त्यादिवशी दादाने कप्तानीचा राजीनामा दिला. कारण होता युवराजसिंग !!

गोष्ट आहे २००५ सालची. पाकिस्तानची टीम भारत दौऱ्यावर आली होती. राजनैतिक दृष्ट्या देखील खूप महत्वाचा दौरा होता. वाजपेयीजीनी सुरु केलेल्या मैत्रीचा पुढचा अध्याय लिहिला जात होता. जिकडे जाईल तिथे पाकिस्तानी टीमच जल्लोषात स्वागत केलं जात होतं. पण सामने मात्र नेहमी प्रमाणे चुरशीने खेळले जात होते.

टेस्ट सिरीज बरोबरीच्या निकालात निघाली. पहिली वनडे कोचीमध्ये खेळवली जाणार होती. 

मार्च महिना संपत आला होता. दोन्ही टीम मध्ये कोची विमानतळावर उतरल्या. केरळमध्ये कडक ऊन तापलं होतं. प्रचंड उकाडा जाणवत होता. 2 एप्रिलला मॅच होती. मॅचच्या आदल्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे टीममिटिंग बोलवण्यात आली. कप्तान दादा गांगुली नेहमीच्या सवयीप्रमाणे उशिरा आले.

तो कॉन्फरन्स रूममध्ये येत असलेलं दिसताच तिथलं हसी-मजाकच वातावरण अचानक बदललं. प्रचंड शांतता पसरली.

गांगुलीला काही कळेना काय झालंय. काही तरी असेल म्हणून त्याने मिटिंगची सूत्र आपल्या हातात घेतली. तो उद्याच्या मॅचबद्दल काही तरी बोलणार इतक्यात हरभजनसिंगने हात वर केला. दादाने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहिल. हरभजनने न बोलताच काही पेपरचे कटिंग त्याच्याकडे पास केले.

भज्जी एवढा शांत कसा काय याच दडला आश्चर्य वाटत होत.त्याने ते पेपर हातात घेतले आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्या वर्तमानपत्रात गांगुलीची मुलाखत छापून आली होती. ज्यात त्याने कसोटी मध्ये अपेक्षित यश मिळाल नाही यासाठी युवराज, हरभजन, झहीर खान यांना जबाबदार धरल होतं.

“युवराजला कायम मुली फिरवण्यात इंटरेस्ट आहे, हरभजनला डिस्कोसोडून काही सुचत नाही. झहीर आणि सेहवागसुद्धा खेळण्याबद्दल सिरीयस नाही आहेत.”

आपल्या कमीटमेंटबद्दल शंका उपस्थितीत झाल्यामुळे झहीर आणि युवराज चिडले, 

“क्या दादा? आपसे हमे ये उम्मीद नही थी. हम भी आप जितने ही हार्ड वर्किंग है. हम भी अपने देश कॉ रिप्रेजेंट करते है. आप हमपर ब्लेम कैसे डाल सकते है. “

टीम मिटिंगमध्ये द्रविड आणि सचिन हे सिनियर प्लेअरसुद्धा हजर होते. त्यांनी देखील गांगुलीला हे काही बरोबर केलं नाही अशा टाईपचा लुक दिला. पण गांगुली म्हणत होता की,

मी अशी कोणतीही मुलाखत दिलीच नाही. मी काही बोललोच नाही.

फक्त हिंदी इंग्लिश नाही तर लोकल मल्ल्याळम वर्तमानपत्रात देखील हे स्टेटमेंट छापून आले होते.

टीम मिटिंग मध्ये प्रचंड गरमागरमी झाली. सगळे पेपर टीमच्या मॅनेजरकडे देण्यात आले. त्यांनी देखील गांगुलीची चूक आहे हे मान्य केलं. गांगुलीने सगळ्या खेळाडूंची माफी मागितली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. वातावरण तापले. सेहवागने तर सांगून टाकले,

“आमच्यावर असे आरोप होणार असतील तर आम्ही मॅच खेळणार नाही.”

हे ऐकून हरभजनने आपली कीटबग उचलली आणि तो निघालाच. सचिनने त्याला अडवले. इंग्लंडमध्ये लॉर्डसवर शर्ट फिरवणारा बंगालचा वाघ सौरव गांगुली आपल्या सहकाऱ्याच्या चिडण्यामुळे हतबल झाला होता. त्याच्या डोळ्यात पाणी उभे राहिले होते.

अखेर गांगुलीने माफी मागितली आणि थेट आपल्या कप्तानीचा राजीनामा दिला.

सगळी टीम थक्क झाली. ज्यानं मॅच फिक्सिंगच्या राखेतून संघ उभा केला, भारताला वर्ल्डकपच्या फायनल पर्यंत पोहचवल, हरभजन युवराज सेहवाग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला दादा एवढ्या छोट्याशा कारणासाठी राजीनामा देऊन निघाला होता. राहुल द्रविड त्याच्या पाठोपाठ गेला. त्याने दादाला रोखल आणि म्हणाला,

“सौरव आज तारीख कौनसी है?”

तेव्हा गांगुलीच्या डोक्यात प्रकाश पडला. तो दिवस होता १ एप्रिल, म्हणजेच एप्रिल फुलचा दिवस.

युवराज हरभजन आणि गंगने दादाचा एप्रिल फुल केलेला. तसही कोणतीही मुलाखत छापून आली नव्हती. युवराजसिंग ने सगळा प्लन केला होता. विशेष म्हणजे सगळ्या टीमला माहित आणि ते सगळे यात शामिल होते. सगळ्यांना मारण्यासाठी गांगुली धावला.

झालं अस होतं की खूप वर्षापूर्वी युवराजला गांगुलीने ओपनिंग करायची आहे अस सांगून घाबरवल होतं, युवराज त्यादिवशी रात्रभर झोपला नव्हता. मग नंतर सांगितलं की तो प्रँक होता. याच प्रँक चा बदला युवराजने घेतला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.