ब्रिटनची महाराणीच नाही तर संपूर्ण राजघराण्यात कोणी कांदा-लसूण खात नाही.. 

होय हे खरय..!!! तुम्ही जी हेडलाईन वाचली ती १०० टक्के खरीय. आत्ता यात काय विशेष. कांदा लसूण तर आपल्याकडे जैन-ब्राह्मण इत्यादी समाजात देखील खात नाहीत… 

असे हो हेच तर विशेष आहे. म्हणजे कसय इतर कोणती गोष्ट इंग्लडची राणी किंवा त्यांच्या राजवाड्यात खाल्ली जात नसती तर विशेष नसतं. पण आपल्याकडे धार्मिक कारणातून कांदा-लसूण खाल्ला जात नाही असाच प्रकार इंग्लडच्या राजघराण्यात देखील आहे. 

काही लोक याच गोष्टीचा संदर्भ देवून अखंड हिंदूस्थान इंग्लडपार नेण्याची घोषणा करत असतात तर काही लोकं इंग्लडच राजघराणं ओरिजनली कसं हिंदू आहे याची पण थेअरी मांडत असतात, तर काही लोकं ही एक कॉन्सपरेसी थेअरी आहे हे सांगून वेळ मारत असतात.. 

पण नक्की काय आहे, हे खरय की थेअरी. अन् खरं असेल तर पुरावे काय आहेत. अन् पुरावे असतील तर कारण काय आहे. याच सगळ्या प्रश्नाची उत्तरं पाहू.. 

तर रेफरन्स क्रमांक एक स्कॉटिश डेली एक्सप्रेस. त्यांनी ट्विट करुन इंग्लडच्या राजघराण्यात लसूण बॅन असल्याची माहिती दिली होती. खाली ट्विट आहे त्यात तूम्ही हा व्हिडीओ पाहू शकता.. 

दूसरा संदर्भ लागतो तो खुद्द राजघराण्यातील सदस्याने सांगितलेल्या माहितीचा. कारण त्यापूर्वी ही फक्त एक अफवा असेल असा समज होता. 

पिंन्स चार्ल्स यांची पत्नी डचेस ऑफ कॉर्नवाल कॅमिला पार्कर यांनी बाऊल्स मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं होतं की बंकिंगहम पॅलेसमध्ये लसणावर बॅन आहे. त्यानंतर १५ वर्ष राजघराण्याचे प्रमुख शेफ राहिलेल्या डॅरेन मेकग्राडी यांनी देखील स्पष्टीकरण दिलं होतं की लसूण आणि कांदा या दोन गोष्टींवर राजघराण्यात बॅन आहे. इथे कोणालाच कोणत्याही पदार्थात लसूण आणि कांदा दिला जात नाही. 

Screenshot 2022 06 02 at 7.19.56 PM

आत्ता याबद्दलच नेमकं कारण कोणीच स्पष्ट सांगत नाही. मिडीया वेगवेगळे अंदाज लावत राहते अन् तेच प्रमुख कारण सांगितलं जातं. मिडीयाच्या मते राजघराण्यातील व्यक्ती वेगवेगळ्या लोकांना भेटत असतात.

राजशिष्टाचार पाळण्याचे नियम आहेत. अशा वेळी तोंडाचा वास येणं हे राजशिष्टाचारात बसत नाही. त्यामुळेच राजघराण्यात कांदा लसूण पाळला जातो. 

आत्ता हे आजच का सांगितलं तर आज म्हणजे २ जूनला महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांनी आपला ७० वर्षांचा राज्यकाळ पुर्ण केला आहे. त्यानिमित्त देशभर हॉलिडे आहे, आनंद साजरा केला जात आहे. अशा दिवशीच महाराणींची एक अतरंगी गोष्ट मांडावी म्हणून हा किस्सा. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.