गांगुलीची जेव्हा पहिल्यांदा टीम मध्ये निवड झाली तेव्हा त्याच्या घरचे दुःखी होते .

आपला दादा सौरव गांगुली कलकत्त्याचा महाराज आहे सगळ्यांना ठाऊकच असेल. महाराज म्हणजे खरोखरच महाराज नाही, तर त्याचे वडील तिथले सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. एकत्र कुटुंब. सौरवचे सगळे मोठे भाऊ क्रिकेट खेळायचे, पण सौरभ एकटाच फुटबॉल खेळायचा.

त्याचा सख्खा मोठा भाऊ स्नेहाशिष हा त्याकाळात बंगाल रणजी टीमचा सर्वोत्तम खेळाडू समजला जायचा.

चंडीदास गांगुलीना स्वतःला क्रिकेटची आवड होती. त्यांनी स्नेहाशिषला घरातच नेट लावून दिल होतं. त्यात बॉलिंग मशीन पण होती. जिम बनवलेली. क्रिकेटसाठी कोणतीच कमी नव्हती. अट फक्त एकच असायची की चांगल खेळायचं.

सौरवला सगळ्यात धाकटा असल्यामुळे त्याच्यावर काही प्रेशर नसायचं. त्याला फुटबॉलमध्ये इंटरेस्ट होता.

पण एकदा काय झालं की बंगालच्या अंडर १५ टीमचे एकदम ७ खेळाडू टोयफोइडने आजारी द्प्ले, दुसऱ्या दिवशी मच होती. मग कोणीतरी विचारलं की स्नेहाशिषचा धाकटा भाऊ आहे तो सुद्धा चांगला खेळत असेल. त्याला घ्या .

सौरव एका पायावर तयार झाला. भावाच कीट उचललं आणि खेळायला गेला. पहिल्याच मॅचला सेंच्युरी मारली.

तिथून त्याची हवा सुरु झाली.

सौरवचा क्रिकेटमधला गुरु त्याचा भाऊ स्नेहाशिषच होता. खरंतर सौरव हा डावखुरा नाही पण स्नेहाशिष डावखुरा होता आणि त्याच कीट वापरायच म्हणून सौरवसुद्धा डावखुरी फलंदाजी करू लागला. काही दिवसातच सौरवची बंगालच्या रणजी टीममध्ये निवड झाली.

स्नेहाशिष आणि सौरव हे दोन्ही भाऊ भाऊ बंगाल कडून खेळणार म्हणून त्याच्या घरचे खुश होते.

पण सौरवला अख्खा सिझन खेळायलाच मिळाले नाही. पूर्ण रणजी सिरीजमध्ये तो राखीव होता. योगायोगाने त्या वर्षी बंगालची टीम फायनलला पोहचली. फायनल मध्ये तर आपल्याला चान्स नाही हे सौरवला पक्के माहित होते. त्याच दरम्यान त्याची बारावी बोर्डाची परीक्षा होती. सौरव त्याच्या तयारी मध्ये गुंतला.

एकदिवस तो संध्याकाळी ट्युशनमधून घरी आला तर त्याला दिसल घरातल सगळ वातावरण एकदम सुतक पडल्याप्रमाणे शांत आहे. वडील डोके धरून बसले आहेत. आईचे डोळे रडल्याप्रमाणे सुजले आहेत. त्याला कळेना काय झालंय. तो स्वैपाकघरात गेला. आईला सांगितलं की मला भूक लागली आहे काही तरी खायला दे. त्याच्या आईने त्याला खाऊ दिला.

सौरवने खाता खाता आईला हळूच विचारले, काय झाले आहे?

ती म्हणाली,

“उद्याच्या रणजी मॅच मध्ये तुझी निवड झाली आहे.”

सौरव खुश झाला. एकदम आनंदात उडी मारली. एवढी मोठी बातमी आई आपल्याला इतक्या हळू आवाजात का सांगतेय त्याला कळेना. धावत धावत तो आपल्या भावाच्या रूम मध्ये गेला. स्नेहाशिषने त्याला मिठी मारली. अभिनंदन केलं. सौरवने उत्सुकतेने त्याला विचारलं,

“कोणाच्या जागी माझी निवड केली गेली आहे?”

स्नेहाशिष शांतपणे म्हणाला, माझ्या जागी !!

सौरवचा आनंदाचा सगळा उत्साह झटक्यात मावळला. घरात एवढी मरणकळा का पसरली आहे याच कारण त्याला समजल. खरतर तो पर्यंत सौरवने कधीच क्रिकेटला गंभीरपणे घेतलेलं नव्हत. उलट स्नेहाशिषसाठी क्रिकेटच जीव की प्राण होता. त्याने खूप मेहनत देखील घेतलेली आणि बंगाल फायनलला गेली आहे अशा महत्वाच्या सामन्यात त्याला बाहेर बसवलं याच सगळ्यांना वाईट वाटत होतं.

सौरवच बंगालच्या टीममध्ये आगमन हे स्नेहाशिषच्या कारकिर्दीचा विराम होता. हळू हळू त्याचे क्रिकेट संपत गेले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.