राजीव गांधींवर थेट राष्ट्रपतींचा फोन टॅपिंग केल्याचे आरोप झाले होते .

वॉशिंग्टन पोस्टसह जगभरातील १६ माध्यमांनी पेगासस प्रोजेक्ट रिपोर्ट अंतर्गत या स्पायवेअरचा वापर पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि काही अधिकाऱ्यांची हेरगिरी करण्यासाठी केला जात असल्याचा दावा केला आहे. पत्रकारांवर पाळत ठेवल्याचे मुद्यावरून पेगासस स्पायवेअर चर्चेत आले आहे. या निमित्ताने हे स्पायवेअरच्या अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या.

तसेच भारतातील ४० पेक्षा अधिक पत्रकारांवर स्मार्टफोनद्वारे पाळत ठेवली जात असल्याचे देखील या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. २०१९ मध्ये पेगासस स्पायवेअर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या लोकांवर पाळत ठेवत असल्याचे समोर आले होते.

सद्याच्या याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष कॉंग्रेस, केंद्र सरकारने विरोधकांच्यावर तसेच आंदोलनकर्त्यांवर पाळत ठेवण्यासाठी हे सॉफ्टवेअर विकत आरोप करीत आहे. कॉंग्रेस आणि स्वतः राहुल गांधी जरी पेगासस प्रकरणात भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठवत असेल तरीही त्यांच्या कार्यकाळात देखील असाच काहीसं प्रकरण घडलं होतं, तोही राजीव गांधीच्या काळात !

जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते, तेव्हा त्यांच्यावरही फोन टॅपिंगचा आरोपही होता.

आणि असे म्हटले गेले की त्यांनी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंह यांचा फोन टॅप केला होता. एवढेच नाही, जेव्हा ज्ञानी झैल सिंह इंदिरा सरकारमध्ये गृहमंत्री होते, तेव्हाही त्यांचा फोन टॅप केला गेला.

साल १९८२ च होतं.

देशाच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि देशाचे गृहमंत्री होते ग्यानी झैलसिंग. इंदिरा गांधी यांनी झैलसिंग यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आणि ते निवडूनही आले. त्याच दरम्यान झेलसिंग यांनी एक वक्तव्य केलं होतं की, ” मी माझा नेत्याचा प्रत्येक आदेश मानणार आहे. इंदिरा यांनी मला झाडू मारायला सांगितलं तर ते ही मी करायला तयार आहे. आणि त्यांच्याच सांगण्यावरून मी राष्ट्रपती बनतोय”.

त्यांचे हे वक्तव्य इंदिराजीशी असणारी त्यांची निष्ठा दर्शवते. परंतु त्यांच्या या वक्तव्याची बरीच विटंबना देखील झाली होती परंतु झैलसिंग ही त्यांच्या वक्तव्यावर कायम होते.

परंतु त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात गोष्टी बदलू लागल्या.

त्याच दरम्यान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरून सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून ऑपरेशन ब्ल्यू स्टार अंतर्गत जनरैल सिंग भिंदरणवाले हा अतिरेकी मारला गेला. आणि याच मुद्द्यावरून ग्यानी झैलसिंग व इंदिरा गांधींच्या दरम्यान वादाची ठिणगी पडली, झैलसिंग यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव आणला गेला. पण त्या दबावाला झैलसिंग बळी पडले नव्हते.

त्यात भर म्हणजे त्यांनी अशा तणावग्रस्त परिस्थितीमध्ये सुवर्ण मंदिरात भेट दिली.  सुरक्षा यंत्रणेचे म्हणणे होते की अशा परिस्थितीत त्यांनी सुवर्णमंदिरात भेट देणं सुरक्षित ठरणार नाही मात्र शीख समुदायावर विश्वास दाखवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं.

जी भीती होती ती खरी ठरली.

त्यांच्यावर गोळी झाडली पण त्यातून ती सहीसलामत वाचले पण ती गोळी त्याच्या सुरक्षारक्षकांना लागली. आणि त्यांना माघारी परतावे लागले.

त्याच्याच चार महिन्यानंतर इंदिरा गांधींची हत्या झाली त्या दरम्यान राष्ट्रपती झैलसिंग उमान मध्ये होते. ते परतल्यानंतर त्यांनी राजीव गांधींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राजीव गांधी पंतप्रधान पदावर रुजू होताच त्यांनी झैलसिंग यांच्या चौकशीचे आदेश दिले त्यात त्यांच्या फोन टॅप करण्याचा देखील आदेश होता.

त्यांना संशय होता कि, झैलसिंग हे खलिस्तानी नेत्यांच्या संपर्कात आहेत.

याबद्दलचा उल्लेख पी.एन हून यांनी त्यांच्या ‘द अनटोल्ड ट्रुथ’ मध्ये केला आहे. इंटेलिजन्स ऑफिसर मलय कृष्ण धर यांनी त्यांच्या ‘ओपन सीक्रेट्स’ या पुस्तकात देखील त्याचा दावा केला आहे, कि राजीव गांधींनी फोन टॅप करण्याचा आदेश दिला होता. झैलसिंग यांना त्यांचा फोन टॅप होतोय याचा अंदाज होता. त्यामुळे ते आपल्या पाहुण्यांना व मित्रमंडळींना राष्ट्रपती निवासस्थानाच्या गार्डनमध्ये भेटायचे.

झैलसिंग यांनी या बाबतीत म्हटले होते की,

“राजीव यांना जाणून घ्यायचे होते की, त्यांच्या राजकीय विरोधकांच्या सोबत माझी काय चर्चा होत असते. पंतप्रधान राजीव गांधी व झेलसिंग यांच्यात वाद होण्याचे सर्वात मोठे कारण होते ते शिखविरोधी दंगली. त्यांनी अनेकदा राष्ट्रपती झैलसिंग यांना पदावरून हटवण्याची प्रयत्न केले होते पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना असं न करण्याचा सल्ला दिला आणि झाल सिंग यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.