बघतुयस काय रागानं, गाजर खाल्लय वाघानं ! 

महाराष्ट्राच्या राजकारणात कालचा दिवस ऐतिहासिक ठरला. आगामी लोकसभेसाठी भाजप आणि सेनेमार्फत युती जाहिर करण्यात आली. राजकिय पक्षांच्या युतीच असं जल्लोषपुर्ण स्वागत सोशल मिडीयावर करण्यात आलं. २०१४ च्या निकालानंतर छोटाभाऊ मोठाभाऊ म्हणत भाऊबंदकीचा वाद सुरू झाला. त्यानंतर कोथळे, कट्यार, वाघनखे यांच्यासह खिश्यात राजीनामे जपून ठेवण्यात आले. शिवसेना सत्तेत सहभागी होवून देखील विरोधी पक्षासारखा वागला. नुसता वागलाच नाही तर मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन निमित्त आत्ता हंगामी घटस्फोटाचा खेळ देखील महाराष्ट्राने बघितला.

पण अखेर समविचारी नावाने दोन्ही पक्ष एकत्र आले. अर्थात एकत्र असणारे पुन्हा एकत्र आले. तिकडे 25-23 फॉर्म्युला ठरला आणि इकडे सोशल मिडीयावर जोरदार घमासाण सुरू झालं. थेट सांगायच झालं लोक शिवसेनेला चिडवायला लागले, काही हाडाचे शिवसैनिक नाराज झाले तर काहींना राजकीय समंजस पणाच उदाहरण म्हणून या निर्णयाच स्वागत केलं. सोशल मिडीयावर वेगवेगळ्या ठिकाणी उमटलेल्या प्रतिक्रिया आपण क्रमाक्रमाने पाहूया. 

पहिल्या टप्यावर लोकांनी शिवसेनेला कस ट्रोल केलय ते पाहूया, 

Screenshot 2019 02 19 at 11.31.29 AM

Screenshot 2019 02 19 at 11.40.25 AM

या काही कमेंट, गेल्या साडेचार वर्षात राजीनामे तयार आहेत म्हणून शिवसेनेने जाहिर विरोधाची भूमिका घेतली होती. सत्तेत असून विरोध करता म्हणून शिवसेनेने मार्फत राजीनामा देण्यात येईल अस सांगितलं होतं. पण अखेर युतीचा मार्ग पुन्हा पत्करला. थोडक्यात हे राजीनाम्याच अस्त्र आज अनेकांनी शिवसेनेकडे उलटवलेलं दिसतय.

दूसऱ्या टप्यामध्ये लोकांनी “शिवसेनेला”, सेनेचा इतिहास. बाळासाहेबांची वैचारिक भूमिका याबाबत आठवण करुन दिली आहे, त्यामध्ये लोक म्हणताय, 

Screenshot 2019 02 19 at 11.38.51 AM

Screenshot 2019 02 19 at 12.05.16 PM Screenshot 2019 02 19 at 12.06.39 PM

 

आत्ता तिसऱ्या प्रकारच्या कमेंट, अशा कमेंटची, पोस्टची संख्या कमी असली तरी लोकांचा युतीच्या राजकारणावर विश्वास आहे, अशा दाखवणाऱ्या या कमेंट आहेत. 

Screenshot 2019 02 19 at 12.17.46 PM Screenshot 2019 02 19 at 12.17.29 PM

झालं. 

हे ही वाचा. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.