जगभरातल्या २१ फिल्म फेस्टिवलमधले सिनेमे युट्यूबवर बघ येणार आहेत

कोव्हीड 19च्या तडाख्यात सगळ्यांचा बाजार उठला. एक दिवस दोन दिवस करता करता लॉकडाऊनचे घरात बसायचे दोन महिने पूर्ण झाले. केक बनवणे आणि भांडी घासण्याचे व्हिडीओ टाकण्याचा देखील कंटाळा आला.

इतके दिवस स्वप्न पाहिलेलं की सुट्टी पडली तर भरपूर पिक्चर बघणार. विशेषतः वर्ल्डक्लास सिनेमे. मित्रांबरोबरच्या गप्पांमध्ये फिल्म फेस्टिव्हल मध्ये बघितलेल्या जबरा सिनेमांची यादी सांगितली जाते पण आपण वेळ नसल्यामुळे गप्प ऐकत राहतो.

पण आता कोरोनामुळे वेळ मिळालाय आणि रोज प्रश्न पडतो की आज कुठला सिनेमा बघायचा.

अंबानी साहेबानी जिओ दिलंय पण त्याचा उपयोग म्हणावा तसा होत नाही.

कारण नेटफ्लिक्स अँड चिल प्रत्येकालाच परवडत अस नाही.

अमेझॉन प्राईम, हॉटस्टार सगळी कडे भरमसाठ पैसे मागतात. युट्युब वर तर नुसता व्हिडिओच्या कचरा पडलेला असतो.त्यात काय बघावं ते कळत नाही.

शेवटी डोकं आउट झाल्यावर आपण क्राईम पेट्रोलचा एखादा एपिसोड किंवा तेलगू डबिंग सिनेमा लावतो आणि शांत होऊन झोपून जातो.

पण आता दहा दिवस तरी टेन्शन नाही कारण आज पासून जगभरातल्या उत्तम सिनेमांच एक ग्लोबल फिल्मफेस्टिव्हल युट्युबवर भरणार आहे. त्याच नाव आहे,

“We Are One”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जागतिक दर्जाचे कलावंत एकत्र येऊन हा ऑनलाइन फेस्टिव्हल भरवत आहेत. यात बर्लिन फिल्म फेस्टिव्हल पासून ते कान, लंडन, न्यूयॉर्क, टोरोंटो, टोकियो, व्हेनिस अशा 21 फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवलेले जबरदस्त सिनेमे दाखवले जाणार आहेत.

यात फिचर फिल्म्स आहेत, शॉर्ट फिल्म्स आहेत, ऍनिमेशन सिनेमे आहेत, डॉक्युमेंटरी आहे, सिनेमावर मारलेल्या तज्ञांच्या गप्पा आहेत. जॅकी चॅनच्या मारधाडी पासून ते अवॉर्ड विनिंग आशयघन सिनेमापर्यंत सगळं काही एका क्लिकवर अव्हेलेबल आहे.

https://www.youtube.com/channel/UCh

वर दिलेली लिंक युट्युबची आहे.

तुम्हाला आवडतो तो जॉनर सिलेक्ट करायचं आणि या सगळ्याचा आस्वाद घ्यायचा. आणि यासाठी नेहमी फेस्टिव्हल मध्ये थिएटर मध्ये जागा पकडण्यासाठी धावपळ करतो त्याचीही गरज नाही.

यात मुंबईच्या मामी फेस्टिव्हलचा देखील समावेश असल्यामुळे भारतीय दिगदर्शकांचे सिनेमे देखील असणार आहेत.

ज्यात विद्या बालनची नटखट नावाची शॉर्ट फिल्म ही याच प्लॅटफॉर्मवर 2 जून रोजी रिलीज होणार आहे.

याशिवाय अतुल मोंगियाचा अवेक, प्रतीक वत्सची इब आले ओ, अरुण कार्तिकची नासिर या इतर कुठेही पाहायला न मिळणाऱ्या नितांत सुंदर फिल्म पाहायची संधी मिळणार आहे.

विशेष म्हणजे या जागतिक दर्जाच्या सिनेमांसाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही.

याचा अर्थ तुम्हाला पैसे द्यायचे असतील तरी ते घेणार आहेत आणि तो पैसे कोरोना महामारीच्या उपाय योजनांसाठी दान दिला जाणार आहे.

२९ मे पासून सुरू होणारा हा ग्लोबल फेस्टिव्हल 7 जून पर्यंत चालणार आहे. काही सिनेमे युट्युबवर स्ट्रीमिंग केले जातील तर काही सिनेमे काही काळ युट्युबवर अव्हेलेबल असतील. कधी कोणता सिनेमा पाहायचा हे ठरवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून शेड्युल पाहू शकता.

http://www.weareoneglobalfestival.com

https://www.youtube.com/channel/UChMc3c7Xvv6ol1Zv47Ja39A

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.