पोरींच्या कपड्यांना खिसा का नसतो ? प्रश्न सोप्पाय पण उत्तर डिपाय.. 

वाह् काय विषय आहे. कधीच विचार केला नाही. नसतो तर नसतो. त्यानं काय फरक पडणाराय. पण पडतो कधी कधी आपण दिलेली चिट्टी ठेवायला पोरींच्याकडे खिसा नसेल तर आपल्याला फरक पडतो. प्रेमानं दिलेली कॅटबरी ठेवायला जागा नसेल तर फरक पडतो.

पोरींना देखील खिसा नसल्यानं खूप फरक पडतो. पण व.पु. काळे म्हणून गेले आहेत आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. त्याचसुरात हे लिहणारा अर्थात मी पुरूष असल्यानं मुलींच्या समस्या दत्तक घेवू शकत नाही. त्यांना नेमका खिसा कशाकशाला लागतो ते मला सांगता येणार नाही पण खिसा हवा इतकी सामान्य इच्छा माझी देखील आहे. अलीकडच्या जीन्स सोडल्या आणि एखादा कुर्ता सोडला तर मुलींच्या कोणत्याच कपड्यांनी खिसे देण्याचं कष्ट या मॉडर्न कंपन्या का करत नाहीत याचा विचार करायला हवां.

याच विचाराने प्रेरित होवून आम्ही शोधून काढलं की पोरींच्या कपड्यांना खिसा का नसतो ते ?

तर इंग्रजांच्या अनेक देणग्यांपैकी हि एक देणगी आहे अस म्हणता येईल. म्हणजे आपल्याकडे चोळीत नोटांचे बंडल ठेवायची फॅशन होतीच त्यामुळे विशेष असा खिसा करण्याची गरज नव्हती. आपल्या कपड्यांचा विकास देखील नेहरू आणि मोदींच्या कालखंडाअगोदर झाला हे मान्य करावं लागेल. तर या काळात जे महिलांचे कपडे आपल्याकडे येत असत त्यात खिसे नसतं. जगभरात जे कपडे पोहचत असत त्यातही खिसे नसत. आणि याचं कारण व्हिक्टोरिया राणीच्या काळखंडात मिळतं.

हे ही वाचा – 

व्हिक्टोरिया राणीचा कालखंड (१८३७ ते १९०३)

व्हिक्टोरिया राणीच्या कालखंडात ब्रिटनमध्ये फॅशनचा काळ चालू झाला होता. दूरवर असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनी सेटल होतं होती. पोरं सेटल होत आहेत म्हणल्यानंतर ब्रिटनमधल्या लोकांपण सेटल होवून वेगवेगळा विचार करु लागली. याच काळात अशी मान्यता निर्माण झाली होती की, खिसा हे पुरूषीपणाच लक्षण आहे. काय ? होय कपड्यांना असणारे खिसे हे पुरषीपणाचं लक्षण आहे. काहीही श्री नाही. खरच पुरूष कशालाही आपलं प्रतिक समजू शकतात त्यामुळे हि मान्यता जगमान्य होण्यास सोप्प गेलं असाव.

याच काळात फॅशन डिझायनरांच्या मते, पुरषांचे वस्त्र जास्तित जास्त कम्फर्टेबल आणि महिलांचे कपडे जास्तीत जास्त चांगले दिसण्याकडे प्रत्येक डिझायनरच आजही प्राधान्य असतं. त्यातूनच महिलांच्या कपड्यांना खिसे ठेवून ते विद्रूप करण्यात कोणताच अर्थ नसतो. मात्र पुरूष त्यांचा कम्फर्टेबलपणा बघतात त्यामुळे हि प्रथा परंपरा झाली व तोट ट्रेण्ड आजही चालू आहे.

बोनस –

बोनस असा की आपल्या कपड्यांना खिसे असावेत म्हणून युरोपीयन देशांमध्ये गिव्ह अस पॉकेट नावाच अभियान महिलांमार्फत चालवण्यात आलं. ते यशस्वी झालं का पोरींचे कपडे पाहूनच ठरवू शकता. स्रीवादी महिलांनी यासाठी जोर धऱला पण ते शक्य झालं नाही.

शेवटी प्रभू देवा म्हणूनच गेले आहेत,

भलाई कभीं औरंतो की क्रांन्तीके बिना नहीं होंगी..  उर्वशी उर्वशी टेक ईट इझी उर्वशी… 

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.