लग्नाची घटिका जवळ आली असेल तर समजून घ्या “घटिका” असते तरी कशी ?

तुझी घटका भरली आत्ता मरायला मोकळा हो !!!

मरणाऱ्याला मरण्याची भिती असते त्यामुळे घटका भरते म्हणजे नेमकं काय होते याचा विचार तो करत नाही. मारणाऱ्याला घाई असते त्यामुळे तो देखील विचार करत नाही.

तर रोजच्या बोलण्यात घटिका, घटका अशी वाक्य वापरणारे आपण कधी विचार करतो का ? हे घटका भरणं म्हणजे काय असत ते ? 

तर घटका भरते किंवा आली लग्न घटी समीप नवरा… हे आपल्या भाषेत वेळ सांगण्यासाठी नेहमीच येणारे शब्द. घटिकापात्राची वेळ निघून ती जागा घड्याळ्याने घेतली. मात्र जेव्हा हि घड्याळे आपणाकडे यायची होती तेव्हा योग्य वेळ साधण्यासाठी घटिकापात्राचा उपयोग केला जात असे. 

पाण्याने काठोकाठ भरलेल्या घंगाळ्या सारख्या एका मोठ्या भांड्यात वाटी ठेवलेली असे. या वाटीच्या बुडाशी छिद्र असे. वाटील छिद्र असल्याने त्या वाटीत हळुहळु पाणी शिरत. पाण्यानं वाटी पुर्ण भरली की ती वाटी पाण्यात बुडायची. अर्थात घटिका भरायची. याच प्रकाराला घटका भरली असे म्हणत असत. यातल्या वाटिला घटिका तर मोठ्या भांड्यात घटिका पात्र म्हणत असत. 

पुर्वाच्या काळी वेळ पाहण्यासाठी सुर्याची सावली हि सर्वात उत्तम खूण ठरलेली असे. मात्र जेव्हा लग्नकार्यासारखे मुहूर्त असत तेव्हा नेमकी वेळ साधणं महत्वाचं ठरत असे. या कारणानेच घटिकापात्र निर्माण झाली असावीत. त्यासाठी घटिकापात्र हा पर्याय पुढे आला असावा अस अभ्यासक सांगतात. 

घटिकासंबधीत काही अवशेष हडप्पा सारख्या संस्कृतीच्या खोदकामात देखील सापडल्याचे सांगण्यात येतात. अर्थववेदामध्ये देखील घटिकेचं वर्णन असल्याचं सांगण्यात येत.