खेला होबे म्हणत ममता दीदींनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पाडलंय

देशातील इतर विधानसभा निवडणुकींमध्येच गोव्याची विधानसभा निवडणूक देखील अलीकडे फारच चर्चेत आली आहे. त्यात भर म्हणजे गोव्यात राष्ट्रवादीला एक भलं मोठं भगदाड पडलंय….होय तेही काहीच दिवसांपूर्वी वाजत गाजत मिळून मिसळून देशामध्ये सत्ता आणू म्हणून ममता दीदींनी  मुंबईचा ३ दिवसांचा दौरा केलेला. त्यात बहुचर्चित भेट म्हणजेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली.

पण काहीच दिवस झालं हि भेट झाली आणि दीदींनी गोव्यात राष्ट्रवादीला सपशेल धोका दिला आहे.  राष्ट्रवादीचा गोवा राज्यातील एकमेव आमदाराचे तृणमूलमध्ये विलीनीकरण केले आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातले एकमेव आमदार जे कि, बेनौलिम मतदारसंघाचे आहेत. चर्चिल आलेमाओ यांनी आजच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. विशेष म्हणजे आपली आमदारकी वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाचे राज्य विधानमंडळच ममता बॅनर्जींच्या पक्षात विलीन केलेय. बेनौलिम मतदारसंघाचे आमदार आलेमाओ यांनी सांगितले की, आज ते ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे तृणमूलमध्ये सामील होणार आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. पुढील वर्षी होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीत सर्व ४० जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे तृणमूल काँग्रेसने आधीच जाहीर केले होते. ममता बॅनर्जी यांनी गोव्याची निवडणूक चांगलीच सिरियसली घेतलीय.

ममता दीदींनी एकामागून एक झटपट घोषणा करून मतदारांना आपल्या बाजूने घेण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न चालूये. अलीकडेच त्यांनी केजरीवालांचे फ्री राशन, फ्री अमुक, फ्री तमुक असली ‘फ्री कार्ड’ निष्फळ करण्यासाठी ५० हजारांची पैज लावलीये आहे. त्यामुळे त्यांना हे खरं करून दाखवण्यासाठी कोणत्याही कोणत्याही परिस्थितीत तृणमूलला गोव्यात जिंकूनच दाखवायचं आहे.

याच पक्षांतरावर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक माध्यमांशी बोलतांना म्हणले कि, 

“राजकीय नेते अनेकदा निवडणुकीच्या वेळी एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात. जर त्यांना अलेमाओ यांना तृणमूल काँग्रेसमध्ये सामील व्हायचे असेल तर ती त्यांची निवड आहे तसेच तृणमूल जाण्याचा त्यांचा वयक्तिक निर्णय आहे. कारण मागच्याच निवडणुकीत त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला होता, तसाच हा आजचा पक्ष प्रवेश आहे त्यामुळे काहीही मोठी गोष्ट नाही”.

दुसरीकडे, आलेमाओ यांनी सोमवारी सभापती राजेश पाटणेकर यांची भेट घेतली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोवा विधानसभेचे तृणमूल काँग्रेसमध्ये विलीनीकरण केल्याची माहिती दिली. पाटणेकर यांची भेट घेतल्यानंतर आलेमाओ याना माध्यमांनी प्रश्न केला कि, “तुम्ही विलीनीकरण केले म्हणजे नक्की काय केले आणि तुम्ही या सोबतच आमदारकीचा राजीनामा देणार का ? या प्रश्नावर ते उत्तरले कि, मी आमदार पदाचा राजीनामा का देऊ? मी आमदारच राहणार. फक्त मी पक्षाच्या विधिमंडळ युनिटचे तृणमूलमध्ये विलीनीकरण केले आहे.

अलेमाओ यांनी दावा केला की ते राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत आणि पक्षाच्या विधान मंडळाचे १०० टक्के प्रतिनिधित्व तेच करतात, त्यामुळे भारतीय संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार त्यांनी केलेलं  विलीनीकरण घटनात्मकरित्या वैध आहे. अलेमाओ म्हणाले की दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य पक्षाच्या विधिमंडळ युनिटमध्ये विलीन होऊ शकत नाहीत.

त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता कि, गोव्यातला  स्वतः शंभर टक्के राष्ट्रवादी पक्ष म्हणजे ते स्वतः च आहेत. 

असो या विलीनीकरणावर राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करतांना, या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, लोक अनेकदा निवडणुकीच्या वेळी एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात सामील होतात. ते म्हणाले की, जर त्यांना (अलेमाओ) तृणमूल काँग्रेसमध्ये सामील व्हायचे असेल तर ती त्यांची निवड आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला होता. निवडणुका जवळ आल्याने त्यांनी राजीनामा दिला की नाही, याने काय फरक पडतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.