एका मराठा सैनिकाने मुघलांच्या दारात शंकराचं मंदीर उभा करुन दाखवले…!

दिलोंपे राज करनेवाली दिल्ली. या दिल्लीवर अनेकांनी राज्य केले, अनेकांनी हल्ले केले, अनेकांनी लुटलं.  देशोदेशीवरून घुसखोर दिल्ली लुटायला यायचे. अनेक वेळा दिल्ली राखेतून पुन्हा उभी राहिली. महाभारतातल्या कौरवपांडवांच्या युद्धापासून ते मुघल सुलतानांच्या पर्यंत अनेक राज्यकर्ते या दिल्लीने पाहिले.

मुघलांनी खऱ्या अर्थाने दिल्लीवर राज्य केलं. तिला ऐश्वर्य मिळवून दिल. या मुघलांच्या दिल्लीत त्यांचा मुख्य राजवाडा होता लाल किल्ल्यात. याच लाल किल्ल्यात बसून औरंगजेबापासून पुढे अनेक बादशाहानी हिंदुस्तानच्या बऱ्या वाईटाचे निर्णय घेतले. शिवरायांच्या मराठा साम्राज्याला संपवण्याचं स्वप्न बघितलं. मंदिरे लुटण्याची खलबत केली.

याच लाल किल्ल्याच्या अगदी समोर काही मंदिरे ताठ मानेने उभी आहेत. त्यापैकी आहे एक आहे गौरीशंकर मंदिर. आणि हे गौरीशंकर मंदिर उभारलं आहे एका मराठा वीरानं त्याचं नाव आहे अप्पा गंगाधर.

शेकडो वर्षापूर्वी जेव्हा दिल्ली आज आहे तेवढी वैभवशाली नगरी नव्हती. यमुना नदीवर वसलेलं छोट शहर होत. तिथला राजा होता धील्लू. त्याच्या नावावरूनच या गावाला दिल्ली म्हणायचे. लाल किल्ल्याचा परिसर म्हणजे घनदाट जंगल होत.या धील्लू राजाला अनेक मुली होत्या. त्यापैकी एक राजकन्या शिवभक्त होती. दर पौर्णिमेला ती उपवास करायची आणि रात्री यमुना नदीवर स्नान करून मगच उपवासाची सांगता करायची.

अशाच एका पौर्णिमेला ती राजकन्या आपल्या दासीना घेऊन यमुनेवर गेली. तिचं स्नान झाल्यावर तिला नदीच्या काठावर झाडांना लागलेली काही सुंदर फुले दिसली. ती आणि तिच्या दासी ती सुंदर फुले तोडण्यात मग्न झाल्या. त्यात वेळ कसा गेला त्यांना कळालेच नाही.

पहाट होत आली. त्यावेळी काही ठग तेथून जात होते. त्यांना ही सुंदर राजकन्या दिसली. त्या क्रूर डाकूंनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यापासून स्वतःच्या शिलाच रक्षण करण्यासाठी राजकन्येने स्वतःच्या पोटात खंजीर खुपसून घेतला.

राजाने आपल्या लाडक्या मुलीच्या स्मरणार्थ ज्या पिंपळाच्या झाडाखाली  तिचा मृत्यू झाला तिथेच एक शिवलिंग स्थापन केलं.

पुढे अनेक वर्षे गेली. अनेक राजे सुलतान दिल्लीवर राज्य करून गेले. औरंगजेबाच्यानंतर मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली. या खिळखिळ्या झालेल्या सत्तेमुळे अनेक परकिय आक्रमक दिल्लीकडे येऊ लागले. त्यापैकी अफगाणी सम्राट नादीरशहाने दिल्लीची राखरांगोळी केली. त्याच्यापाठोपाठ आला अहमदशहा अब्दाली. या अनेक वर्षात पिंपळाखालचे ते शिवलिंग तसेच लपून राहिले.

या अब्दालीला रोखण्यासाठी सदाशिवराव भाऊ पेशव्याच्या नेतृत्वाखालच मराठा सैन्य उत्तरेत आलं. त्यांच्यासोबत शिंदे होळकर असे अनेक महान सरदार होते. पण दुर्दैवाने पानिपताच्या तिसऱ्या युद्धात पेशव्यांचा मोठा पराभव झाला. पेशव्यांचा मुलगा विश्वासराव युद्धात कामी आला. पुतण्या ठार झालेले पाहून सदाशिवराव भाऊ बेभान होऊन पठाणी सैन्यात घुसला आणि गायब झाला. 

अफगाण सैनिकांनी मराठ्यांचा अमानुष हत्यासत्र सुरु केलं. आपला सेनापती गायब झालेले पाहून मराठा सैन्याचं धैर्य खचल. असं म्हणतात याच पानिपत युद्धात अप्पा गंगाधर नावाचा शिंदेचा दरबारी सुद्धा होता.

अप्पा गंगाधर जीव मुठीत धरून पानिपतावरून निसटला. त्याला आपलं प्राण वाचेल की नाही याची शाश्वती नव्हती. दक्षिणेकडे जाणे तर शक्य नव्हते. अब्दालीचे सैनिक लांडग्यासारखे मराठ्यांचा शोध घेत होते.

एका धर्मशाळेत साधू बनून आसरा घेतलेल्या अप्पा गंगाधराला रात्री स्वप्न पडले. त्याला त्या स्वप्नात दिल्लीमधले ते शिवलिंग दिसले. सकाळी उठल्यावर त्याने निश्चय केला आपले प्राण वाचले तर या मंदिराचा जीर्णोद्धार करेन.

वेश बदलून तो मजल दरमजल करत दिल्लीला पोहचला. त्याला चांदणी चौकात ते शिवलिंग सापडले.

पुढे काहीच वर्षांनी महादजी शिंदेनी दिल्लीवर मराठयांच वर्चस्व निर्माण केलं. नामधारी मुघल बादशाहाला गादीवर बसवले आणि त्यांनी वजीर म्हणून कारभार आपल्या हातात घेतला. शिंदेशाही ची परत आल्यानंतर अज्ञातवासातला अप्पा गंगाधरसुद्धा साधूरूपातून बाहेर आला. 

महादजी शिंदेच्या दरबारात अप्पा गंगाधराने लवून मुजरा केला. आपला जुना सहकारी परत आल्यामुळे महादजी खुश झाले. अप्पा त्यांना म्हणाला,

“सरकार दिल्लीश्वाराला मराठी सत्तेचा अंकित करण्याचं महाराजांचं स्वप्न आपण पूर्ण केलत. यानिम्मितान फक्त एकच मागण होत”

महादजीनी सांगितलं काय हव ते मागा. अप्पा गंगाधराने स्वतःसाठी काही मागितलं नाही. त्यान मागितली शिवमंदिरासाठी लाल किल्ल्यासमोरची चांदणी चौकातली जागा. महादजी शिंदेन आश्चर्य वाटले. पण त्यांनी ती जागा दिली.

अप्पा गंगाधराने तिथला जीर्णोद्धार केला आणि अतिशय सुंदर गौरीशंकराच मंदिर उभारलं. मुघल सत्तेच प्रतिक असणाऱ्या लालकिल्ल्याच्या दारासमोर हे मंदिर उभे आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.