दादाच्या सुखी संसारात एक वादळ आल होतं.

तुम्हाला पिक्चरची स्टोरी वाटेल. पण अगदी खरी आहे. सौरव गांगुली एका श्रीमंत बापाचा बेटा. श्रीमंत म्हणजे काय अख्ख्या कोलकात्यामध्ये सगळ्यात श्रीमंत. चंडिदास गांगुलींचा प्रिंटींगचा बिझनेस होता. त्यात बराच पैसा छापला जायचा. म्हणून त्यांना लोक महाराजा म्हणायचे.

या चंडिदास गांगुलीचा शेजारी होता संजीव रॉय. तोसुद्धा तोडीस तोड तालेवार होता.

दोघांचं कम्पाउंड एकमेकाला चिकटून. मध्ये फक्त एक भिंत. तर हे सख्खे शेजारी एकमेकांचे बेस्ट फ्रेंड सुद्धा होते पण नंतर काही तरी कारणाने दोघांचं फाटलं. मग काय एकमेकांशी बोलन बंद, दोन्ही खानदानच एकमेकांशी मोठ्ठ वैर सुरु झालं.

हे वैर त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा सरकलं होतं. थोरला स्नेहाशीष आणि धाकटा सौरव यांच रॉय फमिलीमध्ये जाण येणं बंद झालं. तस बघितल तर सौरव ची आणि शेजारच्यांच्या डोनाची चांगली गट्टी जुळलेली होती. पण घरच्यांच्या भांडणात त्यांची पण ताटातूट झाली.

सगळ्या बंगाली मुलांप्रमाणे सौरव आणि त्याचा भाऊ गल्लीत फुटबॉल आणि क्रिकेट खेळायचे. सगळ्या बंगाली मुलींप्रमाणे डोना शास्त्रीय नृत्य शिकायला जायची. सौरवला आणि तिला खूप गप्पा मारायची इच्छा असायची पण एक वाक्य सुद्धा बोलायची परवानगी नसायची.

सौरवला खेळताना ती तासनतास आपल्या खिडकीतून बघायची.

पुढे दोघे कॉलेजला जाऊ लागले. तस दोघांचं धाडस देखील वाढल. एकमेकांना भिंतीवरून संदेश पाठवले जाऊ लागले. भेटीची ठिकाण ठरली जाऊ लागली. कधी सिनेमा तर कधी पाणीपुरीचे प्लॅन ठरू लागले, पण घरच्यांना लपवून.

याकाळात सौरव आणि त्याचा भाऊ दोघेही क्रिकेटमध्ये चांगलच नाव कमवत होते. डोनासुद्धा ओडीशी नृत्यामध्ये पारंगत झाली होती. उदय शंकर यांच्या पत्नीकडून तिने नृत्यप्रकार शिकला होता. मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर तिला आपल नृत्य सादर करायची संधी मिळत होती.

दरम्यान सौरव आंतरराष्ट्रीय टीममध्ये सिलेक्ट झाला.

पहिल्यांदा त्याच्या काही चुकांमुळे हातातली संधी वाया गेली मात्र पुढे रणजीमध्ये जीवतोड मेहनत घेतल्यावर तो परत भारताच्या टीमसाठी निवडला गेला. त्याने आपल्या पदार्पणातच इंग्लंडविरुद्ध लॉर्डसवर शतक मारले. जगभर त्याची चर्चा झाली. झटक्यात सौरव गांगुली हे नाव बंगाल मध्ये हिरोपदी विराजमान झाले होते.

त्या दौऱ्यातून परतल्यावर मात्र डोना आणि सौरवने ठरवलं,

हम एक दुसरे के सिवा रह नही सकते

आता बास झालं चोरीछुपे लव्ह स्टोरी. घरच्यांना सांगितलं. सुरवातीला खानदान की इज्जत, दुष्मनी वगैरे वाद झाले. अखेर बच्चोंकी ख़ुशी के लिये दोन्ही कुटुंबे एकत्र आली. दोघांचं धडाक्यात लग्न लावून दिल गेल. बंगाल टायगर लग्नाच्या बेडीत अडकला गेला. अगदी फिल्मी स्टाईलमध्ये सांगता झाली.

