जाहिरातीवर पैसे खर्च न करताही ग्रो-प्रो कॅमेरा जगातला सगळ्यात भारी ब्रँड कसा बनला?
कोणतही प्रॉडक्ट म्हंटलं की, त्यासाठी जाहिरात मार्केटिंग प्रमोशन या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. कारण जाहिरातीशिवाय शिवाय त्याचा खप होणं जरा अवघडचं असतं. त्यामुळे बऱ्याच कंपन्या आपल्या प्रॉडक्टच्या जाहिरातींवर पाण्यासारखा पैसा ओततात, त्याला एक ब्रँड म्हणून ओळखलं जावं म्हणून मोठ-मोठ्या व्यक्तींकडून त्याचं प्रमोशन करून घेतात.
पण या स्पर्धेच्या जगात असाही एक ब्रँड आहे, ज्याने आजपर्यंत आपल्या प्रॉडक्टच्या जाहिराती वर एकही रुपया खर्च न करता आपली एक वेगळी ओळख जगभरात निर्माण केलीये.
हा ब्रँड म्हणजे वर्ल्ड फेमस कॅमेरा कंपनी गोप्रो (Go Pro). ज्याने आपल्या प्रॉडक्टच्या पॉईंट-ऑफ-व्ह्यू अॅक्शन सीक्वेन्स कॅप्चर करण्याच्या त्याच्या क्षमतेद्वारे यशाचं शिखर गाठलयं. जे जगाने आजवर कुठही पाहिलं नव्हतं.
तर, निक वुडमन या अमेरिकन व्यावसायिकानं 2002 मध्ये GoPro ची स्थापना केली. ऑस्ट्रेलियात 5 महिन्यांच्या सर्फिंग ट्रिपवर असताना निकला कॅमेरा मार्केटमध्ये एक गॅप सापडले. हौशी सर्फिंग उत्साही लोकांसाठी वाजवी किंमतीत चांगले कॅमेरा शोधणे कठीण होते.
त्यानं यावर काम करायला सुरुवात केली, परवड्याजोगे आणि प्रोफेशनल असे प्रत्येक अँगल कॅप्चर करता येतील असे कॅमेरे तयार करणे, हा त्याचा उद्देश होता आणि यातूनच ‘GoPro’ चा जन्म झाला.
पणं हे काय सोपं काम नव्हतं, यासाठी त्याला शून्यातून तयारी करावी लागली. आपल्या नवीन व्यवसायासाठी मोठ्या रकमेची गरज होती. ज्यासाठी त्यानं कॅलिफोर्नियात शेलचे दागिने आणि बेल्ट्स विकले.
हेच काम करत असताना त्याला त्याच्या GoPro कॅमेऱ्यासाठी मनगटाचा पट्टा तयार करण्याची आयडिया मिळाली, जे प्रॅक्टिकल तितकेच फॅशनेबल होते. कारण त्या वेळी बहुतेक कॅमेरांचे पट्टे आरामदायी आणि स्टाइलिश नव्हते.
यानंतर त्याला नवनवीन आयडिया सूचत गेल्या आणि त्याने त्यावर काम करायला सुरुवात केली. कंपनी स्थापन झाल्याच्या 2 वर्षानंतर म्हणजेच 2004 मध्ये, पहिला गोप्रो विकला गेला. एक 35 मिमी फिल्म कॅमेरा जो सफरीसाठी आणि क्रीडाप्रेमींसाठी अतिशय सोयीस्कर होता.
यानंतर GoPro कधीच थांबल नाही. त्यांची उत्पादने सर्वाधिक मागणी असलेल्या गॅझेटपैकी एक बनले
GoPro ने आपली उत्पादने आणि ब्रँड फ्रेमसह सातत्याने यशाची पातळी गाठली. 2013 मध्ये, GoPro ने 2013 च्या सोशल ब्रँड्स टॉप 100 मध्ये 27 वं स्थान मिळवलं, जे ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स श्रेणीतील टॉप 100 मध्ये पोहोचणारा एकमेव ब्रँड आहे. तसेच 2016 मध्ये, सेंटर फॉर ब्रँड अॅनालिसिसने त्यांना 18 व्या ‘कुलेस्ट ब्रँड” असे नाव दिले.
कंपनीने स्वत:हून जाहिरात कधीच केली नाही. लोकांमध्येच त्याचं फेम वाढत गेलं. यात सोशल मीडियाची भर पडली. आणि GoPro ला मार्केटमध्ये एक मजबूत ब्रँड म्हणून ओळख मिळाली. इंस्टा, फेसबुक, यूट्यूब अशा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे मिलीयनमध्ये फॉलोअर्स आहेत.
कंपनीचे अॅक्शन कॅमेरे, हेड कॅमेरे जगभरात प्रसिद्ध आहेत. जे लोकांना कोणत्याही तडजोडीशिवाय आपले अनूभव कॅप्चर करण्याची संधी देतात.
GoPro च्या मदतीने लोकांना त्यांच्या जीवनातील अर्थपूर्ण अनुभव फोटो आणि व्हिडिओंद्वारे कॅप्चर करण्यात आणि इतरांसह शेयर करण्यात मदत मिळाली. तेही खिशाला परवडणाऱ्या दरात, आणि हाच GoPro च्या DNA चा भाग असल्याचं म्हटलं जातं.
हे हि वाच भिडू
- कोडॅक कॅमेरा बनवून जगाला फोटोग्राफी शिकवणाऱ्या ईस्टमनने शेवटी आत्महत्या केलेली
- भारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं जायचं
- भारताचा स्टिंग ऑपरेशन सम्राट बलात्काराच्या आरोपामुळे स्वतःच गोत्यात आला होता