काय होत बिहारचं खरखुर गंगाजल कांड…?

आंख फुडवा कांड अर्थात भागलपुर कांड. इतिहासाच्या फायलीमध्ये हे कांड कधीच धुळ घात पडलं असत. मात्र एका आरोपीमुळे हे कांड फुडलं. पोलीसांची बाजू योग्य की आरोपींची, आजही लोकांना आपल्या बाजूने न्याय देणं अवघड होवून जातं. 

तसही हे प्रकरण लोक विसरुन देखील गेले होते पण काही वर्षांपुर्वी गंगाजल रिलीज झाला होता. गंगाजलमध्ये भागलपूरचं हे कांड तेजपूर म्हणून लोकांच्या समोर आलं आणि पुन्हा नेमका काय प्रकार होता म्हणून चर्चा सुरू झाल्या. 

गंगाजल….!!!  साला पवित्र कर देंगे आज तेजपूरको. 

पोलिस लॉकअपमधल्या आरोपींच्या डोळ्यात अॅसिड टाकतात. त्यांचे डोळे फोडतात. पोलिसांकडून तेजपूर पवित्र करण्याचा हा पवित्र भागलपूरमध्ये घडला होता तो १९७९-८० सालात. 

बिहारमधला भागलपूर जिल्हा. रक्तचरित्र, गॅंग ऑफ वासेपूर किंवा गंगाजलमध्ये जसा भाग दाखवण्यात आला आहे अगदी तसाच. त्या काळात तर इथे गुंडांचा नंगानाच चालत असल्याचं सांगितलं जात होतं. रस्त्यावरुन नाही तर थेट घरात घुसून मुलींना उचलून नेलं जायचं. अपहरणासारख्या गोष्टी रोज घडत असत. सरकारी आकडेवारीत सांगायचं तर एकट्या भागलपूर शहरात सन १९७८ साली ९० खून झाल्याची नोंद करण्यात आली होती. 

आरोपी कोणत्या ना कोणत्या गॅंगमध्ये असायचा. या गॅंगचा एखादा माणूस सापडला तर त्याच्यावर जुजबी कारवाई व्हायची. जास्तीत जास्त त्याला एखादा दिवस आत रहायला लागायचं. दूसऱ्या दिवशी तो पोलिसांना देखील दम टाकून बाहेर पडायचां. भागलपूरमध्ये पोलीस नावाची गोष्ट आहे यावर कोणाचाही विश्वास नव्हता अशी अवस्था. 

याच काळात अचानक एका मोठ्या घरातील व्यक्तीचं अपहरण केलं जातं. पोलिसांवर वरुन दबाब आणला जातो. पोलिस प्रयत्न करुन या अपहरणकर्त्यांना पकडतात. आणि त्याच रात्री एका धर्मशाळेत मिटींग घेतात. त्याच रात्री 

पवित्र कर देंगे भागलपूरकों चा निर्णय घेतला जातो! 

या सगळ्यांच्या पाठीमागे असतात जिल्ह्याचे SP विष्णु दया राम. मात्र त्यांच्यावर कधीच कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आली नाही, की ते आरोपी आहेत अस जाहिरपणे CBI ने देखील मांडल नाही. फक्त हा विषय लोकांच्यात चर्चेत होता. त्यामुळे गंगाजल सिनेमा साल आल्यानंतर त्यांची तुलना अजय देवगणसोबत करण्यात आली. 

तर भागलपुरच्या एका धर्मशाळेत सर्वोनुमते निर्णय घेण्यात आला होता. 

ऑक्टोबर १९७९ साली नवगठिया पोलीस स्टेशनमध्ये काही आरोपी आणले जातात. स्थानिक गुंडाच्या गॅंगमधले हे आरोपी असतात. त्या रात्री पोलीस सर्व आरोपींना उभा करतात. पोलिसांच्या हातात सायकलचे पोक्स, दाभण आणि अॅसिड असतं. पोलीस मिळून त्यांचे डोळे फोडतात. त्यांच्या डोळ्यात अॅसिड टाकलं जातं. 

