आयआयटी इंजिनियरने बनवलेल्या गर्व टॉयलेटचं कौतुक युनोमध्ये देखील होत आहे

आपण बऱ्याचदा सार्वजनिक टॉयलेट वापरायला काचकूच करतो. कारण या टॉयलेटची अस्वछता ही सगळ्यात मोठी समस्या आहे. संबंधित प्रशासनाकडून त्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली असते. पण तरीही त्या टॉयलेटच्या बाजूने जातानाही नाकाला रुमाल हा लावावाचं लागतो. मात्र, मयंक मिढा यांनी गर्व टॉयलेटच्या माध्यमातून  या प्रॉब्लेमच सोल्युशन शोधून काढलं. असे टॉयलेट बनवले जे ऑटोमॅटिकली क्लीन होतात.

तसे हे टॉयलेट २०१४ लाच आले होते, पण  नुकताच या टॉयलेटची युनायटेड नेशन डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम (UNDP) साठी निवड झालीये. महत्वाचं म्हणजे  सगळ्या जगातल्या फक्त चार कंपन्यांची वेस्ट मॅनेजमेंट प्रोग्राम अंतर्गत निवड करण्यात आली आहे, ज्यात भारताच्या गर्व टॉयलेटच्या समावेश आहे.  त्यातल्या त्यात या प्रोग्रॅममध्ये आधुनिक टॉयलेटच्या प्रकारात फक्त पिंक टॉयलेटलाच संधी देण्यात आलीये. 

जोडप्यानं मिळून लावला हातभार

‘स्वच्छ भारत मिशन’चा विषय समोर येताच मयंक मिढा यांना स्वच्छता क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. मयंक यांनी  एक मुलाखतीत सांगितले कि, “देशातल्या पब्लिक टॉयलेटच्या देखभालीशी संबंधित वाढत्या समस्यांमुळे त्याचा उपक्रम अस्तित्वात आला. मयंक मिढा आणि मेघा मिढा  या दोघांनी मिळून २०१४ मध्ये या उपक्रमावर काम केले.

पब्लिक टॉयलेटमध्ये पाणी, वीज आणि व्हेन्टिलेशनची मोठी समस्या असते. गर्व टॉयलेटने  स्वच्छता क्षेत्रातली हीच पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला. आज १९००  गर्व टॉयलेट देशभरातल्या २६२ जागांवर बसवण्यात आलीत. यात ७०० पेक्षा जास्त पिंक टॉयलेट आहेत, जी महिलांना ध्यानात ठेवून बनवली गेलीत.  दिवसभरातून १. ४ लाख वेळा या टॉयलेटच्या वापर केला जातो.

जिन्हिवात होणार प्रदर्शन 

आयआयटीत बनवलेल्या या ग्रीन टॉयलेटला २०१८ मध्ये युनिनिव्हरकडून यंग एन्टरप्रोनर अवार्ड आणि २०१९ मध्ये  दुबईत मोहम्मद बिन राशिद अवार्डने गौरवण्यात आलय. दरम्यान, सध्या स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहरात नोव्हेंबर महिन्यात एक कार्यक्रम होणार आहे.  ज्यात जगभरातील गुंतवणूकदारांच्या दरम्यन मयंक आपल्या या उत्पादनाचे प्रदर्शन करतील.  

अनेक सुविधांनी सुसज्ज..

गर्वच्या पिंक टॉयलेटमध्ये क्लिनिंगची हायटेक व्यवस्था आहे. याशिवाय सामान्य गर्व  टॉयलेटमध्ये  अल्ट्रा सायलेंट बसवण्यात आलेत, जे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा खात्मा करतील. यात बायो डायजेस्टर सुद्धा फिट करण्यात आलाय. जे विशेष बॅक्टरीयाच्या माध्यमातून वेस्टला पाण्यात बदलत आणि फ्लशसाठी याच पाण्याचा वापर होतो. या टॉयलेटची खासियत म्हणजे  ५० टक्के पाण्याच्या बचतीसह यात महिलांना सँनिटरी पॅड डिस्पोजल  आणि व्हेंडिंग मशीनचीही सुविधा मिळते. तर यात बेबी फीडिंग रूमसुद्धा आहे. तसेच, व्हेंटिलेशनसाठी एक्झॉस्ट फॅन आहेत.

गर्वने त्याच्या एनजीओ पार्टनरच्या मदतीने शाळा, ग्रामीण भागात आणि शहरात आपली टॉयलेट बसवली आहेत. त्यांच्या विस्तारलेल्या नेटवर्कद्वारे आणि  एनजीओ, सीएसआर प्रकल्पच्या सहकार्याद्वारे, दररोज सुमारे १८,००० मुले गर्व  शौचालयांचा वापर करतात.

गर्वची टॉयलेट अश्या प्रकारे तयार केली गेली आहेत की वर्षानुवर्षे त्यांचे बांधकाम आणि देखभाल करण्यासाठी भांडवली खर्च कमी असेल.  मेटल इनक्लोजरपासून वबनवलेली हि टॉयलेट रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन सिस्टम (आरएफआयडी) आणि आयओटी तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.  सर्व टॉयलेटमध्ये सोलार युनिटचा वापर केलाय. जे लाईट आणि ऑटोमॅटिक सिस्टीम चालविण्यात मदत करतात. 

या टॉयलेटची किंमत २.५ ते ४.२ लाखांच्या दरम्यान आहे, जे युजरच्या आवश्यकतेनुसार टॉयलेट युनिटमध्ये असणाऱ्या फिचरनुसार आहे.

गर्वने मेट्रो रेल कॉर्पोरेशनबरोबरही अग्रीमेंट केलं आहे. त्याअंतर्गत दिल्ली मेट्रो स्टेशनमध्ये स्मार्ट सॅनिटायझेशन सेंटर उभारण्याची त्यांची योजना आहे. एवढंच नाही ते  तुर्की सरकारशीही सहकार्य करीत आहेत जेथे ते निर्वासितांसाठी ही स्वच्छता युनिट बसविण्यात येणार आहेत. 

 

हे ही  वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.