IMF च्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ आपलं पद का सोडत आहेत ?
अतिशय कमी वयात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ या पदापर्यंत पोहोचलेल्या भारतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ या पायउतार होणार आहेत. इतक्या मोठ्या पदावर पोहचल्यावर पायउतार होण्याचा निर्णय गीता गोपीनाथ यांनी का घेतला असावा तर त्याचे कारण देखील तितकेच समाधानकारक आहेत.
त्यांनी प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठात परतण्याचा प्लॅन आखला आहे. गीता गोपीनाथ या जानेवारीमध्ये हार्वर्ड विद्यापीठात रुजू होणार आहेत. IMF ने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.
गीता गोपीनाथ २०१८ मध्ये त्या संस्थेत सामील झाल्या होत्या . या गेल्या २०१९ च्या जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य आर्थिक सल्लागाराची जबाबदारी सांभाळत आहेत. गोपीनाथ आयएमएफच्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ज्ञ ठरल्या आहेत.
पण आता या पदावरून त्या पायउतार होत असल्यामुळे आता IMF च्या मॅनेजिंग डायरेक्टर क्रिस्टलिना त्यांच्या जागेवर उत्तराधिकारी शोधण्याच्या मोहिमेवर लागल्या आहेत. क्रिस्टलिना यांनी जाहीर केले आहे कि, लवकरच या निवड प्रक्रियेची सुरुवात होणार आहे. त्या असंही म्हणाल्या कि, गीता गोपीनाथ यांची कामगिरी इतकी चांगली होती की त्या या पदाच्या प्रमुख दावेदार होत्या. त्या जगातील सर्वोकृष्ठ अर्थतज्ज्ञांपैकी एक असल्याची प्रतिक्रिया देखील क्रिस्टीन यांनी दिली आहे.
पण आता त्या हार्वर्ड कडे परत जाणार आहेत कारण त्यांना आता पुन्हा रिसर्च मध्ये उतरायचं आहे.
गीता या आयएमएफमध्ये जॉईन होण्यापूर्वी हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक होत्या. आयएमएफमध्ये काम करण्यासाठी त्यांनी विद्यापीठाकडून काही महिन्यांच्या काळाची सुट्टी मागवून घेतली होती. त्यामुळे आता कार्यकाळ पूर्ण करून त्या आता परतणार आहेत.
कोण आहेत आहेत गीता गोपीनाथ ?
गीता गोपीनाथ या मुळच्या कर्नाटकातील म्हैसूरच्या आहेत. म्हणजे त्यांचा जन्म कर्नाटकातीला आहे. गीता यांनी बी.एस. चं शिक्षण घेऊन त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांच्या कुटुंबातील जवळपास सदस्य हे प्रत्येक क्षेत्रात नाव कमावलेले आहेत.
असं म्हणलं जातं कि, गीता यांचे आजोबा गोविंद नांबियार हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या खूप जवळचे होते. तसेच त्यांनी आजी देखील कम्युनिस्ट पक्षाचे नेते ए.के गोपालन यांची नातेवाईक होती. तर गीता यांचे पती इकबाल धालीवाल हे देखील इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट आहेत. इतकंच नाही तर ते १९९५ च्या बॅचचे IAS टॉपरही आहेत. परंतु त्यानंतर त्यांनी IAS पदाचा राजीनामा दिला आणि प्रिन्सटन येथे शिक्षण घ्यायला सुरूवात केली.
पण त्या IMF मध्ये कशा पोहोचल्या?
गोपीनाथ यांनी दिल्ली विद्यापीठातून बी.ए आणि त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि त्यानंतर त्या वॉशिंग्टन विद्यापीठात एमए करण्यासाठी सिलेक्ट झाल्या. एमए नंतर त्यांनी २००१ मध्ये प्रिन्सटन विद्यापीठातून इकॉनॉमिक्स मध्ये पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी शिकागो विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकाची नोकरी पकडली. तसेच त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात इंटरनॅशनल स्टडिज अँड इकॉनॉमिक्सच्या जॉन जवांन्स्ट्रा प्राध्यापक राहिल्या आहेत.
त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय वित्त आणि मॅक्रोइकॉनॉमिक्सवर आधारित आहे.
गीता यांनी या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ पदावर कार्यरत असतांनाच विनिमय दर, व्यापार आणि गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटे, चलनविषयक धोरण आणि उदयोन्मुख बाजारावर येणाऱ्या संकटांवर आधारित असलेले ४० रिसर्च आर्टिकल त्यांनी पब्लिश केले आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या या पदावर यायच्या आधी गीता नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चमध्ये इंटरनॅशनल फायनॅन्स आणि मॅक्रोइकॉनॉमिक्स प्रोग्रामच्या सह-संचालक देखील होत्या. गोपीनाथ या अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यूच्या सह-संपादक, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सच्या विद्यमान हँडबुकच्या सह-संपादक आणि आर्थिक अभ्यासाच्या पुनरावलोकनाच्या संपादिका देखील राहिल्या आहेत. २०१८ मध्ये त्यांची अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या फेलो म्हणून निवड करण्यात आली. २०१७ मध्ये त्यांना वॉशिंग्टन विद्यापीठाचा विशिष्ट माजी विद्यार्थी पुरस्कार मिळाला.
त्यानंतर त्यांनी भारताच्या अर्थ मंत्रालयासाठी देखील महत्वाचे काम केले आहे.
त्यांनी भारताच्या अर्थ मंत्रालयासाठी जी -२० प्रकरणांच्या सल्लागार म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. काम केलं आहे. २०१४ मध्ये, आयएमएफने त्यांना टॉप २५ अर्थतज्ज्ञांपैकी एक अर्थतज्ज्ञ म्हणून घोषित केले आणि २०११ मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने यंग ग्लोबल लीडर म्हणून त्यांची निवड केली.
गीता गोपीनाथ यांनी IMF मध्ये असतांना अनेक मोठ-मोठे उपक्रम पार पाडले. त्यांनी महासाथीवरील विषयावर लेखन केले आहे. या लेखनात त्यांनी कोरोना महामारीमध्ये व्यवस्थापन कारणे आणि जागतिक स्तरावर कोरोना लसीकरणाची मोहीम कशी राबवावी याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे.
तसेच गीता यांनी कोविड साथ रोखण्यासाठी $५० अब्ज डॉलर्सचा लसीकरण कार्यक्रम प्रस्तावित केला होता. २०२१ च्या शेवट पर्यंत प्रत्येक देशाच्या किमान ४० टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्याचा प्रस्ताव होता, ज्यासाठी गीता यांचे खूप कौतुक झाले.
हे हि वाच भिडू :
- आरोग्यमंत्री म्हणतायत, लसीचा एकच डोस पुरेसा! पण डॉक्टरांचं म्हणणं मात्र वेगळंय.
- तुम्ही २३ व्या वर्षी काय करत होतात?
- स्लॉट बुकींगचं सुद्धा टेन्शन घेऊ नका. पुण्यात तरुणाने मोफत लसीकरणासाठी मदतकेंद्र उभारलंय .