भारतीय सैन्यामधील टिम्मी साहेब हे सायप्रस आणि कोरिया देशातले हिरो होते.

जेव्हा कोणतीही व्यक्ती प्रामाणिकपणाने त्यांच्या क्षेत्रात कार्य करीत असते तेंव्हा त्या क्षेत्राचा इतिहासात त्यांचं नाव नेहेमीसाठीच कोरलं जातं ! असंच एक नाव कोरलं गेलं ते आपले भारतीय जनरल थिमय्या. 

“जनरल थिमय्या हे प्रत्येक पिढीमध्ये जन्माला येत नाहीत, तर त्यांच्यासारखे महान व्यक्ती क्वचितच या देशाला मिळतात”.

तर हि गोष्ट आहे थीमय्या यांची. जनरल थिमय्या यांनी १९४८ च्या काश्मीर युद्धात सामील होते त्यांना वेस्टर्न आर्मी कमांडर के एम करियप्पा यांनी त्यांना जम्मू कश्मीर प्रांताचे जीओसी म्हणून नियुक्त केलं होतं. 

सायप्रस द्वीप सेलेनियन्ससाठी मोठे आकर्षण आहे. पण एका काळात हेच द्वीप तुर्की आणि यूनान  दरम्यानचा मोठा वादाचा मुद्दा बनला होता. दीर्घकाळ चाललेल्या हत्यारबंद आंदोलनानंतर, संयुक्त राष्ट्र दक्षालदाजीचे प्रकरण, गेल्या पन्नास वर्षात म्हणजेच १९६४ पासून शांततापूर्ण वातावरण आहे.

आणि हेच शांततापूर्ण वातावरण कायम केल्याचं श्रेय जातं ते आपल्या भारतीय जनरल थिमय्या यांना.

थिमय्या यांनी भारत विभाजनाची आणि काश्मीर युद्धाच्या ऑपरेशनची कमान सांभाळली होती. खरं तर १९४७ मध्ये कारगिलच्या पहिल्या युद्धाचे खरे नायक तेच होते. त्यानंतर आदिवासींनी कारगिल आणि द्राससोबतच श्रीनगर आणि लेहला जोडणाऱ्या झोजिला खिंड ताब्यात घेतली होती. त्यांनी लेहलाही ताब्यात घेतलं असण्याची सर्व शक्यता होती.

अशा परिस्थितीत जनरल थिम्या यांनी एक धाडसी योजना आखली. त्यांनी आपल्या अभियंत्यांना झोजिला पर्यंत पर्यायी मार्ग तयार करण्यास सांगितले. हा आठ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यास तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी लागला. यानंतर जनरल थिम्या यांनी १२ हजार फूट उंचीवर टाक्या चढविल्या. हा पराक्रम यापूर्वी कधीही झाला नव्हता. हे पाहून हल्लेखोरांचा आत्मविश्वास कोसळला. आणि कारगिल आणि द्रास पुन्हा भारताच्या ताब्यात आलेआणि लेह ही वाचला. हा विजय भारतीय सैन्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कामगिरी म्हणून गणला जातो.

१९५३ मध्ये त्याला तिसरी मोठी संधी मिळाली. उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील युद्धानंतर, संयुक्त राष्ट्रांनी भारताला तटस्थ राष्ट्रांच्या सैन्यात आपले सैन्य पाठविण्यास उद्युक्त केले आणि त्या सैन्याचे नेतृत्व भारतीय कमांडर थिमय्या हे करत होते.

या कामगिरीसाठी नेहरूंची पसंद हि थिमय्या ही होती.

नेहरूंनी थिमय्या यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये तटस्थ राहण्याचा आणि कोणत्याही एका बाजूकडे झुकू नका असा सल्ला दिला. थिमय्या यांनी तेच केले. त्यांनी २२,००० कम्युनिस्ट सैनिकांना त्यांच्या घरी पोहचवण्याची मोहीम  हाताळली. संयुक्त राष्ट्रांनी आणि संपूर्ण जगाने त्यांच्या या भूमिकेचे खूप कौतुक केले आणि सरकारने त्यांना पद्मभूषणने सन्मानित केले.

तसेच त्यांच्या याच योगदानाला लक्षात ठेवून एका रस्त्याला नाव दिले आणि डाक टिकीट देखील जारी करण्यात आले आणि अलीकडेच जनरल थिमैय्या स्मारक संग्रहालय ही सुरु केले. राष्ट्रपति राम नाथ कोविंद यांच्या हस्ते थिमय्या यांच्या स्मारकाचे आणि संग्रहालयाचे उद्घाटनही करण्यात आले होते. तेंव्हा कॉंग्रेसचे एम.एल.सी वीणा अचैया यांनी जनरल थीमय्या यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न मिळावा म्हणून त्यांनी राष्ट्रपतींना निवेदन दिले होते.

थिमय्या यांना जाऊन आज बरीच वर्षे झालीत परंतु २०१८ मध्ये ते अचानक चर्चेत आले होते.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील एका जाहीर सभेत त्यांचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते कि, १९४८ मध्ये जनरल थिमय्या यांच्या नेतृत्वात भारताने काश्मीर युद्ध जिंकले, पण जवाहरलाल नेहरू आणि संरक्षणमंत्री व्ही.के मेनन यांच्याकडून थिमय्या यांचा वारंवार अपमान करण्यात आला आणि यामुळे त्यांनी राजीनामा दिला.

नरेंद्र मोदींनी केलेल्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली होती.

थोडक्यात सांगायचे तर १९४८ मध्ये मेजर जनरल थिम्या हे काश्मीरमध्ये जनरल ऑफिसर कमांडिंग होते, म्हणजे तेथील सर्वोच्च लष्करी अधिकारी. तत्कालीन संरक्षणमंत्री, कम्युनिस्ट व्ही. के. कृष्णा मेनन यांच्याशी त्यांचे वैचारिक मतभेद होते. भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी अनेक वेळा आवाज उठविला होता.

थिमय्या चीनला भारतासाठीचा सर्वात मोठा धोका मानत होते तर, मेनन यांनी देशाला पाकिस्तानपासून सावध राहण्याची गरज असल्याचे सांगत असायचे.

अनेक विषयांवर दोघांमध्ये तू-तू मै-मै व्हायची. आपल्या कटू शब्दासाठी प्रसिद्ध असलेल्या मेनन यांनी एकदा थिमय्या यांना अमेरिकन एजंट असल्याचे म्हटले. याचाच राग येऊन थिमय्या यांनी नेहरूंना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचे सांगितले.

ही बातमी सगळीकडे पसरली. विरोधकांनी मेननला दोष देत राजीनामा देण्याची मागणी केली. तर  सरकारच्या बाजूने वर्तमानपत्रात ‘मेनन जाए, थिमय्या नही’ असे हेडलाईन प्रसिद्ध होऊ लागले.  देशभरातील लोक थिमय्या यांच्या बाजूने उभे राहिले होते.

बरं मग, जवाहरलाल नेहरूंच्या हस्तक्षेपानंतर हा वाद शांत झाला. थिमय्या यांनी राजीनामा मागे घेतला परंतु पण नेहरूंनी मेननवर कोणतीही कारवाई केली नव्हती.

सैन्यामध्ये सर्वांना प्रिय असणाऱ्या जनरल थिमय्या यांना टिम्मी साहेब देखील म्हटले जात असे. ते एकमेव भारतीय जनरल आहेत ज्यांचे चरित्र परदेशी लेखकाने लिहिले आहे. 

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.