गौतम अदानी यांनी आपल्या चरित्र लेखनाची तयारी २०१३ सालीच सुरू केलेली

काही जनता अदानी -अंबानी- मोदी असं एक गणित नेहेमीच मांडत असतात. काही पंतप्रधान मोदींवर थेट आरोप करतात कि, सामान्य जनतेला सोडून तुम्ही काही उद्योगपतींना मोठं केलंत, त्यांच्या घश्यात अनेक सरकारी कंपन्या घातल्या आणि सामान्य नागरिकांना बेरोजगार केलं, इत्यादी.

माझं हे बोलण्याचं निमित्त म्हणजे, अलीकडेच, फायनान्शिअल टाईम्सच्या एका लेखात एक लेख छापून आला, मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून गुजरातमधील एका व्यावसायिकाच्या संपत्तीत झालेली आश्चर्यकारक वाढ….

याच लेखात एक पॅराग्राफ असाय की, ‘श्री मोदींनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारायाला ते गुजरातहून राजधानी नवी दिल्लीला गौतम अदानी यांच्या खाजगी विमानाने गेले होते. यातून त्यांनी आपल्या मैत्रीचे खुले प्रदर्शन तर केले. याचा एक मैत्रीखातर विमान दिले एवढाच नव्हता तर मोदींच्या पंतप्रधान होण्यासोबतच अदानी यांनी आपल्याही सत्तेचा उदय होताना दिसला. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर, सरकारी टेंडर मिळवून आणि देशभरात पायाभूत सुविधा प्रकल्प उभारून अदानी यांची एकूण संपत्ती तब्बल २३० टक्क्यांनी वाढून $२६ अब्ज झाली होती.

याबाबत लेखक रामचंद्र गुहा यांनी एका लेखात विस्तृतपणे लिहिलंय

त्यांनी २०१३ च्या दरम्यान गांधी बिफोर इंडिया’ हे पुस्तकावर लेखन करत होते.  त्याच वर्षी डिसेंबरमध्ये रामचंद्र गुहा हे मुंबईतील एका साहित्य संमेलनात त्यांच्या या नवीन पुस्तकाबद्दल बोलायला गेले होते.

त्यांच्या व्याख्यानानंतर एक तरुण त्यांना भेटायला आला आणि त्याने एक महत्त्वाकांक्षी लेखक म्हणून स्वतःची ओळख करून दिली. काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे, असे तो म्हणाले. मात्र, गुहा याना बंगळुरूला लागलीच निघायचे होते त्यामुळे त्यांनी त्यांचा ईमेल त्या तरुणाला दिला जेणेकरून तो गुहा याना संपर्क साधू शकेल. काही दिवसांनी त्या तरुणाने त्यांना मेल करून सांगितले की तो एका कन्सल्टन्सी फर्मशी संबंधित आहे. जी फर्म गौतम अदानी यांच्या चरित्राशी संबंधित प्रोजेक्टवर काम करतेय. अनेक टॉपच्या प्रकाशकांनि या प्रकल्पात रस घेतलाय. पण आम्ही अशा व्यक्तीच्या शोधात आहोत जो या प्रकल्पासाठी आमच्यासाठी ‘मार्गदर्शक’ आणि ‘सल्लागार’ म्हणून काम करू शकेल. गुहा यांनी त्यांचे ‘मार्गदर्शक’ आणि ‘सल्लागार’ व्हावे अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणून त्यांनी गौतम अदानी आणि गुहा यांच्या भेटीचा प्रस्ताव ठेवला होता. 

आधीच गुहा महात्मा गांधींवरील लेखनामुळे संशोधनासाठी वारंवार जात येत असल्याने त्यांना गौतम अदानीबद्दल काही थोडीफार माहिती होती.  त्याचदरम्यान गुजरात सरकारने अहमदाबादमध्ये किनारी भागात अदानीच्या प्रकल्पांना कशी झटपट मंजुरी दिली, ज्यामुळे मच्छिमारांचे विस्थापन झाले आणि खारफुटीच्या जंगलांचे नुकसान झाले..इत्यादी गोष्टी कानावर आल्या. 

