युद्धाने जगातील सगळं धान्य नष्ट झालं तरी लोड नाय, वैज्ञानिकांनी याचा जुगाड आधीच करून ठेवलाय

भारत. ज्याला आपण कृषिप्रधान देश असं म्हणतो. कृषीवर आधारित आपली अर्थव्यवस्था आहे म्हणून. ज्याप्रकारे वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, वंशाचे लोक इथे एकत्र राहतात त्याचप्रकारे प्रत्येकाचं खानपानही वेगळं आहे आणि हेच वेगळेपण प्रत्येकानं जपलेलं आहे.

भारताप्रमाणे जगातही प्रत्येक देशाचं खानपान वेगळं आहे आणि प्रत्येक देश त्यासाठी स्वतःच्या शेतीपद्धतीचा वापर करत असतो. आपली खाद्यसंस्कृती जपून राहावी म्हणून प्रत्येक देशाचा कृषी विभाग प्रयत्न करत असतो. 

आता जर आपली खाद्य संस्कृती जपून ठेवायची आहे तर त्यासाठी ते धान्य ज्यापासून उगवतं त्या बियांचं संरक्षण करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. कारण त्याच बियांपासून नवीन पिक जन्माला येणार असतं. पण कधी विचार केलाय का, जर असं झालं की भूकंप, सुनामी, वादळ किंवा तिसरे महायुद्ध अशा गोष्टी घडल्या ज्याने नव्याने पीक घेण्यासाठी बिया उरल्याच नाही, तर काय होईल? बिनविरोध एकच उत्तर राहील ते म्हणजे भुकेने सगळं जग मरण पावेल.

मग याच गोष्टीचा विचार करून सगळ्या देशाच्या सरकारांनी मिळून एक निर्णय घेतला – जागतिक बीज संवर्धन केंद्र उभारण्याचा. जागतिक व्यापार संघटना, जागतिक आरोग्य संघटना, नाटो जशा आहेत तशीच ही संस्था आहे. जर कधी अशा नैसर्गिक संकटांनी भुकेनं मरण्याची वेळ आली तर त्यावेळी या बीज संवर्धन केंद्रातील बियांचा उपयोग जगाला धान्य मिळण्यासाठी होऊ शकतो. 

कुठे आहे मग हे जागतिक बीज संवर्धन केंद्र? 

आर्क्टिक सर्कलजवळ नॉर्वे आणि नॉर्थ पोलच्या दरम्यान स्वालबर्ड नावाच्या आर्किपेल्गोवर हे बियांचं मोठं गोदाम आहे. याला ‘ग्लोबल सीड वॉल्ट’ असं म्हटलं जातं. हे काही साधारण बियांचं गोदाम नाहीये तर खूप मोठ्या सुरक्षा कवचमध्ये बियांना ठेवेल  जातं. या ठिकाणाची निवड यासाठी केली गेली की जगभरात जर युद्ध देखील झालं तरी हा भा त्यापासून बचावला पाहिजे.

जवळपास १० लाखांपेक्षा जास्त बियांच्या जाती इथे एकत्रित करण्यात आल्या आहेत. या बिया जगभरातील देशांमधून एकत्र करण्यात आल्या आहेत. या वॉल्टमध्ये सुमारे १३ हजार वर्षांपासूनच्या संस्कृती लाभलेल्या बियांचं संवर्धन केलं जातं. 

या बियांचं संवर्धन करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जगाला कधी भुकेनं मरण्याची वेळ येऊ नये. मात्र याने अजून एक काम होणार आहे ते म्हणजे दुर्मिळ होत चाललेल्या पिकांचं संवर्धन इथे होणारेय.

तसंच वैज्ञानिक या बियांवर संशोधन करून त्यांच्या पुनर्लागवडीचे उपाय शोधात आहेत. एका रिपोर्टनुसार अमेरिका एकोणावीसच्या दशकापासून आपले जवळपास ९० टक्के पिकं गमावून बसले आहे तर चीन ७० वर्षांपूर्वी जितके तांदूळ पिकवत होता त्याच्या फक्त दहा टक्के आता पिकवतो. अशात जर उरलेल्या पिकांवर पण कधी रोग, कीड पसरली तर संपूर्ण धान्य, पीक संस्कृती नष्ट होण्याची भीती आहे.

 तेव्हा हे बियांचं गोदाम खूप कामी येऊ शकतं. सोबतच अजून एक संकट सध्या जगभर वावरत आहे ते म्हणजे क्लायमेट चेंज. वातावरणातील बदलामुळे त्याचा पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो म्हणूनच या बियांचं संवर्धन करणं गरजेचं ठरतंय.

हे बियांचं गोदाम काँक्रीटच्या छताखाली बनवण्यात आलं आहे. डोंगरांमध्ये साधारण ४३० फूट खाली बियांचं संवर्धन केलं जातं. डीप फ्रीजिंगमध्ये या बियांना ठेवण्यात येतं. आणि वैज्ञानिक त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. २००८ मध्ये हे स्वालबार्ड बियांचं गोदाम बनवण्यात आलं आणि याची कल्पना होती कॅरी फॉलवर यांची. कॅरी क्रॉप ट्रस्टचे अधिकारी होते. तसं तर त्यांनी ऐंशीच्या दशकात याची कल्पना मांडली होती मात्र युनायटेड नेशन्सने २००१ मध्ये पॉलिसी तयार केली आणि त्यानुसार २००८ मध्ये बियांचं गोदाम तयार झालं.

मात्र हे काही एकटं बियांचं गोदाम आहे असं नाही. तर जगभरात असे सतराशे गोदाम अस्तित्वात असल्याचं सांगण्यात येतं. यांच्यामध्ये अशाच प्रकारे बियांचे संवर्धन केलं जातं. कुणी विचार केला होता अचानक युक्रेन आणि रशिया युद्ध सुरु होईल. तसंच पुढे काय होईल याचाही विचार कुणाला करता येत नाही, मात्र वैज्ञानिकांनी याचा विचार करून सगळ्याच्या खाण्यापिण्याची सोय मात्र केली असल्याचं दिसतंय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.