आता तुम्ही म्हणाल झालं पिक्चर संपला, पाट्या पाडा. तर थांबा. इथ कहाणी में ट्विस्ट आहे.

गांगुली हळूहळू फक्त बंगालमध्येच नाही तर अख्ख्या भारताचा लाडका दादा झाला होता. सचिन आणि त्याची ओपनिंग भल्याभल्यांची झोप उडवत होती. त्यांनी शतकांचा रतीब लावला होता. दरम्यान मॅच फिक्सिंग स्कँन्डल झालं आणि अझरूद्दीनच्या जागी गांगुली भारताचा कप्तान बनला.

गांगुलीच्या आयुष्यातला हा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. त्याच वर्षी डोनाला आणि त्याला एक गोड मुलगी देखील झाली.

याच काळात हळूच दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली. गांगुलीच पाय घरात टिकत नाही आहे. फिल्मस्टार नगमाबरोबर त्याची डाळ शिजत आहे असले लेख गॉसिप कॉलममधून बाहेर पडू लागले.

अस म्हणतात की नगमाची आणि गांगुलीची ओळख १९९९ च्या वर्ल्डकप मध्ये झाली होती. दोघांचे सूर जुळले. त्यानंतर त्याला घरकी मुर्गी दाल बराबर वाटू लागली. नगमा सारखी अख्ख्या दक्षिण भारताला पेटवणारी आयटम बॉम्ब जवळ आल्यावर कोणत्याही विश्वामित्राचा तपश्चर्या भंग होणे साहजिक होते.

बाकी काय का असेना गांगुली नगमा बऱ्याच कार्यक्रमात एकत्र दिसू लागले. ऑस्ट्रेलियन मिडिया यावरून त्याची मज्जा उडवू लागले. पब्लिकसुद्धा म्हणत होती की आग असल्याशिवाय धूर निघणार नाही.

एकदा तर चेन्नईच्या एका वर्तमानपत्रात त्या दोघांची मंदिरात एकत्र पूजा करतानाचे फोटो छापून आले.

त्यात म्हटल होत की आउट ऑफ फॉर्म असणाऱ्या गांगुलीच्या डोक्यावरील संकट दूर व्हावं म्हणून नगमा त्याला कालसर्प पूजा करण्यासाठी चेन्नई जवळच्या एका मंदिरात घेऊन गेली होती. लवकरच दोघे लग्न करणार आहेत अशी ब्रेकिंग न्यूज सुद्धा त्यांनी दिली होती.

मग मात्र डोनाने म्हटल इनफ इज इनफ. तिने एका पेपरमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये सगळ्या मिडियावाल्याना चांगलच खडसावून काढल. गांगुलीच्या पपांनीदेखील ते फोटो खोटे आहेत आणि आमच्या हितशत्रूंनी त्याच नाव बदनाम करण्यासाठी चाल रचली आहे अस सांगितलं.

डोनाच्या त्या रुद्रावतारामुळे एक गोष्ट झाली. गांगुलीच्या अफेअरच्या गोष्टी बंद झाल्या. पुढे काही वर्षांनी एका मुलाखतीमध्ये नगमाने मात्र सगळ्या गोष्टींवरून पडदा उचलला. ती म्हणाली,

” आमच एकमेकांवर खूप प्रेम होतं पण फक्त सौरवच्या करीयर वर आपल्या प्रेमाचा परिणाम होऊ नये म्हणून मी बाजूला झाले.”

गांगुलीने कधीच नगमा बद्दलच्या अफवेचा इन्कार ही केला नाही किंवा त्या बद्दल स्पष्टीकरण ही दिल नाही. पण कालांतराने त्याच्या अफेअरच्या चर्चा बंद होऊन गेल्या. डोनाचा आणि त्याचा संसार विनाविघ्न सुरु आहे. बाकी काही नाही बंगालमध्ये नगमाचे पिक्चर फ्लॉप होतात एवढच.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.