दूसऱ्या दिवशी पोलिसच त्यांना हॉस्पीटलमध्ये घेवून जातात. पोलीसच त्यांच्यावर उपचार करतात आणि त्यांना सोडून दिलं जातं. केस मात्र दाखल करण्यात आलेली असते. काही दिवसातच कहेलगाव, बरारी, सबॉर, नवगठिया अशा भागातून वेगवेगळे आरोपी आंधळे होवून हॉस्पीटमध्ये येवू लागतात. या सगळ्यांवर केस दाखल केलेली असते. सर्वांना एकाच जेलमध्ये टाकण्यात येतं.

एकामागून एक आंधळे कैदी दाखलं होत असल्याचं पाहून जेलरला संशय येवू लागतो. तो या कैद्यांना विश्वासात घेतो चौकशी करतो तर आरोपी सांगतात, पोलीसांनी डोळ्यात अॅसिड टाकलं. जेलर हादरतो. तो या गोष्टींविरोधात अपील करतो. मात्र त्याच्या अपीलला SP साहेबांकडून कचऱ्याची पेटी दाखवली जाते. 

एकूण ३१ आरोपी असे असतात की ज्यांचे डोळे फोडण्यात आले आहेत. यातला एकमेव आरोपी शिख असतो. तो मुळचा पंजाबचा असतो. त्याच्या घरातले त्याला शोधत येतात. डोळे फोडलेल्या बलजीत सिंग याला कोर्टकेसमधून सोडावून दिल्लीला घेवून जातात. 

तिथे त्याला एम्समध्ये अॅडमीट करण्यात येतं. एम्समध्ये पहिल्यांना त्याची तपासणी केली जाते तेव्हा डॉक्टर रिपोर्ट देतात हि दुर्घटना नसुन ठरवून डोळे फोडून नंतर त्यामध्ये अॅसिड ओतण्यात आलं आहे. बलजीत सिंग याच्या घरातल्यांकडून पाठपुरावा केला जातो… 

हळुहळु एकेका आरोपीसोबत बोलून त्यांना अपील करावं अस सांगण्यात येत. या आरोपींची एकूण संख्या असते ३१. सर्वांना आंधळे करण्यात आलेले असतं. 

एकूण तेरा पोलीसांविरोधात अपिल करण्यात येतं. बलजीत सिंगच्या घरातून दिल्लीतील वर्तमानपत्रांसोबत संवाद साधला जात असल्याने संपुर्ण देशभर प्रकरण गाजत. तेव्हा केंद्रात इंदिरा गांधीचं शासन होतं. बिहारचे मुख्यमंत्री देखील कॉंग्रेसचे जग्गनाथ मिश्रा असतात. प्रकरण CBI कडे सोपवण्यात येत. भागलपूरचं कोर्ट मात्र या फक्त तीन पोलीसांना आरोपी म्हणून निर्णय देतं. पुढे हि केस पटना कोर्टात जाते. तिथे फक्त एकाच पोलीसावर आरोप सिद्ध होतो. बाकीच्या पोलिसांना निर्दोष सोडण्यात येत. 

पुढे झारखंड राज्य निर्माण झाल्यानंतर VD राम झारखंड केडरमध्ये नियुक्त होतात. झारखंडचे DGP होतात. रिटायर झाल्यानंतर ते निवडणुकीच्या मैदानात उतरतात व प्लामू मधून निवडून देखील येतात. सध्या ते भाजपचे खासदार आहेत. या केसमध्ये लोकांमार्फत कधीच पोलिसांना दोषी धरण्यात आलं नाही. जनमताचा वाढत्या दबावामुळेच SP साहेबांवर कोणतीच चार्जशीट दाखल करण्यात आली नाही अस देखील सांगितलं जातं.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.