अनिल कुंबळेसाठी दादाने आपली कप्तानी पणाला लावली होती.

गोष्ट आहे २००३ सालची. गेल्या दोन वर्षात कप्तानशिप आपल्या ताब्यात आल्यापासून गांगुलीने भारतीय टीममध्ये अमुलाग्र बदल घडवून आणले होते. सचिन, कुंबळे, द्रविड, लक्ष्मण अशा जुन्या खेलाडूंसोबतच झहीर, युवराज, हरभजन, सेहवाग अशा नव्या दमाच्या प्लेअर्सना देखील समान संधी दिली. प्रसंगी कठोर निर्णय घेतले.

गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या टीमला जिंकण्याची सवय लागली. त्याच्या आक्रमक नेतृत्वामुळेच आपण २००३च्या फायनल पर्यंत पोहचलो होतो.

त्याच वर्षी आपल्याला फायनलमध्ये हरवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय टीमचा ४ कसोटीसाठीचा दौरा होणार होता. सिलेक्शन कमिटीचा टीम निवडीसाठी बराच उहापोह सुरु होता. भारताची बॅटिंग तगडी होती. मात्र बॉलिंगमध्ये काहीस आपण मागे पडत होतो. काही मोठे बदल करावे लागणार होते. बडोद्याच्या तरूण इरफान पठाणला पहिल्यादांच निवडलं गेल.

हरभजन तेव्हा फॉर्ममध्ये होता त्यामुळे त्याला बदलायचा प्रश्न नव्हता. फक्त लेग स्पिनरच्या जागे साठी जुन्या अनिल कुंबळेच्या ऐवजी तरुण मुरली कार्तिकची निवड करायची अस सिलेक्शन कमिटीने ठरवल होत. त्यांचं म्हणण होतं कि,

“अनिल कुंबळे परदेशी खेळपट्टीवर तितकासा प्रभावी नाही. त्याच्यापेक्षा मुरली कार्तिकचा चेंडू जास्त वळतो. शिवाय तो डावखुरा आहे, त्याला खेळणे ऑस्ट्रेलियन फलंदाजानां अवघड जाणार आहे.”

भारतीय कोच जॉन राईट सुद्धा कार्तिकला खेळवावे या मताचा होता. एरवी यंगस्टर्सनां संधी द्यायच्या बाजूने असणारा गांगुली यावेळी मात्र कुंबळेच्या बाजूने उभा होता.

रात्री २ वाजेपर्यंत चर्चा चालली. दोन्ही बाजूनी जोरजोरात वादविवाद झाले. बाकी सगळे मुरली कार्तिकच्या बाजूचे होते, फक्त गांगुली म्हणत होता कि मला टीममध्ये कुंबळेच हवा. तो पर्यंत निवडलेल्या टीमवर मी सही करणार नाही.

अखेर जॉन राईट तयार झाले पण सिलेक्शन कमिटीचे मेंबर तयार नव्हते. त्यांनी सौरव गांगुलीला धमकी दिली,

“जर कुंबळेने चांगली कामगिरी केली तर ठीक नाही तर या दौऱ्यानंतर त्याच्या बरोबर तुलाही कप्तानीचा राजीनामा द्यावं लागेल.”

दादाने रिस्क घेतली. त्याने कुंबळेसाठी आपली कप्तानीपणाला लावली. अनिलने देखील त्याचा विश्वास सार्थ ठरवला. १-१ ने ड्रॉ झालेल्या या सिरीजमध्ये कुंबळेने तब्बल २४ विकेट घेतल्या. दोन्ही टीममध्ये त्याच्याजवळपास देखील कोण नव्हतं. आपल्या टीकाकारांची त्याने बोलती बंद केली.

नुकताच एका मुलाखतीमध्ये गांगुलीने हा किस्सा सांगितला आहे. तो म्हणतो कि,

“आतापर्यंत भारताने पाहिलेला सर्वात मोठा मॅच विनर कुंबळे होता. त्याच्याशिवाय खेळण्याची मी कल्पना ही करू शकत नव्हतो. त्यामुळेच मी माझी कप्तानी पणाला लावली. “

अशीच वेळ दोन वर्षापूर्वी देखील आली होती.

तेव्हा भारताचा कोच निवडायची जबाबदारी सचिन, सौरव आणि लक्ष्मण या तिघांच्या क्रिकेट अॅडव्हाजिंग कमिटीवर होती. अनेकजणांचे अॅप्लिकेशन आले होते यात सगळ्यात आघाडीवर होते रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे.

कमिटीने कुंबळेच नाव निवडलं. चिडलेल्या शास्त्रीने गांगुलीवर आरोप केले. पुढे भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे याचं काही जास्त चांगला रेपो बनला नाही. काही तरी वाद झाले आणि अखेर कोहलीने आम्हाला शास्त्रीच कोच हवेत अशी भूमिका घेतली. विराटच्या हट्टाखातर कुंबळेऐवजी रवी शास्त्रींना आणण्यात आल. संपूर्ण देशभरातून या निर्णयाची टीका झाली.

अनेक सिनियर खेळाडूना हा निर्णय आवडला नव्हता पण त्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळले. पण गांगुली कुंबळेच्या पाठीशी उभा होता. तो शेवटपर्यंत म्हणत होता की

“अनिलला हटवण्याची पद्धत चुकीची होती. यातून चुकीचा संदेश जातो.”

नुकताच बातमी आली कि सौरव गांगुली बीसीसीआयचा प्रेसिडेंट होणार.

गंमती गंमतीमध्ये अशी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे कि ही बातमी वाचून भारताचे सध्याचे कोच रवी शास्त्री यांना घाम फुटला आहे. आता यातला जोक बाजूला केला तरी गांगुली आणि कुंबळेच्या मैत्रीमुळे हे होणे ही शक्य आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.