गँग्स ऑफ वासेपूरला लाजवेल असे कांड करणारा बाहुबली आता MIM मध्ये आलाय

‘त्याच्या डोळ्यात बघायची हिम्मत नाही होत. रक्ताळलेले त्याचे ते लालबुंद डोळे एकटक तुमच्या दिशेनं रोखलेले असतात. नजर तर अशी रोखतो कि तुम्ही आपोआप खाली बघायला लागता.’ असं एक पोलीस आरोपीबद्दल सांगत होता. तुम्ही म्हणाल काय पिच्चरची स्टोरी सांगय लागलायस. तुमचा पण बरोबर आहे . पिक्चरसारखीच वाटणारी हि घटना उत्तरप्रदेशमधल्या एका बाहुबली नेत्याच्या बाबतीतील आहे. त्या नेत्याचं नाव आहे अतिक अहमद अन्सारी. गुजरातमधल्या साबरमती जेलमध्ये बंद असलेल्या या नेत्याची ईडीनं आठ करोडची प्रॉपर्टी जप्त केलीय. याआधी ही याची जवळपास २०० करोडची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली होती.

आता उत्तरप्रदेशातील आरोपी साबरमतीच्या  जेलमध्ये कसा बंद असं तुम्ही म्हणाल तर त्यासाठी थोडं मागे जावं लागेल.

मग झटपट पैसे कमवण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग स्विकारला  ..अतिक अहमदनं  १७ व्या वर्षी पहिला मर्डर टाकला होता.

 

१९८० चं अलाहाबाद. संगमावर बसलेलं शांत धार्मिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेलं अलाहाबाद आता कात टाकत होतं. नवीन कॉलेजेस,नवीन इंडस्ट्रीज यामुळं अलाहाबादचं रुपडं झपाट्यानं बदलत होतं. राजकारणात पण बदल घडत होते. एकेकाळी अख्या उत्तरप्रदेशच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारी अलाहाबाद युनिव्हर्सिटीची विध्यार्थी चळवळ मागे पडत होती.  हे सगळं फिरोझ टांगेवाल्याचं पोरगं बघत होतं. एवढे सगळे बदल होत असताना आपल्या आयुष्यात मात्र काय बदलत नाहीए हे त्यानं ओळखलं होतं. बापाचा टांगा चालवयचा धंदा पुढे आपण घेतला तर खायचे  वांदे होतील हे त्याला कळलं होतं . आता शाळेत जाऊन अभ्यास करायचा आणि कलेक्टर बिलेक्टर बनायचं तर शाळेत पास होयचे वांदे . मग अतिकनं गुन्हेगारी आणि राजकारण यांचा मार्ग निवडला.

आता गुन्हेगारी क्षेत्रात एन्ट्री मारलेल्या अतिक अहमदला आता राजकारणातही नाव कमवायचा होतं. १९८९मध्ये त्यांनं मग आधी आमदार आणि थेट खासदारकी पर्यंत मजल मारली.

कधीकाळी पंडित नेहरू ज्या फूलपूर मतदारसंघामधून निवडून जात होते त्याच मतदारसंघामधून आता अतिक अहमद २००४ मध्ये लोकसभेवर पोहचला.

मात्र राजकारणात पुढे जात असतानाच त्यानं गुन्हेगारी विश्व सोडलं  नव्हतं.

गुन्हेगारीवरच त्याचं सगळं राजकारण चाललं होतं असं उत्तरप्रदेशातील पत्रकार सांगतात. मात्र २००५ मध्ये राजू पाल जो एकेकाळी त्याचा राईट हॅन्ड ओळखला जायचा त्याच्या हत्येनंतर मात्र अतिक अहमदच्या कारकिर्दीला उतरती कळां लागली. अतिक अहमद लोकसभेवर निवडुन गेल्यांनतर त्याच्या अलाहाबादेतील जागेवरून त्याचा भाऊ अश्रफ याला विधानसभेवर पाठवायची इच्छा होती. मात्र राजू पाल यानं बसपाचं तिकीट घेऊन अश्रफचा पराभव केला. अतिक अहमदच्या एकाधिकारशाहीला हे आव्हान होतं. मग त्यानं जे केलं त्यांना अख्खा उत्तरप्रदेश हादरून गेला होता. राजू पालच्या गाडीच्या ताफ्यावर दिवसा ढवळ्या हल्ला करण्यात आला. 

राजू पालच्या स्कॉर्पिओची गोळ्यांनी चाळण करण्यात आली होती.  त्यातूनही राजू पालच्या साथीदारांनी त्याला कसबसं टेम्पो मध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला मात्र अतिक अहमदच्या शूटर्सनी टेम्पोवर देखील हल्ला करून राजू पालला संपवलं  होतं.   

एवढं सगळं कांड होऊनही अतिकनं आपला भाऊ अश्रफ याला निवडूकीच्या रिंगणात उतरवलं.

लग्नाच्या अवघ्या ९ दिवसांनंतरच राजू पालचा खून झाला होता. बसपाने जेव्हा त्याची पत्नी पूजा पाल यांना उमेदवारी दिली. तेव्हा पूजा पालनं आपल्या हातावरली लग्नाची मेंहदी दाखवत मतं मागितली होती. मात्र अतिक अहमदची दहशत एवढी होती की  नवऱ्याचा मृत्यूच्या सहानभूतीचा कोणताच फायदा नाही झाला आणि अहमदच्या भाऊ अश्रफ निवडून आला. 

मात्र पुढे मायावती यांनी अतिक अहमदला चांगलचं अडकवलं. राजुपालच्या हत्येची केस पुन्हा उघडण्यात आली. पुढच्या लोकसभा आणि विधानसभेत त्याचा पराभव झाला. 

विधानसभेत हाताची मेहंदी मिटायच्या आत जिच्या डोक्यावरचं कुंकू पुसलं गेलं होतं त्या पूजा पालनं त्याचा पराभव केला होता. 

पुढे जेलमध्ये अतिकनं आपले धंदे चालू ठेवलेच. एवढे की सुप्रेम कोर्टानं त्याला उत्तरप्रदेशच्या बाहेर हलवण्याचे आदेश दयावे लागले.

अतिक अहमदनं जरी अपक्ष म्हणून राजकारणात सुरवात केली असली तरी पुढे समाजवादी पार्टी, अपना दल यांनी त्याला आपल्या पक्षात आश्रय दिला होता. 

आता ओवेसींच्या एमआयएमनं  त्याला आपल्या पक्षात घेतलयं. 

गुन्हेगार सगळ्यात पक्षात असतात . समाजवादी पक्ष बसपा यांनी फक्त मुस्लिमांचा वापर करून घेतला. असं अतिक अहमदच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी ओवेसींनी  म्हटलंय. त्यामुळं त्याच राजकारण पुन्हा चालू होणार का हे पाहावं लागणार आहे.  अलाहाबादचं नाव बदलुन प्रयागराज करणारे योगी शहराच्या राजकारणाचा चेहरामोहराही बदलनार का हे येणारा काळचं सांगेल.  बाकी अनुराग कश्यपला गँग्स ऑफ वासेपूर सारख्या स्टोरी कश्या सुचत असतील हे तुम्हाला कळलंच असेल.

 

English Summary:  After being mafia he enters politics. from the Samajwadi party, he contests elections. Mayawati sends him behind bars. and now Allahabad gangster bahubali Atik Ahmad join AIMIM.

 

Leave A Reply

Your email address will not be published.