खरं तर २०१३ च्या डिसेंबर  मध्येच हे स्पष्ट दिसत होते कि, मोदीच भारताचे पुढील पंतप्रधान असतील….आणि दुसरीकडे उजरातच्या जनतेला हेही लक्षात आले कि आता जेंव्हा मोदी सत्तेवर येतील तेंव्हा गौतम अदानींचे महत्त्व वाढेल. आणि म्हणूनअधिक प्रभावशाली आणि महत्त्वाचे उद्योगपती म्हणून   लक्षात घेऊन, त्यांचे चरित्र प्रकाशित व्हावे अशी अदानी यांच्या सल्लागारांची इच्छा होती आणि गांधींच्या या चरित्रकाराने त्यांच्या लेखनात महत्त्वाची भूमिका बजावावी असाही त्यांच्या सल्लागारांचा मानस होता. 

गौतम अदानी यांचे चरित्र लिहिण्यासारखा अनपेक्षित प्रस्ताव रामचंद्र गुहा यांच्यासाठी नवीन नव्हता. त्यांनी गांधींवर काम करण्यास सुरुवात करण्यापूर्वी अनेक वर्षे, त्यांनी ब्रिटीश वंशाचे मानववंशशास्त्रज्ञ व्हेरिअर अल्विन यांचे चरित्र लिहिले होते, जे भारतीय आदिवासी लोकांवरील अधिकृत तज्ञ होते. मार्च १९९९ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमधील सेव्हिंग द सिव्हिलाइज्ड शीर्षक असलेले व्हेरिअर अल्विनचे ​​चरित्र, शिष्यवृत्तीसारखे काम असूनही समीक्षकांनी प्रशंसनीय आणि चांगले विकले गेले.

या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर एक-दोन महिन्यांनी गुहा यांना नवी दिल्लीतील एका ग्रंथपालाचा फोन आला, त्यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे चरित्र लिहिण्यात रस आहे का, असा प्रश्न ग्रंथपालांनी विचारला. पंतप्रधानांवर केंद्रित पुस्तक केवळ सर्वसामान्यांच्या आवडीचे असेल असे नाही तर सर्व सरकारी कार्यालये आणि उपकार्यालये त्याच्या अनेक प्रती विकत घेतील यात शंका नाही. अनेक राज्य सरकारांसाठी त्याचे हिंदीमध्ये भाषांतर केले जाईल आणि सर्व RSS शाखा त्याच्या प्रती विकत घेतील. त्या बदल्यात बऱ्यापैकी आर्थिक फायदा होईल”, असंही त्यांनी सुचवलं होतं पण गुहा यांना हे पटत नव्हतं. कॉन्ट्रॅक्ट घेऊन एखाद्याचं चरित्र लिहणं त्यांच्या तत्वात बसत नव्हतं. खरं तर कॉन्ट्रॅक्ट देऊन कुणी राजकारण्याचे निःपक्षपाती आणि स्वतंत्र चरित्र लिहू शकत नाही असं त्यांचं मत होतं आणि ते खरंही आहे म्हणा….असो, 

शिवाय त्यांना राजकीय बड्या नेत्यांपासून ते मोठं-मोठ्या उद्योगपतींच्या आयुष्यावर आधारित चरित्र, तसेच क्रिकेटर्स इत्यादींच्या वर पुस्तकं लिहिण्यास ऑफर आलेल्या पण या सर्व कॉन्ट्रॅक्ट असणाऱ्या ऑफर त्यांनी नाकारल्या. 

पण जेंव्हा २०१३ मध्ये गौतम अदानी यांचे चरित्र लिहिण्याची ऑफर आली तेंव्हा त्या आधीच अशा ऑफर नाकारल्याचा अनुभव घेतला होता, त्यामुळे यांनाही त्यांनी अशाच काही प्रकारे सल्लागार कंपनीला उत्तर पाठवले कि, “मी गांधीजींच्या चरित्राचा दुसरा खंड लिहिण्यात व्यस्त असल्यामुळे अदानी यांच्या प्रकल्पात मी ‘मार्गदर्शक’ आणि ‘सल्लागार’ म्हणून काम करू शकत नाही”.

गंमत म्हणजे गुहा यांनी या प्रस्तावासंबंधीचे मूळ पत्र त्यांच्या काही मित्रांसोबत शेअर केले आणि लिहिले, असा प्रोजेक्ट जर मी स्वीकारला तर त्या पुस्तकाचे एकच नाव असू शकते ते म्हणजे, “अ बायोग्राफर जर्नी: फ्रॉम गांधी टू अदानी” किंव्हा मग “अदानी आफ्टर गांधी” !!!

हे हि वाच भिडू :

Webtitle : Gautam adani’s business started growing after Narendra Modi become prime minister in 2014

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.