचा प्रयत्न केला होता पण गॅलिलिओने दुर्बिणीचा सखोल अभ्यास केला, अगदी थोड्याच दिवसात त्याने न थकता न थांबता कष्ट करून लिपरशे पेक्षाही चांगली व दर्जेदार दुर्बीण बनवली.

२५ ऑगस्ट १६०९ रोजी व्हेनिसच्या श्रेष्ठींच्या पुढे त्याने या दुर्बीणीचं प्रात्यक्षिक झालं. गॅलिलिओने जगातलं पहिलं दुर्बिण बनवलं अशी जगन्मान्यता मिळाली.

हि दुर्बीण फक्त लांबचं पाहण्यासाठी उपयोगाची नव्हती तर अवकाशात असलेले ग्रह तारे पाहण्यासाठी त्याचा उपयोग होणार होता. म्हणूनच दुर्बिणीचा शोध लावण्याचं नसलं तरी दुर्बिणीला अवकाशात वळवण्याचं क्रेडिट गॅलिलिओला दिले जाते.

पण याबाबतही वाद आहेत. कारण त्यावेळी इंग्लंडमधील थॉमस हॅरियट याने देखील आपल्या दुर्बिणीतून चंद्राचे निरीक्षण केले होते आणि चंद्रावरील विवरांची चित्रे काढली होत.

आज गॅलिलिओने पहिली दुर्बीण जगापुढे ठेवली याला जवळपास ४११ वर्षे झाली. आज आपण  चंद्रावर आणि मंगळावर पोचलो आहोत, अंतराळ विज्ञान, खगोल शास्त्राने अचंबित करावं अशी प्रगती केली आहे. यामागे लिपरशे, गॅलिलिओ सारख्या अनेक ज्ञात अज्ञात शास्त्रज्ञांनी केलेल्या पायाभरणीचे श्रेय आहे हे नक्की.

हे हि वाच भिडू .

1 Comment
  1. जवाहरलाल साळुंखे says

    न्यूटनच्या पुर्वी पण सफरचंद झाडावरून खाली पडत होते. न्यूटनने त्यामागील कार्यकारणभाव शोधला. त्याला गणिताने सिद्ध केले. त्यामुळे आपण न्यूटनला गुरुत्वाकर्षण शोधाचा जनक समजतो. दुर्बीणीचे पण तसेच आहे. गॅलिलिओने चांगल्या प्रकारची दुर्बीण तयार केली म्हणून पेटंट त्यालाच मिळायला हवे. लिपरशेचे नाव इतिहासाने झाकून ठेवलेले नाही. रेल्वे इंजीन बाबत सुद्धा असेच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.