गौतम अदानी आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीमागे नेमकं कोणतं गुळपीठ शिजतंय ?

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सध्या देशभर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामागचं स्पष्टीकरण देताना तृणमूल काँग्रेसनं सांगितलं कि, हा दौरा म्हणजे पुढच्या वर्षी होणाऱ्या बिझनेस समिटसंदर्भात देशातील सर्व क्षेत्रातील दिग्गजांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करणं. त्यामुळे ममता दीदी देशभरातील नेतेमंडीळीची सुद्धा भेट घेत आहेत. 

आपल्या मुबई दौऱ्यानंतर लगेचचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक गौतम अदानी यांची भेट घेतली. राज्य सचिवालय ‘नबन्ना’ इथे या दोघांची भेट झाली. 

या भेटीमागचं कारण म्हणजे पश्चिम बंगालमधल्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं. आणि याच गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर दीदी आणि अदानी यांच्यात चर्चा झाली. जवळपास दीड तास ही बैठक चालली. 

एवढंच नाही तर या भेटीनंतर अदानी यांनी पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये सहभागी होणार असल्याचं सुद्धा सांगितलं. या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जीही उपस्थित होते.

बैठकीनंतर अदानी यांनी ट्विट केले की, 

“माननीय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटून आनंद झाला. त्यांच्याशी गुंतवणुकीची विविध परिस्थिती आणि पश्चिम बंगालच्या प्रचंड क्षमतेवर चर्चा केली. मी एप्रिल २०२२ मध्ये बंगाल ग्लोबल बिझनेस कॉन्फरन्स (BGBS) मध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे.” 

 

 दरम्यान, तृणमूल पक्षाकडून ममता दीदींच्या या दौऱ्यामागचं कारण जरी बिझनेस समिट असल्याचं सांगण्यात येत असलं, तरी यामागे ममता दीदींचा वेगळाच प्लॅन असल्याचं देखील बोललं जातंय. म्हणजेच चर्चा आहे ती ममता दीदींच्या पुढाकारानं देशाच्या राजकारणातील तिसरी आघाडी. 

कारण ममता दीदी पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन करून बाकीच्या राज्यांमध्येही निवडणूक लढवत आहेत. जेणेकरून त्या ता भागात तृणमूल पक्षाचा जम बसू शकेल. त्यात त्यांनी इतर पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आपल्याकडे वळवण्याची रणनिती सुरु केलीये. आगामी वर्षात ज्या राज्यांत विधानसभा निवडणूका आहेत. तिथल्या दिग्गज नेत्यांच्या तृणमूल पक्षाच्या प्रवेशाने ही गोष्ट क्लियर केली आहे. 

त्यात ममता दीदी नुकताच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होत्या. आता महाराष्ट्रात काही निवडणूका नाहीत. पण आपल्या तिसऱ्या आघाडीच्या दिशेने एक पाऊल म्ह्णून ही मुंबई भेट असल्याचे बोलले जाते. ज्यात ममता दीदींचा पक्ष  भाजपविरोधी पक्षांना  एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 या भेटीदरम्यान, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, संजय राऊत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे, प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांसारख्या राजकारण्यांची भेट घेतली. 

आता अदानींची भेट तशी राजकीय नाही पण पश्चिम बंगालच्या विकासासाठी महत्वाची होती. जेणेकरून अदानी राज्यात गुंतवणूक करतील आणि त्याचा फायदा असा होईल कि, एक तर आपला रोजगार निर्मितीचा प्लॅन पूर्ण होईल आणि दुसरं त्याचीच मार्केटिंग बाकीच्या राज्यांमध्ये निवडणूक लढवताना करता येईल.  म्हणजे काय एका दगडात दोन पक्षी मारणं. 

हे ही वाचं भिडू :

 

 

English Summary: Mamata Banerjee Meets Gautam Adani In Kolkata

 

Leave A Reply

Your email address will not be published.