राजेश खन्नाच्या गर्लफ्रेंडसोबत गॅरी सोबर्सने साखरपुडा उरकून टाकला होता…..

बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं रिलेशनशिप लै घट्ट आहे. भले भले सेलिब्रिटीसुद्धा यातून वाचले नाहीत आणि चांगले चांगले क्रिकेटरसुद्धा या मोहात अडकले. तस बघितलं तर क्रिकेटर लोकांचा रुबाब हा हिरोलासुद्धा लाजवणारा असतो. म्हणजे दुसऱ्याची गर्लफ्रेंड सुद्धा त्यांच्यावर भाळली जाणे हेच त्यांच्या पर्सनॅलिटीवरून कळतं. तर आजचा किस्सा सुद्धा असाच आहे इथं गर्लफ्रेंड फक्त भाळली नाही तर थेट साखरपुडा करून मोकळी झाली होती.

वेस्ट इंडिजचाच नव्हे तर जागतिक दर्जाचा महान खेळाडू गॅरी सोबर्स याने केलेल्या विक्रमांची नोंद आजतागायत टिकून आहे. पदार्पणातच २१ वर्षाचा असताना सोबर्सने ३६५ धावा तड्कावून आपली एंट्री झाल्याचा बिगुल वाजवला होता. पुढे तेच काम त्याने करत ६ बॉलमध्ये ६ सिक्सर मारले होते. वेस्ट इंडिजचा सगळ्यात जबरदस्त प्लेअर म्हणून गॅरी सोबर्सला ओळखलं जायचं.

सेलिब्रेशन मित्रमंडळ म्हणून वेस्ट इंडिजची टीम ओळखली जाते. आयपीएलमध्ये स्टार वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना आपण धिंगाणा घालताना बघतच असतो. पण आजच्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंपेक्षा मोठा बॉम्ब गॅरी सोबर्सने फोडला होता. हा इतका जबरदस्त धक्का होता कि राजेश खन्नासुद्धा हादरून गेले होते.

एकेकाळचा मोठा सुपरस्टार असलेले राजेश खन्ना यांचे सिनेमे हळूहळू फ्लॉप व्हायला लागले. डिंपल कपाडियासोबत त्यांचं पटत नसल्याच्या वार्ता त्यावेळी सुरु होत्या. १६ वर्षाच्या डिंपल कपाडियासोबत रिलेशनशिप मध्ये येण्याअगोदर राजेश खन्ना अंजु महेंद्रू या अभिनेत्रीला डेट करत होते. या दोघांच्या अफेयरचे किस्से सगळीकडे बोलले जात होते. 

पण काही दिवसानंतर या दोघांच्या नात्यात वितुष्ट येऊ लागलं. कारण होतं अंजु महेंद्रूचं सिनेमात काम करणं. राजेश खन्नाला हे खटकलं होतं. राजेश खन्ना यांची इच्छा होती कि अंजु महेंद्रूने सिनेमात काम करू नये. त्याच काळात बॉलिवूडमध्ये असंही बोललं जात होतं कि जर राजेश खन्नांनी ठरवलं तर ते अंजु महेंद्रूला बॉलिवूडची महाराणी बनवू शकतात कारण त्यावेळी बॉलिवूड राजेश खन्नांच्या इशाऱ्यावर चालत होतं.

राजेश खन्ना यांच्या बायोग्राफीत ‘ कुछ तो लोग कहेंगे ‘ मध्ये हा किस्सा सांगण्यात आला आहे कि अंजु महेंद्रू आणि राजेश खन्ना यांच्या नात्यातला हा मतभेद ऐन भरात असताना एका तिसऱ्या व्यक्तीची यात एंट्री झाली आणि ती व्यक्ती होती वेस्ट इंडिजचे त्याकाळचे तोफ म्हणून ओळखले जाणारे गॅरी सोबर्स. या व्यक्तीच्या एन्ट्रीने राजेश खन्नांना मोठा धक्का बसला आणि ते डोकं धरून रडायला लागले होते. 

त्यावेळी अंजु महेंद्रूची ओळख गॅरी सोबर्ससोबत झाली होती. यांचं नातं बहरत असताना मीडियामध्ये या दोघांच्या नात्याची भयंकर चर्चा सुरु अली होती. गॅरी सोबर्सने अंजु महेंद्रूला आपली मॅच पाहण्यासाठी कोलकातामध्ये बोलावलं होतं. तेव्हाच रात्री एक पार्टी आयोजित करण्यात आली होती.

याच पार्टीत डान्स करत असताना गॅरी सोबर्सने अंजु महेंद्रूला प्रपोज करून अंगठी घातली. अंजु महेंद्रूनेसुद्धा सोबर्सची अंगठी स्वीकारली. पण तेव्हा अंजु महेंद्रू हि राजेश खन्नांची गर्लफ्रेंड होती.

ज्यावेळी अंजु महेंद्रू सोबर्सच्या प्रस्तावाची अंगठी घेऊन मुंबईत आली आणि राजेश खन्नाला जेव्हा हा मॅटर कळला तेव्हा ते अंजु महेंद्रूवर ओरडू लागले. राजेश खन्नांना हा मोठा धक्काच बसला होता.

पुढे हे प्रकरण चांगलंच गाजलं. नंतर स्टारडस्टला दिलेल्या एका मुलाखतीत अंजु महेंद्रूने या घटनेबाबतचा खुलासा करताना सांगितलं होतं कि,

त्यावेळी राजेश खन्नांसोबत मी रिलेशनशिपमध्ये होते. पण आमच्यात काही कारणास्तव वाद झाले होते. राजेश खन्नांवर चिडून मी गॅरी सोबर्सची मागणी स्वीकारली. पण याचा अर्थ असा नव्हता कि मला गॅरी आवडत होता. नंतर राजेश खन्नांच्या घरून मी गॅरीला फोन केला आणि साखरपूडा मोडून टाकला.

हे प्रकरण त्यावेळी भारतच नाही तर वेस्ट इंडिजमध्येही चांगलं गाजलं होतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.