या एका बाईने रोममध्ये ६०० पुरुषांचा जीव घेतला होता….

आजवर आपण अनेक सिरीयल किलर ऐकले किंवा पाहिले असेल, अनेक लोक अशा सिरीयल किलर लोकांच्या हातून बळी गेले. सिरीयल किलिंग हे प्रकरण आताच नाहीच. इतिहासात याबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात पण आजचा किस्सा आहे एका सिरीयल किलर लेडीचा जिने रोममध्ये आपल्या उद्देशाच्या बळातून अनेक लोकांचा बळी गेला होता.

१७ व्या शतकात रोम सिसिली आणि नेपल्समध्ये एक विषारी अंडरवर्ल्ड तयार झालेलं होतं. या विषारी अंडरवर्ल्डची प्रमुख होती ज्युलिया टॉफाना. इटलीच्या ज्युलिया टॉफाना या स्त्रीने इतिहासात सगळ्यात मोठी सिरीयल किलर होण्याचा पराक्रम केला होता.तिने तयार केलेल्या आणि विकलेल्या विषामधून तिने तब्बल ६०० लोकांचा जीव घेतला होता. 

लोकांचा जीव घेण्यासाठी तिने ना कुठला चाकू, बंदूक, तलवार वैगरे असं काही वापरलं नाही. मेकअपच्या बॉटलमध्ये तिने तयार केलेलं विष भरलं आणि ते विकायला सुरवात केली होती.

ज्युलिया टॉफानाने ऍक्वा टॉफाना नावाचं विष तयार केलं होतं. या विषाचे दोन तीन थेंबच समोरच्या व्यक्तीचा जीव घ्यायला पुरेसे होते.

हे विष ज्युलिया टॉफानाने मेकअपच्या साहित्यात ऍड केलेलं होतं. या विषात अर्सेनिक, लेड, विनील्स अशा अनेक विषारी गोष्टी होत्या. सेंट निकोलसच्या बाटलीत हे विष भरलं जात असे आणि विक्री केलं जात असे. त्या काळात रोममध्ये पुरुष लोकं महिलांवर अत्याचार करत असे. बायकांच्या होणाऱ्या हाल ज्युलिया टॉफानाला सहन होत नव्हत्या. यात तीच हे विष प्रकरण महिलांना मदत करण्यासाठी होतं असही मानण्यात येतं.

हे विष महिला जेवणातून किंवा पेयामधून त्यांच्या पतीला देत असे यामुळे ज्युलिया टॉफानावर कुणालाही संशय घेता आला नव्हता. कारण ती विक्री करून लगेच गायब व्हायची. रोममध्ये ज्युलिया टॉफानाने माणसं मारायचं सत्र आरंभिलं होतं. तिची अनेक महिलांशी मैत्री झालेली होती आणि हे जाळं वाढत चाललं होतं. या कामी ज्युलिया टॉफानाला तिची मुलगीसुद्धा मदत करू लागली होती. 

हे कारस्थान तब्बल २५ वर्षे चालू होतं. हे इतकं गुप्तपणे सुरु होतं कि कुणालाही याचा पत्ता लागला नव्हता. या पंचवीस वर्षात ज्युलिया टॉफाना, तिची मुलगी आणि अजून तीन कर्मचारी लोकांनी जवळपास ६०० पुरुषांचा बळी घेतला होता. पण याचा उलगडा एकदम नाट्यमय पद्धतीने झाला आणि ज्युलिया टॉफानापकडली गेली.

एका ग्राहकाला ज्युलिया टॉफानाने विष विकलं होतं. त्या महिलेचा पती ज्यावेळी जेवायला बसला तेव्हा त्या महिलेने दोन तीन थेंब जेवणात टाकले मात्र तिने पतीला आग्रह केला नाही आणि जेवण करू नका म्हणून सांगितले. त्या पतीने तिला सगळं खरं सांगायला लावलं आणि तिथून पुढे ज्युलिया टॉफानाला पकडण्याची कारवाई सुरु झाली. पण ज्युलिया गायब झाली होती.

सगळ्यात आधी ज्युलिया टॉफानाची मुलगी आणि कर्मचारी तावडीत सापडले. त्या सगळ्यांना मारून टाकण्यात आले. या सगळ्यांपासून ज्युलिया टॉफाना रोममधल्या एका चर्चमध्ये आश्रयाला आली. तिथं तिला आश्रय देण्यात आला. पण ती राहायला आल्यापासून रोममध्ये अफवा उठू लागल्या कि ज्युलिया टॉफानाने चर्चच्या पाण्याच्या हौदात विष टाकलं आहे. लोकांनी ज्युलिया टॉफानावर हल्ला चढवला आणि तिला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले.

या अधिकाऱ्याने ज्युलिया टॉफानाला भरपूर टॉर्चर केलं आणि शेवटी ज्युलिया टॉफानाने गुन्हा कबुल केला. तिने जवळपास ६०० पुरुषांना मारलं होतं. ज्युलिया टॉफानाची पुढे निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे सगळ्या रोमने सुटकेचा निश्वास टाकला. पण सिरीयल किलर लेडी म्हणून ज्युलिया टॉफानाचं नाव इतिहासात कायमच कोरलं गेलं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.