सत्तेची अंगठी.

सत्तेच्या चाव्या तर अनेकांकडे आहेत. पण आज तुम्हाला सांगत आहोत ते सत्तेच्या अंगठीबद्दल. हा किस्सा अशा अंगठीचा आहे की, जो वाचल्यानंतर तुम्हालाही वाटेल एक दिवस प्रियांका गांधीच्या हाती कॉंग्रेसची सर्व सुत्र जातील.

प्रियांका आणि इंदिरा गांधी यांच एकसारखं दिसणं जस विचित्र योगायोगाने भरलेलं आहे तसाच हा किस्सा.

डिसेंबर १९८२

संजय गांधी यांच्या पुस्तकाचं अनावर करण्यात येणार होतं. अली सिद्दीकी यांनी हे पुस्तक संजय गांधीच्या जयंतीदिवशी प्रकाशित करण्याचं ठरवलं होतं. नेहरू, गांधी घराण्याचे जवळचे संबध असणारे मोहम्मद युनूस यांनी या पुस्तकात “दोन भावांची कहाणी” नावाचं एक प्रकरण लिहलं होतं.

या प्रकरणात मोहम्मद युनूस यांनी राजीव गांधी आणि संजय गांधी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली होती. पण मेनका गांधी आणि त्यांची आई अमतेश्वर आनंद यांच्यावर कडाडून टिका करत असताना नैतिकतेची सीमा देखील ओलांडली होती.

या पुस्तकाचे प्रकाशन होण्यापुर्वीचं हे दोन्ही भाग नॅशनल हेराल्ड मध्ये छापून आले.

यामध्ये संजय गांधी आणि मनेका गांधीच्या भांडणाबाबत ते लिहतात की, मनेका या स्वार्थी होत्या. त्यांच्या आई अमृतेश्वर यांनी संजय यांच्या नावाने लाखोची माया जमा केली. संजय यांना हि बाब लक्षात आल्यावर संजयने त्यांना दम भरला. त्यानंतर त्या भारत सोडून गेल्या ते थेट संजय गांधी गेल्यानंतरच त्या भारतात परतल्या. या लेखातच ते मनेका गांधींच्या अंगठीचा किस्सा सांगतात,

“मनेका आणि संजय यांच्या भांडणात मनेका गांधींनी साखरपुड्याच्या वेळेला दिलेली अंगठी संजयच्या अंगावर फेकली. असली रबीश वस्तू मला नको असे ती म्हणाली.”

ही अंगठी कमला नेहरू वापरत. त्यांना ती मोतिलाल नेहरू यांनी दिली होती. त्यानंतर ती इंदिरा गांधी यांच्याकडे आली. इंदिरा यांनी मोठ्या प्रेमाने ती मनेका यांना दिली होती.

ते पुढे लिहतात..

“या प्रकरणानंतर ती अंगठी पुढे राजीव यांची मुलगी प्रियंकाला देण्याचं ठरवण्यात आलं आणि ती अंगठी प्रियांकाकडे गेली…”

असा हा “अंगठीचा इतिहास” एखाद्या फिल्मी स्टोरी सारखा वाटतो. घरातल्या भांडणातील साधी अंगठी पण प्रतिकात्मक पहायचं झालं तर हि अंगठी सत्तेचं सुत्र हलवणारी वाटते. ती ज्या बोटात गेली त्या बाजूला गांधी घराणं झुकलं म्हणायला हरकत नसावी. आज प्रियंका गांधी जी अंगठी घालतात ती तिच आहे का ?

हे त्या अंगठीला आणि प्रियंका गांधीना माहित. तसही इंदिरा गांधीना “अॅज इट इज” फॉलो करत असताना त्या आज्जीबाईंची अंगठी घालायची विसरतील अस वाटत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.