फाळणीमुळे देशोधडीला लागलेल्या रेफ्यूजीने आईस्क्रीमचा कोट्यवधींचा ब्रँड तयार केला..

आईस्क्रीम आवडत नाही अशी माणसं शोधून सापडणार नाहीत. जेवणानंतर म्हणा किंवा आनंदाच्या प्रसंगी म्हणा आईस्क्रीम खाल्ली जाते पण दिल्लीमध्ये असणारी ज्ञानी आईस्क्रीम लोकांची फेव्हरेट झालीय. लोकांचं म्हणणं आहे कि ज्ञानी आईस्क्रीम हि फक्त आईस्क्रीम नाही तर इमोशन असल्याचं लोक सांगतात. १०० पेक्षा जास्त आउटलेट्स असलेल्या ज्ञानी आईस्क्रीमची करोडोंमध्ये उलाढाल आहे.

या आईस्क्रीमचा इतिहास हा फाळणीशी जोडला गेलेला आहे. तर जाणून घेऊया देशभर आणि जगभर फेमस असलेल्या ज्ञानी आईस्क्रीमची यशोगाथा. ज्ञानी आईस्क्रीमची सुरवात एका रिफ्युजीने केली होती. त्यांचं नाव होतं ज्ञानी गुरुचरण सिंह. फाळणीच्या अगोदर ज्ञानी गुरुचरण यांचं पाकिस्तानमध्ये एक प्रसिद्ध मिठाईचं दुकान होतं. ज्यावेळी फाळणी झाली तेव्हा ते दिल्लीत आले आणि रिफ्युजी कॅम्पमध्ये त्यांनी काही काळ आसरा घेतला. त्यानंतर ते फतेहपूरी चांदणी चौकात राहायला आले. 

१९५१ साली त्यांनी काही पैशांची जोडणी केली आणि रबडी फालुदा, मँगो शेक, पाईनॅप्प्ल शेकचं दुकान सुरु केलं. लोकांचा ओढा त्यांच्या दुकानाकडे वाढला. त्यानंतर त्यांनी हळूहळू आपला व्यवसाय वाढवायला सुरवात केली. ज्ञानी गुरुचरण सिंह यांनी १९५६ मध्ये आपलं दुकान चांगल्या प्रकारे सुरु केलं. स्वतःच्या हाताने ते मिठाई, रबडी फालुदा बनवत असत आणि त्यांच्या हाताला चवही चांगली होती त्यामुळे दुरून दुरून लोक त्यांच्या दुकानात येत असे.

ज्ञानी यांच्या दुकानातले पदार्थ हे सामान्य लोकांना परवडणारे होते आणि फक्त सामान्य लोकच नाही तर अगदी राज कपूर आणि मोहम्मद रफी सुद्धा गुरुचरण सिंह यांच्या हातची मिठाई खायला त्यांच्या दुकानात यायचे.

१९७० मध्ये ज्ञानी गुरुचरण सिंह यांच्या मुलाने गुरबचनने त्यांचा व्यवसाय जॉईन केला. यानंतर त्यांनी एक जुनाट फ्रिजर आणला आणि हातानेच ते आईस्क्रीम बनवू लागले. आइस्क्रीमला जबरदस्त टेस्ट होती त्यामुळे त्यांनी अजून काही मशीन विकत घेतल्या आणि आईस्क्रीमचा व्यवसाय वाढवला.

९० च्या दशकात ज्ञानी कुटुंबातल्या अनेकांनी त्यांचा व्यवसाय वाढवायला मदत केली त्यात होते तरणजित सिंग. त्यांनी विचार केला कि आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात करायला हवा कारण लोकांची क्रेझ तितकीच टिकून आहे. याच विचारातून त्यांनी दिल्लीच्या राजौरी गार्डनमध्ये ज्ञानी आईस्क्रीमची पहिली शाखा सुरु केली. मध्यमवर्गीय लोकंचाहा एरिया असल्याने इथल्या लोकांनी ज्ञानी आइस्क्रीमला चांगलंच नावाजलं आणि इथेही भरपूर विक्री होऊ लागली.

आता आईस्क्रीमच्या किती कंपन्या आहेत, साहजिकच त्यामुळे ज्ञानी आइस्क्रीमला स्पर्धा तर होतीच. निरुला आईस्क्रीमसोबत त्यांची बराच काळ घसट सुरु होती. पण ज्ञानी आईस्क्रीममध्ये नवनवीन प्रयोग आणि चव यांचं मिश्रण टिकून राहिलं त्यामुळे लोकांमध्ये ज्ञानी आईस्क्रीमचा दर्जा वाढतच राहिला. हळूहळू फक्त दिल्लीतच नाही तर भारतभर त्यांनी आउटलेट्स सुरु केले. 

आज घडीला ज्ञानी आईस्क्रीमची देशभरात १०० हुन अधिक आउटलेट्स आहेत. यात हॉट चॉकोलेट फ्युज, बेल्जीयन चॉकलेट, ब्लॅक फॉरेस्ट, कुल्फी आणि केकसुद्धा सामील आहे.  पारंपरिक ग्राहक असलेले लोकं ज्ञानी आईस्क्रीमच्या दुकानात रबडी फालुदा आणि गाजराचा हलवा खायला येतात. दरवर्षी करोडोचा टर्नओव्हर ज्ञानी आईस्क्रीमचा आहे.

पार्टी, सेलिब्रेशन, लग्न वैग्रे सगळ्याच ठिकाणी दिल्लीमध्ये आणि भारताच्या बहुतांशी ठिकाणी ज्ञानी आईस्क्रीमचा जलवा आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.