गोव्यात भंडारी समाजाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देण्यात केजरीवालांचं एक गणित आहे

अरविंद केजरीवाल यांनी जेव्हा आम आदमी पार्टीची घोषणा केली तेव्हा जातीपातीचं राजकारण सोडून विकासचं राजकारण करेल असं म्हटलं होतं. दिल्लीमध्ये त्यांनी शिक्षण,आरोग्य क्षेत्रात काम करून आम्ही थोडे वेगळे आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र जातीचं राजकारण भारताच्या राजकारणाचं सत्य आहे असं म्हटलं जातं आणि आपला पण त्याची बाधा झाली आहे.

३०० युनिटपर्यंत मोफत वीज, सहा महिन्यांत खाणकाम पुन्हा सुरू करणे, सर्वांना नोकऱ्या आणि बेरोजगारांना भत्ता या मोफत शिक्षण, मोफत पाणीपुरवठा, मोफत वैद्यकीय सेवा ,१८ वर्षांवरील प्रत्येक महिलेला १००० रुपये प्रति महिना भत्ता देण्याची असा १३ पॉईंट अजेंडा सादर करत आम आदमी पार्टीनं गोवा इलेक्शनचं बिगुल फुकला होता. मात्र त्याला आता आम आदमी पार्टीनं जातीच्या राजकारणाचीही जोड दिली आहे.

त्यानुसारच नोव्हेंबरमध्येच आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी आप गोव्यात सत्तेत आल्यास भांडारी समाजाचा मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री कॅथलिक ख्रिश्चन समाजाचा असेल अशी घोषणा केली होती. 

आता या घोषणेला धरूनच अरविंद केजरीवाल यांनी अमित पालेकर यांची आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषणा केली आहे.

सुमारे ३०% मतदार असलेला आणि OBC अंतर्गत वर्गीकृत असलेला भंडारी समाज गोव्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावतो.

त्यानंतर मराठा समाजाचा क्रमांक लागतो. मात्र मराठा समाज हा विखुरलेला असल्यानं भांडारी समजासारखी एकगठ्ठा मतं तो देऊ शकत नाही असं गोव्यतले राजकीय जाणकार सांगतात.पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाल्यांनतर भंडारी समजा सुरवातीला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या मागे उभा राहिला होता. मात्र या पक्षाला उतरती कळा लागल्यांनंतर समाजाचं मतदान काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये विभागलं गेलं. विशेषतः रवी नाईक यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसच्या मागे हा समाज उभा राहिला होता.

त्यांनतर भाजपनं पण ओबीसी कार्ड खेळत भंडारी समाजाला आपल्याकडे ओढण्यात यश मिळवलं होतं. 

मात्र एवढं राजकीय महत्व असूनही समाजाचा गेल्या ६० वर्षात रवी नाईक यांच्या रूपानं एकमेव मुख्यमंत्री झाला आहे.आणि हाच धागा गोव्याच्या राजकारणात नव्यानं उतरलेल्या आम आदमी पार्टीनं पकडला आहे. यादीही अरविंद केजरीवाल यांनी भांडारी समजावर ६० वर्षांपासून अन्याय होत असल्याचं म्हटलं होतं. आणि हे आपण जातीचं राजकारण करत नसून फॅक्ट सांगतोय अशी पुष्टीही केजरीवाल यांनी जोडली होती.

कोण आहेत अमित पालेकर?
अमित पालेकर यांचे नाव महत्त्वाचे मानले जाते कारण ते भंडारी समाजातून येतात. अमित पालेकर (४६) हे वकील आहेत आणि गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आम आदमी पार्टीत सामील होण्यापूर्वी ते सामाजिक कार्यकर्ते होते.‘आप’ने अमित पालेकर यांना सेंटक्रूझ विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे.

यापूर्वी जुने गोवा हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये बेकायदेशीरपणे बांधण्यात येत असलेल्या बंगल्याच्या निषेधार्थ अमित पालेकर उपोषणावर होते.

त्यांनी उपोषण केल्यानंतर काही दिवसांनी गोवा सरकारने वादग्रस्त रचनेवर कारवाईची घोषणा केली, त्यानंतर अमित पालेकर यांनी आपले उपोषण संपवले. त्या उपोषणादरम्यान अरविंद केजरीवाल यांनीही त्यांची भेट घेतली होती.रिपोर्ट्सनुसार, अमित पालेकर यांची आई १० वर्षांपासून मर्सेस गावच्या सरपंच आहेत. 

त्यामुळं आपची ही खेळी यशस्वी होते की नाही हे येणाऱ्या निवडणुकांनंतरच कळेल.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.