गर्लफ्रेंडने फोटो फिल्टर्सची आयडिया सांगितली आणि इन्स्टाग्रामचा शोध लागला…..
इंस्टाग्राम हे सगळ्यात जास्त वापरलं जाणारं ऍप आहे, सोशल मीडिया धारकांना इंस्टाग्राम चांगलंच माहिती आहे. रिल्स, फोटो, स्टोरी या सगळ्या प्रकाराने इंस्टाग्राम दिवसेंदिवस जास्तच लोकप्रिय होऊ लागलं आहे. फोटो फिल्टर लावून काळ्याचं गोरं होणे गोऱ्याचं काळं होणे हे सगळं इंस्टाग्राममुळे शक्य झालं आहे.
म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवर वापरले जाणारे फिल्टर बघा कुत्रा, मांजर यांच्या चेहऱ्यापासून ते हजारो रंगात आपले फोटो निघू शकतात इतका मोठा पराक्रम इंस्टाग्राम आणि त्याच्यावरच्या फोटो फिल्टर्सचा आहे. या फोटो फिल्टर्सच्या नादात शोध लागला होता इंस्टाग्रामचा. त्या शोधाचं कारण सुद्धा शोध लावणाऱ्याची गर्लफ्रेंड होती. नक्की काय विषय झाला होता ते माहिती करून घेऊ.
केविन सिस्ट्रॉम या भिडूने इंस्टाग्रामचा शोध लावला
घरची परिस्थिती चांगली होती, आई वडील दोघेही मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीला होते. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत असताना केवीनचं अभ्यासात जास्त लक्ष लागत नसायचं. सगळं निराशाजनक चाललंय असं त्याला वाटत राहायचं. पण त्याला गेम आणि मित्रांच्या मेसेंजर अकाउंटला हॅक करणे याचा नाद लागला.
कॉलेजला असताना केवीनने कॉम्प्युटर सायन्सची निवड केली. मॅनेजमेंट साईड आणि इंजनिअरिंग प्रोग्रॅमची त्याला गोडी लागली. कारण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करताना त्याला वाटायचं कि इतर क्षेत्रांपेक्षा इथे जास्त नॉलेज आहे. त्याला पुढे स्टार्टअपची माहिती कळली.
२००६ मध्ये केविनने आपली डिग्री पूर्ण केली आणि गुगल मध्ये जाऊन तो इतर शिक्षण घेऊ लागला. तिथे गुगल कॅलेंडर, डॉक्युमेंट, जीमेल अशा ऍपवर त्याने काम करणं सुरु केलं. त्याला स्वतःच असं काहीतरी करायचं होत कि ज्यावर उत्तम फोटो पोस्ट करता येतील आणि लोकांना ते बघायला आवडेल. पण त्यात बऱ्याच अडचणी येत होत्या.
शेवटी २००९ मध्ये केविनने nextstop.com या स्टार्टअप प्रोजेक्टचा मॅनेजर म्हणून काम सुरु केलं. इथं त्याच्या लक्षात आलं कि फोटोग्राफी आणि फोटो यांना चांगल्या प्रकारे लोकांसमोर कसं आणता येईल यावर काम करायला हवं. foursquare आणि flicr या दोन ऍपच्या माध्यमातून एक ऍप त्याने बनवलं. त्यावर फोटो पोस्ट करता यायचे तेही लोकेशन सहित. त्याला burbn म्हणून नाव देण्यात आलं.
हि ऍप तयार होताच त्याने ती २०१० मध्ये बेसलाईन व्हेंचर्स आणि अँड्रेसन होरोविट्झला एका पार्टीमध्ये प्रस्तुत केलं. हि ऍप त्यांना आवडली आणि केवीनने त्याची मूळ नोकरी सोडली. पण नोकरी जरी सोडली असली तरी त्याने बनवलेल्या ऍपमधून त्याला ५ लाख डॉलरचा फंडिंग सेल मिळाला.
पण आता केवीनची जबाबदारी वाढल्याने त्याने co-founder शोधायचं ठरवलं. माईक क्रिगर या सहकाऱ्याला त्याने सोबत घेतलं. माईक क्रिगरने सुद्धा अशीच एक ऍप बनवली होती ज्यावरून टेक्स्ट करता येईल पण त्याकडे कुणाचही लक्ष नव्हतं. फोटो शेअरिंगच्या ऑप्शनसहित BURBNला अजून सपोर्ट मिळाला.
दोघांनी मिळून तेव्हा फक्त फोटो शेअरिंगवर फोकस केलं.
केवीनच्या गर्लफ्रेंडने एकदा समुद्रावर चालत असताना केवीनला सांगितलं कि, मी तू बनवलेली ऍप मी कधीच वापरणार नाही कारण त्यात फोटो काढता येत नाही आणि विविध फिल्टर्ससुद्धा नाही. फिल्टर्समुळे फोटो अधिक चांगले दिसू लागतील.
केवीनला हि आयडिया आवडली, त्याने मग ऍपचं स्वरूपच बदलून टाकलं आणि नव्याने लॉन्च झालेल्या आयफोन ४ मध्ये त्या ऍपची सेटिंग केली कारण आयफोनच्या कॅमेऱ्यात दर्जा फोटो येत असे. त्यात फिल्टर्स ऍड केल्याने अजूनच इंटरेस्टिंग गोष्टी झाल्या.
केविन आणि माइकने ८ आठवड्यात त्यांच्या ऍपचं स्वरूप पूर्णपणे बदललं. इन्स्टंट आणि टेलिग्राम या दोघांना एकत्र करून तयार झालं इंस्टाग्राम. विना पर्सनल माहिती देता लोकांना फोटो पोस्ट करता येऊ लागल्याने हि ऍप बऱ्याच लोकांनी इन्स्टॉल केली.
इकडे झुकेरबर्गला अंदाज लागला कि लोकं फेसबुकवर फोटो पोस्ट करणं बंद झाले असून ते इंस्टावर फोटो सोडत आहेत.
पुढे केविन सोबत झुकेरबर्गने पार्टनरशिप केली आणि इंस्टाग्राम फेसबुकमध्ये विलीन करण्यात आलं. तरीही फेसबुकला आजही इंस्टाग्राम भारीच पडतं.
हे हि वाच भिडू :
- तुम्ही इंस्टाग्रामवर चेष्टा करताय पण खली खरंच दगडं फोडून महाबली झालाय..
- पैसे न घालवता इंस्टाग्राम अकाउंटवरचे फॉलोअर्स कसे वाढवायचे ते वाचा.
- ऑस्ट्रेलियातून थेट शेतकरी आंदोलनात उतरलेली मुस जट्टाना
- फेसबुक कर्मचाऱ्यांच्या चॅटचा विषय बाहेर आले आणि देशोदेशीच्या सरकारांना घाम फुटलाय…