प्रदेशाध्यक्ष रेजिनाल्ड कॅमिलो डिकोस्टा म्हणतायत संभाजी ब्रिगेडही गोव्यात लढणार

अवघ्या ४० विधासभेच्या जागा असलेला गोवा तिथल्या राजकीय उलथापालतीमुळं  बातम्यांमध्ये उत्तरप्रदेश निवडणुकांएवढीच जागा व्यापतोय असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.  गोव्याच्या निवडणुकीच्या रिंगणात रोज नवीनच पक्ष एंट्री करतायत. राष्ट्रीय पक्षांबरोबरच महाराष्ट्रातून शिवसेना आणि राष्ट्रीवादीही शेजारच्या राज्यातून पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचं म्हणत आहेत. आता महाराष्ट्रातला अजून एक प्लेअर गोव्याच्या इलेक्शन रिंगणात  उतरणार आहे.

संभाजी ब्रिगेडनंही गोव्याच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे.

गोव्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढण्यासाठी संभाजी ब्रिगेड मैदानात उतरलं आहे. ब्रिगेडनं आपल्या दोन उमेदवारांची घोषणाही केली आहे. हॉटेल व्यावसायिक आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष रेजिनाल्ड कॅमिलो डिकोस्टा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन संभाजी ब्रिगेड गोव्यात निवडणूक लढणार असल्याचे सांगितलं आहे.

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी यांनी गोव्यात बदल घडवून संभाजी ब्रिगेडच्या बरोबर यावं असं ही ब्रिगडचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले आहेत.

यासाठी आपण आपण आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. तसेच लवकरच राहुल गांधी यांचीही भेट घेणार असल्याचे डिकोस्टा यांनी सांगितले आहे . या पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक लढायचे ठरविल्यास संभाजी ब्रिगेड गोवा विधानसभेच्या सर्व ४० जागांवर चांगले उमेदवार देण्यात पुढाकार घेईल असंही ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्षा डिकोस्टा म्हणतायत.

मारिया डिकोस्टा या मांद्रे तर डायना डिकोस्टा या शिवोली मतदारसंघातून या दोन नावांची घोषणा आगामी गोवा निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. 

सर्व गव्हर्नमेंट शाळांमध्ये गोमंतकीय वंशाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे पक्षाचे प्रमुख आश्वासन असल्याची माहितीही रेजिनाल्ड कॅमिलो डिकोस्टा यांनी दिली आहे. निवडणुकीत शिकलेल्या आणि प्रामाणिक उमेदवारांना चान्स भेटला पाहिजे आणि जर अशी माणसं निवडून अली तर त्यांच्याकडून गोव्यातल्या सर्वसामान्य अपेक्षित असलेलं प्रशासन देण्यात येइल .

पुरुषोत्तम खेडेकर यांनी रजिस्टर केलेल्या संभाजी ब्रिगेडचे २लाख ५० हजार प्राथमिक सदस्य असल्याचं सांगण्यात येतंय. 

त्यामुळं संभाजी ब्रिगेडच्या रूपानं आधीच भाऊ गर्दी झालेल्या गोव्याच्या राजकारणात नवीन एंट्री आली आहे. त्यात एवढ्या सगळ्या पक्षांची नावं नुसती लक्षात ठेवण्यातच दमछाक होणार एवढं तर सरळ दिसतंय.

एवढे सगळे पक्ष आणि मग बंडोखरी करणारे अपक्ष यामुळं निवूडणूक आयोगाची खरी दमछाक होणार आहे.

निवडणुक आयोग ईव्हीएमद्वारे जास्तीत जास्त ६४ उमेदवारांना इलेक्शनसाठी संधी देऊ शकते.

एका बॅलेटिंग युनिटमध्ये १६ उमेदवारांसाठी तरतूद करता. जर उमेदवारांची एकूण संख्या १६ पेक्षा जास्त असेल तर, दुसरे बॅलेटिंग युनिट पहिल्या बॅलेटिंग युनिटशी समांतर जोडले जाऊ शकते. त्याचप्रमाणे, उमेदवारांची एकूण संख्या ३२ पेक्षा जास्त असल्यास, तिसरे बॅलेटिंग युनिट संलग्न केले जाऊ शकते आणि उमेदवारांची एकूण संख्या ४८ पेक्षा जास्त असल्यास, जास्तीत जास्त ६४ उमेदवारांसाठी चौथे बॅलेटिंग युनिट संलग्न केले जाऊ शकते. त्यामुळं इलेक्शन कमिशनला किती बॅलेट युनिट लागतात हे बघण्यासारखं असणार आहे.

हे ही वाच भिडू :

Webtitle : Goa Election 2022 : Sambhaji Brigade will contest election against BJP

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.